शिवाच्या अनेक नावांपैकी सोम, हे एक महत्वाचं नाव आहे. सोमचा शब्दशः अर्थ म्हणजे उन्माद. जर तुमच्यामध्ये काहीच उन्माद नसेल, तरतुमच्यातपुरेसंवेडनसेल उडी मारण्यासाठी, त्या असीम शुन्यतेमध्ये,जी खरी मुक्ती आहे. तर सोम किंवा सोमसुंदर – हे शिवाचं एक महत्वाचं नाव आहे. कायमच उन्मादाच्या स्थितीत असलेला. पण तरीही पूर्णपणे सतर्क. तर कथा अशी आहे, शिव बसला होता, कैलास पर्वताच्या जवळ, संपूर्ण उन्मादाच्या स्थितीत. बातमी भारतभर पसरली की तिथं एक माणूस बसून आहे, इतका भव्य दिव्य माणूस, की प्रत्येक वर्षी अधिकाधिक लोक यात्रा करून येऊ लागले. एक तरुणी होती, ती राजकुमारी होती, हिमालयाच्या एका राज्यात. तिचं नांव होतं पार्वती. आणि जेव्हा तिनंही बातमी ऐकली, तर ती म्हणाली की मला त्याला जाऊन बघायचंय. ज्याक्षणी तिची नजर त्याच्यावर पडली, ती इतकी भारावून गेली त्याच्यामुळे, ती म्हणाली, जर मी लग्न केलं तर मला ह्याच माणसाशी लग्न करायचं आहे. मग अजून काही लोकांनी कुठलासा कट केला आणि शिवानं ठरवलं की तो तिच्याशी लग्न करणार आहे.
एक मोठा लग्न समारंभ ठेवला होता. जे कुणी महत्वाचे लोक होते त्या भागातले ते सर्वजण आले होते. नवरी मुलगी अगदी सुंदरपणे नटली होती. सर्वजण नवरदेव येण्याची वात पहात होते. आणि मग नवरदेव आला, तो चालत आत आला, पूर्णपणे भस्म लेपून, जटा मोठमोठ्या. पूर्णपणे उन्मादाच्या, नशेच्या धुंदीत. आणि त्याचे सर्व मित्रगण विचित्र दिसणारे, यक्ष आणि गण. विचित्र अगदी विचित्र, आवाज करत, हे सगळं बघून पार्वतीची आई मीना तिनं या माणसाला पाहिलं आणि त्याचे मित्र, आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की तिची मुलगी या माणसाशी लग्न करणार आहे, ती तिथच बेशुद्ध होऊन पडली. मग सगळ्यांनी तिला शुद्धीवर आणलं आणि ती इतकी निराश झाली होती, मी कशी माझी मुलगी देऊ ह्या माणसाला. तो इतका जंगली आहे, पूर्णपणे असंस्कृत आहे. तो माणूस माणसासारखाही दिसत नाहीये. तो किती विचित्र आहे. म्हणून पार्वतीनं जाऊन शिवला विनंती केली माझ्यासाठी तू जसा आहेस तसा मला मान्य आहेस. कुठल्यातरी कारणानं तू हे विचित्र रूप घेऊन आलेला आहेस. हे सुद्धा मला मान्य आहे, पण माझ्या आईसाठी, थोडं चांगलं रूप घे. मग तो ठीके म्हणाला, आणि मग त्यानं अगदी सुंदर देखणं रूप धारण केलं. ज्याला म्हणतात सोम सुंदर.
नशेत धुंद पण तरीही अतिशय सुंदर. पूर्णपणे उन्मादाच्या स्थितीत. डोळ्यात धुंदी. पण तरीही तो अतिशय सुंदर झाला. मग मीनेनं उठून पाहिलं. ह्या भव्य दिव्य माणसाला तिथं उभं राहिलेलं पाहून. आणि ती म्हणाली की मला माझी मुलगी ह्या माणसाला द्यायचीये. त्या विचित्र माणसाला नाही. तर उन्माद हा एक महत्वाचा गुण आहे ध्यानामधला.
हा नसला, जर तुमच्यात काहीच उन्माद नसेल तर तुम्ही नुसतेच बसून कशे राहू शकाल? सर्वात मोठी छळवणूक वाटेल नुसतं असं तिथे बसून रहायचं. कशावर तरी मन केंद्रित करायचा प्रयत्न करून. तर हा तसा एक मुख्य गुण आहे. तो चंद्र स्वतःच्या डोक्यावर वाहत असल्याचा, हे प्रतिक आहे, की तो कायम उन्मादाच्या स्थितीत आहे, स्वतःहूनच. कुठलेही बाह्य पदार्थ न वापरता. तर जेव्हा म्हटलं जातं शिव कायम सोमरस प्राशन करत होता, तो काही दारुडा नव्हता. तो फक्त ग्रहण करत होता, चंद्राची किरणं जी तो कायम स्वतःचा डोक्यावर धारण करून असायचा. आणि कायमच नशेच्या धुंदीत.ही उन्मादाची अवस्था, हे काही मुख्य ध्येय नाहीये. ह्या आनंदाच्या अवस्था, दुःखाचं भय तुमच्यातून नष्ट करतं. जेव्हा दुःखाचं भय तुमच्यातून पूर्णपणे नाहीसं होतं, जेव्हा माझं पुढं काय होईल, हा विचार तुमच्यातून पूर्णपणे नष्ट होतो, तेव्हाच तुम्ही हिम्मत कराल, जीवनाचा सर्वार्थानं शोध घेण्याचा.
नाहीतर तुम्ही फक्त ते जपायच्या मागे राहाल. करिअर असुदे किंवा बिजनस असुदे ते केवळ तुमच्या सुरक्षिततेबद्दलच्या गोष्टी आहेत. लग्न सुद्धा तुमच्या सुरक्षिततेबद्दलची गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी सुरक्षिततेबद्दलच्या आहेत. जो पर्यंत दुःखाचं भय तुमच्या डोक्यात चालू आहे तुम्ही हिम्मत करू शकणार नाही खऱ्या अर्थानं जीवनाच्या सखोल पैलूंचा शोध घेण्याची. जेव्हा अशा प्रकारे तुम्ही नशेनं धुंद असाल, पण तरीही पूर्णपणे जागरूक. आता दुःखाची काहीच भीती उरलेली असेल. तुमची कुठेही जाण्याची तयारी असेल.
SadhguruApp (डाउनलोड करा) - http://onelink.to/sadhguru__app
अधिकृत सद्गुरू वेबसाइट - http://isha.sadhguru.org
इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - https://sadhguru.org/IE-MR
माती वाचवा मोहीम - https://savesoil.org
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices