Solid Joys

1 August : आमचा  अशक्तपणाच त्याची योग्यता प्रकट करतो


Listen Later

"माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते." (2 करिंथ 12:9)

आमच्या जीवनांत देव दुःख आणतो त्यामागे त्याची योजना ही कीं त्याद्वारे ख्रिस्ताची योग्यता आणि सामर्थ्य ही पूर्णतेस यावीं. ही कृपा आहे, कारण ख्रिस्ती लोकांचा सर्वात मोठा आनंद म्हणजें आपल्या जीवनात ख्रिस्त उंचविला जावा यांत आहे.

जेव्हा पौलाला प्रभु येशूनें सांगितले कीं त्याचा “शरीरात असलेला काटा” दूर केला जाणार नाहीं, तेव्हा त्यानें यामागचे कारण स्पष्ट करून पौलाच्या विश्वासाला बळकटी दिलीं. प्रभुनें म्हटलें, "माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते" (2 करिंथ 12:9). पौलाने अशक्तच असावें हे देवानें नेमून ठेविलें यांत हेतू हा कीं पौलानें ख्रिस्तामध्येंच आपलें सामर्थ्य शोधावें.

जर आपण स्वतःला आत्मनिर्भर समजू लागलो आणि त्यां दृष्टिने आपण स्वतःकडें पाहू लागलो तर आपण फार चढून जाऊ, व ख्रिस्ताचे गौरव होणार नाहीं. म्हणून, ख्रिस्तानें जगातील जे हीनदीन, व जे शून्यवत अशांना निवडले “म्हणजें देवासमोर कोणाही मनुष्यानें अभिमान बाळगू नये” (1 करिंथ 1:29). आणि कधी कधी तो बाह्य रूपाने बलवान दिसणाऱ्या लोकांना अशक्त बनवतो जेणें करून देवाचे सामर्थ्य अधिक स्पष्टपणें प्रकट व्हावें.

आपल्याला ठाऊक आहे कीं पौलाने ही गोष्ट कृपा म्हणून अनुभवली, कारण तो आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीत असें : “म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठीं दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे” (2 करिंथ 12:9-10).

देवाच्या कृपेवर विश्वास ठेऊन जगणें म्हणजें येशूमध्यें देव आपल्यासाठीं जो काहीं आहे त्या सर्व गोष्टींत समाधानी असणें. म्हणून, देव येशूमध्यें आपल्यासाठीं जो काहीं आहे ते सर्व प्रकट होत असतांना आणि त्याद्वारे देवाचे गौरव होत असतांना विश्वास त्यापासून कधीच माघार घेणार नाहीं. आपला अशक्तपणा व आपलें दुःख यांचा हाच हेतू आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India