
Sign up to save your podcasts
Or


“हे मनुष्या, बरें काय ते त्यानें तुला दाखवलें आहे; नीतीनें वागणें, आवडीनें दया करणें व आपल्या देवासमागमें राहून नम्रपणें चालणें ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?” (मीखा 6:8)
एखाद्या व्यक्तीला असें सांगण्यात आल्यामुळें कीं जेव्हां त्याला आनंद प्राप्त होतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीस आनंदाची प्राप्ती होईल , म्हणून आपण प्रेमास पात्र नाहीं असें कोणालाही कधीही वाटलें नाहीं. आवडीनें दया करणें मला आनंद देतो या आधारावर दयाळूपणाचे समर्थन करत असतांना माझ्यावर कधीही स्वार्थीपणाचा आरोप करण्यात आलेला नाहीं. या उलट, कुरकुर न करता करण्यात आलेंली प्रीतिची कृत्ये अस्सल असतांत.
आणि नाखुशीनें दया करणें चा योग्य पर्याय तटस्थपणें किंवा कर्तव्यबुद्धीनें दया करणें नसून, तर आनंदानें दया करणें हा आहे. अस्सल प्रीतिनें भरलेलें परिपूर्ण अंतःकरण दयाळूपणामध्यें आनंद करते (मीखा 6:8); ते फक्त दया करत नाहीं. ख्रिस्ती पूर्णानंद हे सत्य विचारात घेण्यास भाग पाडते.
“आपण देवावर प्रीति करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हां त्यावरून आपल्याला कळून येते कीं, आपण देवाच्या मुलांवर प्रीति करतो. देवावर प्रीति करणें म्हणजें त्याच्या आज्ञा पाळणें होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत. कारण जे कांहीं देवापासून जन्मलेलें आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्यानें जगावर जय मिळवला तो म्हणजें आपला विश्वास.” (1 योहान 5:2-4)
ही वाक्ये उलट् क्रमानें वाचा आणि तर्कावर लक्ष द्या. प्रथम, जेव्हां आपण देवापासून जन्मलेलें असतो, तेव्हां आपल्याला ह्या जगावर जय मिळविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. देवाच्या आज्ञा कठीण नाहींत या कथनासाठीं पार्श्वभूमी किंवा आधार म्हणून ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणण्यांत आली आहे (“कारण” या शब्दावर लक्ष द्या).
तर मग, देवापासून जन्मलेलें असल्यामुळेच आम्हास असें सामर्थ्य प्राप्त होते ज्याद्वारें आपण जगाच्या तिरस्कारावर विजय मिळवितो आणि देवाची इच्छा पाळतो. यापुढे आपल्यासाठीं त्याच्या आज्ञा “कठीण” नाहींत, तर त्यां आपल्या अंतःकरणाचे मनोदय व आनंद आहेत. ही परमेश्वराची खरी प्रीति आहे : केवळ आपण त्याच्या आज्ञांचे पालन करतो असें नाहीं, तर आता त्या कठीणहि नाहींत.
मग दुसऱ्या वचनांत असें सांगितलें आहे कीं देवाच्या मुलांवर आपण जी प्रीति करतो तिच्या खरेपणाचा पुरावा म्हणजें देवावर प्रीति करणें हा आहे. देवाच्या मुलांवर प्रीतिविषयी हे आपल्याला काय शिकवते?
ज्याअर्थी देवावर प्रीति हे कठीण काम जाणवत नसून आनंदानें त्याची इच्छा पूर्ण करणें आहे, आणि देवावर प्रीति ही देवाच्या मुलांवरील आमच्या प्रीतिचे मोजमाप आहे, त्याअर्थी देवाच्या मुलांवरील आपली प्रीति ही देखील नाखुशीनें नव्हे तर आनंदानें केली गेलेली असलीं पाहिजे.
ख्रिस्ती पूर्णानंद म्हणजें प्रामाणिकपणें केलेल्या प्रीतिची सेवा, कारण तो पूर्णानंद आम्हास नाखुशीनें आज्ञापालन करण्यांस नाहीं, तर आनंदानें आज्ञापालन करण्यास आवरून धरतो.
“तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल?” (इब्री 2:3)
तुमचे तारण किती मोठे आहे ह्याची जाणीव तुम्हांला आहे का? कीं तुम्हीं त्याकडे दुर्लक्ष करतां?
तुम्हीं तुमच्यां ह्या मोठ्या तारणाकडे कसे पाहतां? कीं तुम्हीं त्याच्याशी तुमची अंतिम इच्छा आणि मृत्युपत्र, किंवा तुमच्यां कारचा अधिकार किंवा तुमच्यां घराचे विक्रीपत्र यांशी व्यवहार करावा तसे वागता? तुम्हीं त्यावर एकदा स्वाक्षरी केली आणि ते आता कुठेतरी फाईलच्या एका कपाटात आहे, पण तुमच्यां दृष्टीनें ती खरें पाहतां इतकी पण मोठी गोष्ट नाहीं. तुम्हीं त्या विषयीं क्वचितच विचार करता. रोज पडावा तसा त्याचा तुमच्यांवर काहीं फरक पडत नाहीं. मुळांत तुम्हीं त्याकडे दुर्लक्ष करता.
पण जेव्हां तुम्हीं तुमच्यां अशा मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करता तेव्हां तुम्हीं खरोखर कशाकडे दुर्लक्ष करत असतां? “तुमच्यां मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करूं नका!“ असें जेव्हां तो म्हणतो तेव्हां त्याला हेंच म्हणायचे आहे.
हे खरोखर मोठे तारण आहे. त्याकडे दुर्लक्ष करणें म्हणजें अति दुष्टपणाच. इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करूं नका. कारण जर तुम्हीं दुर्लक्ष्य केलें तर न्यायाच्या दिवशी तुमचा कसा निभाव लागेल? लेखक हांच प्रश्न विचारत आहे: “एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल?”
म्हणून, ख्रिस्ती असणें ही एक अतिशय गंभीर बाब आहे – ही सामान्य गोष्ट नाहीं तर एक गंभीर विषय आहे. आपल्या मोठ्या तारणात आनंद करण्याविषयी आपल्याला कळकळ असली पाहिजे.
आपण या जगाद्वारें पापाच्या क्षणिक आणि आत्मघाती सुखविलासाकडे ओढले जाऊ नये. आपण परमेश्वराठायीं आमच्या सनातन आनंदाकडे दुर्लक्ष करूं नये – हेंच या तारणाचे ध्येय होय. एवढ्या मोठ्या तारणापासून दूर वाहवत जाण्यापेक्षा आपण आपलें डोळे उपटून काढलें तर बरे होईल.
“जे रानातलें गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरूंन तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:30).
येशू म्हणतो कीं आमचा अल्पविश्वास हा आमच्यां चिंतेचे मूळ आहे – आमचा पिता आम्हांला भविष्यांत जी कृपा पुरविणार असतो त्याविषयी “अल्पविश्वास”.
ह्याला आम्हीं कदाचित अशी प्रतिक्रिया देऊं: “ही सुवार्ता नाहीं! वस्तुतः, हे ऐकून फार निराशा होते कीं जो विचार मी केला होता तो चिंताग्रस्त स्वभावाशी असलेला संघर्ष मात्र होता तो खरे पाहता मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो कीं नाहीं याविषयीच एक अतिशय गंभीर संघर्ष होता.”
या निराशेला मीं आधी होय, हें खरे आहे असें म्हणतो, पण नंतर असहमत होतो.
समजां तुमच्यां पोटात दुखत असेल आणि तुम्हीं सर्व प्रकारची औषधे आणि आहार घेत असाल, पण कांहीं फायदा होत नाहीं. आणि मग समजा कीं तुमचा डॉक्टर तुम्हांला तुमच्यां नियमित भेटीनंतर सांगतो, कीं तुमच्यां लहान आतड्यात कँसर झाला आहे. आता, तुम्हीं तिला चांगली बातमी म्हणणार का? तुम्हीं ठामपणें म्हणाल, नाहीं! आणि मला ते मान्य आहे.
पण आता मी तुम्हांला हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीनें विचारतो: डॉक्टरांनी कँसरचा उपचार करता येईल अशा वेंळी त्याचे निदान केलें, आणि खरोखरच त्यावर यशस्वीपणें इलाज केला जाऊ शकतो याचा तुम्हांला आनंद झाला का? तुम्हीं म्हणाल, होय, मला खूप आनंद झाला कीं डॉक्टरांना खरी समस्या आढळून आली. मीं तेहि मान्य करतो.
तर मग, ही बातमी कीं तुम्हांला कॅन्सर आहे चांगली बातमी नाहीं. परंतु, दुसऱ्या अर्थानें पाहता, ही चांगली बातमी आहे, कारण तुमच्यांत खरी व्याधी काय आहे हे जाणून घेणें कधीही योग्यच, विशेषतः जेव्हां तुमच्यां त्यां व्याधीचा इलाज यशस्वीरित्या करता येऊ शकतो.
म्हणजें (येशूनें म्हटल्याप्रमाणें) आमच्या चिंतेमागील खरी समस्या ही परमेश्वराच्या भावी कृपेविषयी त्यानें दिलेल्यां अभिवचनांवर आमचा असलेला “अल्प विश्वास” आहे हे आम्हीं शिकतो. आणि जेव्हां आपण आक्रोश करतो, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका!” (मार्क 9:24) - तेव्हां तो अद्भुतरित्या आमचे रोग बरे करण्यास समर्थ आहे.
“ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणें’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असें त्यानें गणलें; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री 11:26).
आपण दु:खें सोसण्याचा निर्णय घेतो ते केवळ आम्हांस ते सोसावयांस सांगितलें आहे म्हणून नाहीं, परंतु जो आम्हांस ते सोसण्यांस सांगतो तो स्वत: त्यांचे वर्णन सार्वकालिक आनंदाचा मार्ग म्हणून करतो.
आपल्या कर्तव्याप्रत असलेंल्या निष्ठेचे सामर्थ्य प्रगट करण्यासाठीं नव्हे, किंवा आपल्या नैतिक निर्धाराचा जोम प्रकट करण्यासाठीं नव्हे, अथवा दुःख सहन करण्याची आमची पराकाष्ठा सिद्ध करण्यासाठीं नव्हे, तर बालकासारख्या विश्वासात, त्याच्या सर्वसमाधानकारक अभिवचनांची अमर्याद बहुमूल्यता प्रगट करण्यासाठीं तो आम्हास क्लेशांमध्ये आज्ञा पाळणारे होण्यासाठीं पाचारण करतो - त्या सर्वांचे प्रतिफळ म्हणजें त्याच्या स्वतःच्या गौरवाची सर्व-समाधानकारक थोरवी आणि सुंदरता.
”पापाचे क्षणिक सुख भोगणें ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणें हे त्यानें (मोशेनें) पसंत करूंन घेतलें.... कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्री 11:25-26). म्हणून, त्याच्या आज्ञापालनानें प्रतिफळास गौरवान्वित केलें - ख्रिस्ताठायीं त्याच्याकरिता परमेश्वर जे कांहीं आहे ते सर्व - केवळ दुःख सहन करण्याचा निर्धार नव्हे.
ख्रिस्ती पूर्णानंदाचा (मुळांत पायपर यांचा विलासवाद म्हणजें आत्म-सुख हेच अंतिम उद्दिष्ट असा सिद्धांत) हा सारांश आहे. विटंबना सोसत आनंदाचा पाठलाग करीत असतांना, आमच्या आनंदाचा जो स्रोत त्याच्या सर्वसमाधानकारक मूल्याची आम्हीं वाखाणणी करतो. आमच्या दुःखाच्या बोगद्याच्या शेवटी उज्वल प्रकाश म्हणून साक्षांत परमेश्वराचे तेज दिसून येते.
क्लेशात आमच्या आनंदाचे लक्ष्य आणि आधार तोच आहे असें जर आम्हीं सांगत नाहीं, तर आमच्या क्लेशाचा अर्थ नाहींसा होईल. अर्थ हा आहे : परमेश्वर हा स्वतः आमचा लाभ आहे. परमेश्वर हांच लाभ आहे. परमेश्वर स्वतः लाभ आहे. आम्हीं जर विटंबना सोसतो त्यामागचा हेतू हाच आहे.
मानव-अस्तित्वाचे मुख्य ध्येय परमेश्वराचा गौरव करणें हा आहे. इतर कुठल्याही गोष्टीच्या तुलनेंत ते क्लेशाबाबत खरे आहे कीं जेव्हां आम्हीं परमेश्वराठायीं सर्वाधिक समाधानी असतो तेव्हां तो आमच्याठायीं सर्वाधिक गौरव पावतो.
“माझ्यामुळें जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्यांविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीनें बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यांपूर्वी जे संदेष्टे होऊन गेलें त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्तय 5:11-12)
ख्रिस्ती पूर्णानंद (मुळांत पायपर यांचा विलासवाद म्हणजें आत्म-सुख हेच अंतिम उद्दिष्ट असा सिद्धांत) म्हणतो कीं ख्रिस्ती या नात्यानें आमची छळवणूक होत असतां आनंद करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. त्या सर्वांचे अनुसरण परमेश्वराच्या अमर्याद व पूर्ण करणाऱ्या अशा कृपेची अभिव्यक्ती म्हणून करावयाचा असतो.
छळवणूक होत असतां आनंद करण्याचा एक मार्ग म्हणजें आपलें पुनरुत्थान होईल त्यावेळी आपल्याला प्राप्त होणाऱ्या प्रतिफळाच्या थोरवीवर आपली मनें स्थिर करणें हा होय. त्या वैभवाकडें दृष्टि लावण्याचा परिणाम हा आहे कीं जे गौरव प्रकट होणार आहे त्या तुलनेंत सांप्रत काळाची दुःखे नगण्य वाटतांत : “कारण आपल्यासाठीं जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे कांहींच नाहींत असें मी मानतों.” (रोमकरांस. 8:18; 2 करिंथ 4:16-18 बरोबर तुलना करा). दुःखे सहन करण्यायोग्य व्हावें म्हणून, आपल्याला मिळणाऱ्या प्रतिफळाकडे नजरां ठेऊन आनंद केल्यानें देखील प्रीति करणें शक्य होईल.
“तुम्हीं तर आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसनें द्या, म्हणजें तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्हीं परात्पराचे पुत्र व्हाल” (लूक 6:35). गरीबांना औदार्याने वागवून घ्यां “म्हणजें तुम्हीं धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ कांहीं नाहीं; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल” (लूक 14:14). या अभिवचनाद्वारें प्राप्त होणाऱ्या प्रतिफळाठायीं विश्वास जगिकतेची दोर तोडून आम्हांस प्रीतिचें श्रम करण्यासाठीं मुक्त करतो.
छळवणूक होत असतां आनंद करण्याचा दुसरा मार्ग हा आपल्याला दिलेल्यां आशेच्या खात्रीवर क्लेशांचा जो परिणाम होतो त्यापासून येतो. छळवणूक होत असतां क्लेशांमध्ये आनंदाचे मूळ हे केवळ पुनरुत्थान आणि प्रतिफळ याबाबतींत असलेल्या आशेमध्येंच नाहीं तर ती आशा आणखी सखोल बनविण्यासाठीं दुःख ज्याप्रकारे कार्य करते त्यातहि त्यां आनंदाचे मूळ आहे.
उदाहरणार्थ, पौल म्हणतो, “इतकेच नाहीं, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे कीं, संकटानें धीर, धीरानें शील व शीलानें आशा निर्माण होते.” (रोम 5:3-4).
दुसऱ्या शब्दांत म्हणजें, पौलाच्या आनंदाचे मूळ केवळ त्याला मिळणाऱ्या महान प्रतिफळात नाहीं, तर क्लेश व दु:खें यांमुळे जे परिणाम समोर येतांत त्यातही आहे जें त्या प्रतिफळाच्या आशेला बळकट बनवितांत. संकटानें धीर उत्पन्न होतो, आणि धीर ही जाणीव उत्पन्न करतो कीं आपला विश्वास खरा आणि अस्सल आहे, आणि यामुळें आपली ही आशा कीं आपण खरोखर ख्रिस्तास प्राप्त करूं आणखी बळकट होते.
तर मग, आपण प्रतिफळाच्या वैभवावर अथवा क्लेशाच्या शुद्ध करणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करीत असलो तरी, छळवणूक होत असतां येणाऱ्या क्लेशांतहि आपला आनंद टिकून राहावा हा देवाचा उद्देश आहे.
तुमच्यासाठीं जी माझी दुःखे त्यांमध्यें मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतलें जे उरलें आहे ते मी आपल्या देहानें, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठीं भरून काढत आहे. (कलस्सै 1:24)
ख्रिस्तानें पापी लोकांसाठीं क्लेश व मरण सोसून जगासाठीं प्रेमार्पण तयार केलें आहे. ते एक सिद्ध-साध्य बलिदान आहे. त्याद्वारें त्यानें त्याच्या सर्व लोकांच्या सर्व पातकांसाठीं पूर्ण खंडणी भरलीं. हे दान इतके उत्तम आहें कीं त्यांत कांहींही जोडता येऊ शकत नाहीं. त्यात कसलीही उणीव नाहीं - फक्त एक गोष्ट सोडून, स्वतः ख्रिस्ताद्वारें जगातील राष्ट्रांसमक्ष वैयक्तिक प्रस्तुती.
ही उणीव भरून काढण्यासाठीं परमेश्वराचा उपाय हा कीं तो ख्रिस्ताच्या लोकांना (पौलासारखे लोक) जगासमोर ख्रिस्ताच्या क्लेशांचे वैयक्तिक प्रस्तुतीकरण करण्यासाठीं पाचारण करतो. हे क्लेश भोगून, आपण “ख्रिस्ताच्या क्लेशांत जी उणीव आहे ती भरून काढतो.” देवानें त्यां क्लेशांना ज्यां उद्देशाने नेमिलें होते तो उद्देश आपण पूर्ण करतो, म्हणजेच, ज्यां लोकांना ते देवाच्या दृष्टीनें किती असीम मौल्यवान आहेत हे समजत नाहीं अशा लोकांसमक्ष ख्रिस्ताच्या क्लेशांचे वैयक्तिक सादरीकरण.
परंतु कलस्सै. 1:24 बाबत सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजें याचे प्रदर्शन कीं पौल ख्रिस्ताच्या क्लेशांत असलेलीं उणीव कशी भरून काढतो.
तो म्हणतो कीं तो आपल्या स्वतःच्या क्लेशानें ख्रिस्ताचे क्लेश भरून काढतो. तर मग, याचा अर्थ हा आहे कीं, पौल ज्यांना ख्रिस्तासाठीं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठीं तो स्वतः दुःख सोसून ख्रिस्ताचे क्लेश प्रदर्शित करतो. म्हणजें त्याच्या क्लेशात त्यांना ख्रिस्ताचे क्लेश दिसलें पाहिजेत.
याचा थक्क करणारा अंतिम निष्कर्ष हा : ख्रिस्ताचे क्लेश हें त्याच्या लोकांच्या क्लेशांद्वारें जगापुढे मांडावे हा देवाचा हेतू आहे.
ख्रिस्ताचे शरीर जी मंडळी तिच्यासाठीं परमेश्वराचा हेतू खरोखर हा आहे कीं त्यानें अनुभवलेंल्या कांहीं क्लेशांचा अनुभव तिनें सुद्धा घ्यावा यासाठीं कीं जेव्हां आपण जीवनाचा मार्ग म्हणून वधस्तंभाची घोषणा करूं, तेव्हां लोकांनी आपल्यामध्यें वधस्तंभाच्या खुणा पाहाव्यांत आणि आम्हांद्वारें त्यांस वधस्तंभाच्या प्रीतिची जाणीव व्हावीं.
“माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” (2 करिंथ 12:9)
ख्रिस्ती म्हणून आम्हांवर जी सर्व नाना प्रकारची संकटें व दुःखें येतांत त्यांमागे देवाचा सार्वत्रिक उद्देश हा आहे : देवामध्यें प्रगतीशील समाधान आणि स्वतःवर आणि जगावर ऱ्हासशील अवलंबन. "आयुष्यातील वास्तविक कठीण धडे मीं अगदी सहज आणि अनुकूल काळांतच शिकलो आहें" असे कोणी म्हटलेंलें मी कधीच ऐकले नाहीं.
उलट मी सशक्त पवित्र जनांना असे म्हणताना ऐकलें आहे कीं, "देवाच्या प्रीतिची खोली काय आहे ती जाणून घेण्यात आणि त्याच्याबरोबरचा माझा खोलवर सहवास यांत मी केलेंलीं प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण प्रगती ही दुःखांच्या माध्यमातूनच झालीं आहे."
सर्वात मौल्यवान मोती म्हणजें ख्रिस्ताचा गौरव पाहणें.
अशाप्रकारे, पौल मोठ्या कळकळीने सांगतो कीं जेव्हां आपल्यावर दुःखें येतांत, तेव्हां ख्रिस्ताची पुरेशी जी कृपा ती पूर्णतेस येऊन तिचा गौरव वाढतो. जर आपण आपल्या सर्व संकटांत त्याच्यावर विसंबून राहतो, आणि आमचा जो “आशेचा हर्ष” त्यांस तोच बळकट करतो, तर तो कृपा आणि सामर्थ्य यांचा संतोषकारक पुरवठा करणारा देव आहे हे प्रदर्शित केलें जाते.
जर आपण त्याला बळकटपणें धरून राहतो तर, “जेव्हा ह्या जगातील सर्व आशा सोडून जातांत,” तेव्हां आपण दाखवून देतो कीं आपण गमावलेल्या सर्व जगिक गोष्टींपेक्षा आपल्याला तो अधिक हवा हवासा आहे.
ख्रिस्ताने दुःख सहन करित असलेल्या ह्या प्रेषिताला म्हटलें, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठीं दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे” (2 करिंथ 12:9-10).
अशाप्रकारे देवानें दु:ख हे ख्रिस्ती विश्वासनार्यांनी स्वतःवर अवलंबून न राहता केवळ कृपेवर अवलंबून राहावें म्हणून केवळ नव्हें, तर त्या कृपेवर जोर द्यावा आणि तिला तेजस्वी स्वरूप द्यावें ह्या हेतूनें देखील त्यानें ते योजिलें आहे. विश्वास आम्हांमध्यें हीच कृति घडवून आणतो : तो ख्रिस्ताच्या भावी कृपेला उंचवितो.
देवामध्यें असलेल्या आपल्या जीवनाच्या खोल गोष्टींचा शोध आपल्याला दुःखातच लागतो आणि त्यांचा गौरव करतो.
ह्या कारणामुळें ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीं तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. (इब्री 2:1)
आपल्यांपैकीं प्रत्येकाला हे ठाऊकच आहे कीं वाहवत जाण्याच्या घटना झाल्यां आहेत. कोणतीही तत्परता नाहीं. दक्षता घेणें नाहीं. लक्ष लावून ऐकणें किंवा ऐकलेल्या गोष्टींवर काळजीपूर्वक विचार करणें नाहीं, कीं येशू ह्याच्यावर आपलें लक्ष केंद्रित करणें नाहीं, आणि परिणामी विश्वासांत टिकाव धरून उभें न राहता त्यांपासून वाहवत जाणें.
येथे तोच मुद्दा आहे : ते विश्वासांत टिकाव धरून राहत नाहींत. जगिक जीवन म्हणजें काहीं सरोवर नाहीं. ते एका नदीप्रमाणें आहे. आणि ते विनाशाकडे वाहवत जात आहे. येशू काय म्हणतो त्याकडे जर तुम्हीं विशेष लक्ष लावत नाहीं आणि प्रती दिवशी त्याजवर चिंतन-मनन करित नाहीं आणि क्षणोक्षणी त्याच्याकडे आपली दृष्टि लावलेली ठेवित नाहीं तर तुम्हीं टिकाव धरणार नाहीं; तुम्हीं मागे जाल. तुम्हीं ख्रिस्तापासून दूर जाल.
वाहवत जाणें ही ख्रिस्ती जीवनासाठीं विनाशकारक गोष्ट आहे. आणि जसे इब्री 2:1 सांगते, यावर एकच उपाय आहे : तुम्हीं ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावा. म्हणजेंच, देव त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारें काय म्हणत आहे त्यावर काळजीपूर्वक विचार करा. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारें देव जें बोलत आहे आणि जें करत आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित करा (किंवा पाहत असावे).
हे कौशल शिकणें म्हणजें नदींत पोहण्यासाठीं हात-पाय मारण्याचे कौशल शिकण्याइतके कठीण नाहीं. फक्त एक गोष्ट जी आपल्याला ह्या पापी संस्कृतीच्या विपरीत दिशेनें पोहण्यास प्रतिरोध करते ती म्हणजें पोहण्यासाठीं हात-पाय मारण्यांस लागणारे परिश्रम नाहीं तर प्रवाहाबरोबर जाण्याची आपली पापी प्रवृत्ती, ही मूळ समस्या आहे.
देवानें आपल्याला कठीण काम दिलें, अशी तक्रार आपण करू नये. ऐका, त्यावर काळजीपूर्वक विचार करा, आपले लक्ष केंद्रित करा (किंवा पाहत असा)— याला तुम्हीं कठीण कामाचे विवरण म्हणू शकत नाहीं. खरे पाहता, हे कामाच्या स्वरूपाचे वर्णन नाहीं. आपण येशूनें केलेंल्या कामामध्यें संतुष्ट असावे यासाठीं हे एक निकडीचे पाचारण आहे जेणेंकरून आपण आपल्या फसव्या इच्छांनी बहकून जाऊ नये.
जर तुम्हीं आज वाहवत जात असाल, तर तुमचा नव्याने जन्म झाला आहे या आशेच्या लक्षणांपैकीं एक म्हणजें हे वाचल्यावर तुम्हांला तुमच्या अं:तकरणात टोचल्यासारखे जाणवत आहे आणि आपण येशूकडे आपली दृष्टि फिरवावी आणि त्याच्याकडे आपलें लक्ष्य केंद्रित करावें आणि दिवसोंदिवस, महिनोन्महिने, आणि वर्षानुवर्षे त्याचे पूर्ण लक्ष देऊन ऐकावें अशी कळकळीची उत्कंठा तुमच्यांत वाढत चालली आहे.
"हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केलीं; परंतु त्यानें मला म्हटलें आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. (2 करिंथ 12:8-9)
ख्रिस्ती लोकांना छळवणूकमुळें उद्भवणारी संकटें व दुःखें यांमुळें ज्यां वेदना सोसाव्या लागतांत त्यां कर्करोगामुळें सोसाव्या लागणाऱ्या वेदनांसारख्यांच असतांत का? जर देवानें एखाद्या गोष्टी संदर्भात काहीं अभिवचनें दिलीं तर ती दुसऱ्या गोष्टींवर देखील लागू होतांत का? माझे उत्तर होय आहे. संपूर्ण जीवन, जेव्हां ते देवाच्या गौरवासाठीं आणि इतरांचे तारण व्हावें या कळकळीने विश्वासाद्वारें जगले जाते, तर अशा जीवनांत कोणती ना कोणती अडखळणें आणि दुःखें येतीलच. आज्ञाधारक जीवन जगण्यासाठीं ख्रिस्ती लोकांना जी किंमत मोजावी लागते, दुःखें ही त्याचा एक अविभाज्य भाग आहे जी सोसून तुम्हीं देवानें केलेंलें पाचारण अनुसरत असतां.
ख्रिस्त ज्या मार्गाने घेऊन जातो त्या मार्गाने त्याच्या मागे मागे जाण्याचा निर्धार करून, आपण या मार्गात त्यानें त्याच्या सार्वभौम इच्छेने ज्यां ज्यां गोष्टीं नेमून दिल्यां आहें त्या सर्व गोष्टी निवडतो. अशाप्रकारे, आज्ञाधारकतेच्या मार्गात येणारी सर्व दुःखें व संकटें ही ख्रिस्तासोबत आणि ख्रिस्तासाठीं सोसलेलीं दुःखें व संकटें असतांत- मग ती घरातच झालेला कर्करोग असो किंवा बाहेर अविश्वासणाऱ्यांनी मांडलेला आपला करणारा छळ असो.
शिवाय, ती आपण “निवडलेलीं” असतांत — म्हणजें, जिथें जिथें दुःख आपल्यावर येतांत तिथें तिथें आपण स्वेच्छेने आज्ञाधारकतेचा मार्ग निवडतो आणि आपण देवाविरुद्ध कुरकुर करत नाहीं. आपण अशी प्रार्थना करूं — जशी पौलाने केलीं — कीं हे दुःख माझ्यापासून दूर व्हावे (2 करिंथ 12:8); परंतु जर देवाची इच्छा असेल, तर स्वर्गाच्या मार्गावर असतांना आज्ञाधारक शिष्य म्हणून आम्हांला जी किंमत मोजावी लागते तिचा एक भाग म्हणून आम्हीं ती स्वीकारतो.
ख्रिस्ती आज्ञाधारकतेच्या मार्गात सोसावी लागणारी सर्व संकटें व दुःखें, मग ती छळामुळें उद्भवोत किंवा आजार किंवा अपघात यांमुळें उद्भवोत, त्यां सर्वांचा स्वभावगुण हा एकच आहे : ती सर्व देवाच्या चांगुलपणावर आपल्या विश्वासाला धोका निर्माण करतांत आणि आपण आज्ञाधारकतेचा मार्ग सोडून द्यावा म्हणून प्रवृत्त करतांत.
म्हणून, विश्वासाचा आपला प्रत्येक विजय, आणि आज्ञाधारकतेमध्यें आपली सर्व चिकाटी, ही सर्व देवाच्या चांगुलपणाची आणि ख्रिस्तच आमच्यासाठीं सर्वकाही आहे याची साक्ष देतांत - मग तो शत्रू आजार, सैतान, पाप असो किंवा विध्वंस असो. म्हणून, आपल्या ख्रिस्ती पाचारणाच्या मार्गात आपण सहन करत असलेलीं सर्व दुःखें, नाना प्रकारची सर्व दुःखें ही “ख्रिस्ताबरोबर” आणि “ख्रिस्तासाठीं” आहेंत.
त्याच्याबरोबर या अर्थाने कीं आपण त्याच्याबरोबर विश्वासाने चालत असताना दुःखें आपल्यावर येतांत, आणि या अर्थाने देखील कीं आपण ती सर्व दु:खें त्यां सामर्थ्याने सहन करतो जो तो आपल्याला त्याच्या सहानुभूतीपूर्ण महायाजकीय सेवेद्वारे पुरवतो (इब्री 4:15).
आणि त्याच्यासाठीं या अर्थाने कीं ही दुःखें आपण त्याचा चांगुलपणा आणि सामर्थ्य यांवर किती विश्वास ठेवितो याची कसौटी घेऊन तो प्रमाणित केला जातो, आणि या अर्थाने देखील कीं ही दुःखें तोंच सर्वांमध्यें सर्वकाही भरून काढतो याबाबतींत त्याची योग्यता प्रकट करतांत.
“मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाहीं.” (मार्क 10:29-30)
येथें येशूच्या बोलण्याचा अर्थ असा आहे कीं तुमच्या प्रत्येक बलिदानाची परतफेड तो स्वतःने भरून काढील.
जें तरुण मिशनरी होऊं पाहत आहें, त्यांना येशू म्हणतो, "मी अभिचचन देतों कीं मीं तुमचे सर्व श्रम साध्य करीन, आणि तुम्हांबरोबर असा राहीन कीं तुम्हीं कधी कोणत्या गोष्टीचा त्याग केला असे तुम्हीं म्हणूंच शकणार नाहीं."
पेत्रानें आपली “त्याग” करण्याची भावना व्यक्त केलीं त्यावेळी येशूचा विरोधी-पवित्रा काय होता? पेत्र म्हणाला, "पाहा, आम्हीं सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत" (मार्क 10:28). येशूनें “आत्मत्याग” करण्याची जी आज्ञा आम्हांला दिलीं त्या आत्मत्यागाची ही भावना आहे का? नाहीं, त्यानें अशा भावनेला फटकारलें.
येशू पेत्राला म्हणाला, "ज्याची मी शंभरपटीने परतफेड करणार नाहीं असा त्याग माझ्यासाठीं कोणीही कधीच करूं शकत नाहीं- होय, एका अर्थाने या जीवनातच, येणाऱ्या युगात जे सार्वकालिक जीवन मिळेल त्याची तर बातच नको."