
Sign up to save your podcasts
Or


“ह्या मेंढवाड्यातली नाहींत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत…...” (योहान 10:16)
जगातील प्रत्येक लोकगटांत देवाचे निवडलेलें लोक आहेत. ज्यां सामर्थ्यानें त्यानें हे विश्व निर्माण केलें त्याच सामर्थ्यानें तो त्यांना सुवार्तेद्वारें हाक मारून बोलावितो, आणि ते विश्वास ठेवतांत! पृथ्वीच्या सीमांवर असलेल्या आव्हानात्मक प्रांतांत नैराश्येवर मात करण्यासाठीं सामर्थ्य मिळावे म्हणून या शब्दांमध्यें किती ताकद आहे!
पीटर कॅमेरॉन स्कॉट यांचा मिशनरी इतिहास या बाबतींत एक चांगले उदाहरण आहे. स्कॉट यांचा जन्म 1867 मध्यें ग्लासगो येथे झाला. त्यांनी आफ्रिका-इनलँड मिशनची स्थापना केलीं. पण आफ्रिकेत सुवार्ता प्रसाराची त्यांची सुरुवात ही मुळीच अनुकूल किंवा आशादायक नव्हतीं.
आफ्रिकेला त्यांचा पहिला प्रवास मलेरियाच्या तीव्र आक्रमणामुळें अर्ध्यावर संपुष्टात आला आणि त्यांना घरी परतावे लागलें. आजारातून बरे होतांच त्यांनी पुन्हां आफ्रिकेला जाण्याचा बेत केला. हा दुसरा प्रवास त्यांच्यासाठीं विशेष समाधान देणारा होता कारण यावेळी त्यांचा भाऊ जॉन सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाला. पण कांहीं दिवसातच जॉन आजारी पडला.
असहाय झालेंल्यां पीटरनें आपल्या भावाला आफ्रिकन भूमीत पुरलें आणि अशा दु:खाच्या प्रसंगी देखील त्यांनी आफ्रिकेत सुवार्ता सांगण्यासाठीं स्वतःला पुन्हा समर्पित केलें. परंतु त्यांची प्रकृती पुन्हा बिघडलीं आणि विवश होऊन त्यांना इंग्लंडला परतावे लागलें.
त्या दिवसांत ते ज्यां उजाडपणा आणि नैराश्यांमुळें विव्हळ झालें त्यांतून ते कसे बाहेर निघणार होते? त्यांनी देवासाठीं समर्पित होण्याचा निश्चय केलेंला होता. पण आफ्रिकेला परत जाण्याचे सामर्थ्य त्यांना कुठून प्राप्त होणार होते? मनुष्याला हे अशक्य होते!
त्यांना हे सामर्थ्य वेस्टमिन्स्टर ॲबे याठिकाणी मिळालें. डेव्हिड लिव्हिंगस्टोनची कबर आजही तिथें आहे. स्कॉट यांनी शांतपणें वेस्टमिन्स्टर ॲबे मध्यें प्रवेश केला, त्यांना ती कबर आढळलीं आणि प्रार्थना करण्यासाठीं त्यांनी कबरेसमोर गुडघे टेकले. त्यावर असा शिलालेख होता:
ह्या मेंढवाड्यातली नाहींत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत
ते एका नव्या आशेनें उत्तुंग होऊन उभें झालें, आणि आफ्रिकेला परतलें. आणि आज, शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही, त्यांनी स्थापन केलेंलीं मिशनरी संस्था आफ्रिकेत सुवार्तेसाठीं संजीवनाचे कार्य करणारे व वाढत चाललेलें कार्यदल आहे.
जर तुम्हांला सर्वात मोठा आनंद देवाच्या भरभरून वाहणाऱ्या कृपेचा अनुभव घेण्यात असेल, कीं जेणेंकरून ती इतरांच्या कल्याणार्थ तुमच्याकडून ओसंडून वाहावी, तर जगातील सर्वात शुभ वृत्त हे आहे कीं देव सुवार्ताविरहित लोकांपर्यंत त्यांच्या तारणानिमित्त पोहोचावे म्हणून तुमच्यासाठीं अशक्य असलेल्यां गोष्टीं तुमच्याठायीं शक्य करील.
"देवाला सर्वकाही शक्य आहे." (मार्क 10:27)
देवाची सार्वभौम कृपा ही ख्रिस्ती पूर्णानंदासाठीं जीवनाचा झरा आहे. कारण ख्रिस्ती पूर्णानंदाच्या शोधांत असलेल्या व्यक्तीला सर्वात अधिक प्रिय असलेली गोष्ट म्हणजें ही कीं देवाच्या सार्वभौम कृपेचा आस्वाद त्याला भरून काढतो आणि त्याच्याद्वारे इतरांचेहि कल्याण व्हावे म्हणून तो झरा त्याच्यांतून विपुलपणें वाहतो.
ख्रिस्ती पूर्णानंदाच्या शोधांत असलेला प्रत्येक सुवार्तिक "ते मी केलें असे नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेनें केलें" (1 करिंथ 15:10) ह्या सत्याचा आस्वाद घेण्यांस आतुर असतो. त्यांनी सुवार्तेसाठीं घेतलेल्यां श्रमाचे फळ हे पूर्णपणें देवाकडून आहे या सत्यांत ते आनंद करतांत (1 करिंथ 3:7; रोम 11:36).
जेव्हा प्रभू म्हणतो, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाहीं” (योहान 15:5) तेव्हा या गोष्टीचा त्यांना अति आनंद होतो. एका नव्या सृष्टीची निर्मिती करण्याचा अशक्य भार देवानें त्यांच्या खांद्यावर न टाकता तो त्यानें स्वतःवर घेतला आहे हे सत्य जाणून घेतल्यावर ते निरागस कोकऱ्यांप्रमाणें आनंदाने उडी मारतात. आपल्या मनांत न गोंधळता, ते म्हणतात, “आम्हीं स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे” (2 करिंथ 3:5).
जेव्हा ते काहीं काळ रजा घेऊन विश्रांतीसाठीं घरी येतात, तेव्हां ते मोठ्या आनंदाने भारावून जाऊन पाठवणाऱ्या मंडळीला आपल्या यशाचा समाचार या शब्दांत देतांत, “ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाहीं; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्यानें माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो” (रोम 15:18).
"देवाला सर्वकाही शक्य आहे!" –हे शब्द समोरून आपल्याला आशा देतांत, तर पाठीमागून आम्हांला दीन अं:तकरणाचे बनवितांत. ते आमच्या नैराश्यासाठीं रोगप्रतिकारक आणि अभिमानासाठीं रोगप्रतिकारक असे आहेत – म्हणजें सुवार्तीकांसाठीं एक सार्थक व परिपूर्ण औषध.
पण आपल्यां अपराधांमध्यें मृत झालों असतांहि (देवानें) ख्रिस्तामध्यें आपणांस जीवंत केलें व कृपेनेच तुमचें तारण झालें आहे. (इफिस 2:5)
महान प्रेषितीय किंवा मिशनरी आशा ही आहे कीं जेव्हां पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानें सुवार्ता सांगितली जाते, तेव्हां जे मनुष्याला करणें अशक्य आहे ते देव स्वत: करतो : तो आम्हांमध्यें तारणदायी विश्वास निर्माण करतो. मनुष्याचे पाचारण जे करू शकत नाहीं ते देवाचे पाचारण करते. त्याची पाचारण मृतांना जिवंत करते. ती आध्यात्मिक जीवन उत्पन्न करते. येशूनें कबरेंत मृत पडलेल्या लाजराला “बाहेर ये” अशी जी हाक मारली त्याच हाकेसारखी ही हाक आहे. आणि मृत पडलेल्या माणसाने त्याची आज्ञा पाळली आणि बाहेर आला. ह्या हाकेने जीवन उत्पन्न करून आज्ञाधारकपणा उत्पन्न केला (योहान 11:43). प्रत्येक मनुष्य असाच तारला जातो.
आपण हाक मारून एखाद्याला झोपेतून उठवू शकतो, परंतु देवाचे पाचारण (हाक) ज्यां गोष्टीं नाहीं त्यां गोष्टीं अस्तित्वात आणावयांस समर्थ आहे (रोमकरांस 4:17). देवाचे पाचारण या अर्थाने अप्रतीरोध्य आहे कीं ते सर्व प्रतिकारांवर मात करण्यांस समर्थ आहे. देवाच्या सत्संकल्पानुसार हे पाचारण चमत्कारीकरित्या प्रभावी आहे – इतके कीं पौलानें म्हटलें, “आणि [देवानें] ज्यांना पाचारण केलें त्यांना त्यानें नीतिमानहि ठरवलें” (रोमकरांस 8:30), तथापि आपण केवळ विश्वासाने नीतिमान ठरविलें जातो.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यांस, देवाचे पाचारण इतके प्रभावी असते कीं ते न चुकता आम्हांमध्यें तो विश्वास निर्माण करते ज्याद्वारे आपण नीतिमान ठरविले जातो. रोमकरांस 8:30 च्या प्रमाणें पाचारण करण्यांत आलेल्यां सर्वांना नीतिमान ठरविले जाते. परंतु विश्वासावांचून कोणीही नीतिमान ठरविला जात नाहीं (रोमकरांस 5:1). म्हणून देव ज्यां हेतूनें पाचारण करतो त्याचा तो हेतू पूर्ण झाल्यावांचून राहत नाहीं. तो अप्रतीरोध्यपणें असा विश्वास अस्तित्वात आणतो ज्या द्वारे तो आम्हांला नीतिमान ठरवतो.
मनुष्य हे करू शकत नाहीं. हे त्याच्यासाठीं अशक्य आहे. पाषाणरुपी-हृदय फक्त देवच काढू शकतो (यहेज्केल 36:26). केवळ देवच लोकांना पुत्राकडे आकर्षित करू शकतो (योहान 6:44, 65). केवळ देवच आध्यात्मिकरित्या मृतावस्थेंत असलेलें अंत: करण उघडू शकतो जेणेंकरून ते सुवार्तेच्या सांगण्याकडे लक्ष देईल (प्रेषितांची कृत्ये 16:14). केवळ उत्तम मेंढपाळ, जो ख्रिस्त, आपल्या मेंढरांना ओळखतो, आणि त्यांना नावाने एका अशा आकर्षक शक्तीने हाक मारतो कीं ते सर्व त्याच्या मागे येतांत - आणि त्यांचा कधीही नाश होत नाहीं (योहान 10:3-4, 14).
देवाची सर्वोच्च सार्वभौम कृपा, जी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे मनुष्याला अशक्य असलेली गोष्ट अस्तित्वात आणते, ही महान प्रेषितीय किंवा मिशनरी आशा आहे.
री मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे.पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें. (इफिस 5:24-25)
देवानें वैवाहिक जीवनासाठीं प्रीतिचा एक अनुकरणीय आदर्श नेमून दिलेला आहे.
पती-पत्नीच्या भूमिका सारख्या नसतांत. पतीने मंडळीचा मस्तक असलेल्या ख्रिस्ताकडून त्याच्यासाठीं ठरविलेलें सुत्रे घायची आहें. तर पत्नीने ख्रिस्ताच्या अधीन असलेल्या मंडळीसाठीं देवानें जो नमुना दिला आहे त्यापासून तिनें तिचे सुत्रे घायची आहें.
असे केल्यानें, पापांत झालेंल्या पतनाची दुष्टायी आणि त्याचे विनाशकारी परिणाम पालटू लागतांत. पापांत झालेंल्यां पतनामुळें स्त्रीचे मस्तक म्हणून पुरुषाची वात्सल्यमय भूमिका पालटून काही पुरुषांमध्यें तिने जुलूमशाही वर्चस्वाचे विकृत रूप घेतलें आहे, तर इतर पुष्कळ पुरुषांमध्यें तिचे रुपांतर आपल्या कर्तव्याशी हलगर्जीपणा बाळगण्यांत झाला. या पतनामुळें स्त्रीचे शहाणपण आणि ऐच्छिक अधीनता विकृत होऊन तिचे रुपांतर काहीं स्त्रियांमध्यें कावेबाज व कारस्थानी वृत्तीत झालें आहे तर इतर काहीं स्त्रियांमध्यें निर्लज्ज मुजोरी आणि दबंगपणाची वृत्ती निर्माण झालीं आहें.
पापाच्या या बंधनापासून सोडविणारा मशीहा काळाची पूर्णता झाल्यावर जेव्हां येशू ख्रिस्तामध्यें प्रकट होणार होता तेव्हा आम्हीं ज्या मुक्तीची प्रतीक्षा करित होतो ती मुक्ती म्हणजें स्त्रीचे मस्तक म्हणून पुरुषाची वात्सल्यमय भूमिका आणि स्त्रीची ऐच्छिक अधीनता ह्या व्यवस्थेचा विध्वंस करण्यासाठीं नव्हती तर ती पुन्हा स्थापित व्हावी म्हणून होती. पत्नींनो, आनंदी मंडळीसाठीं देवानें जो कित्ता घालून दिला आहे त्याचे अनुकरण करून तुम्हीं तुमच्या पतन पावलेल्या अधिनस्थ भूमिकेची पुनर्स्थापना करा! पतींनो, प्रीतिनें भरलेला ख्रिस्त असा जो मंडळीचा प्रेमळ मस्तक म्हणून देवानें जो आदर्श तुमच्यापुढे मांडीला त्याचे अनुकरण करून तुम्हीं तुमच्या पतन पावलेल्या मस्तकपणाच्या भूमिकेची पुनर्स्थापना करा!
मी इफिस 5:21-33 मध्यें या दोन गोष्टी पाहतो: (1) वैवाहिक जीवनांत ख्रिस्ती पूर्णानंद काय आहे याचे दर्शन आणि (2) आणि त्याच्या प्रेरक-शक्तीचा उद्गम.
पत्नींनो, तुमच्या वैवाहिक नात्यातील "मस्तक" किंवा पुढारी म्हणून देवानें तुमच्या पतींना जी भूमिका नेमून दिलीं आहे ती मान्य करून आणि त्याला पूर्ण सन्मान देऊन तुमच्या पतीच्या आनंदात तुमचा आनंद शोधा. पतींनो, जसे ख्रिस्तानें मंडळीचे पुढारपण केलें आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें अगदी तसेच पुढारपण करण्याची आपली जबाबदारी स्वीकारून तुमच्या पत्नीच्या आनंदात तुमचा आनंद शोधा.
मी आनंदाने माझ्या आयुष्यात देवाच्या चांगुलपणाची साक्ष देऊं इच्छितो. 1968 मध्यें माझे लग्न झालें त्याच वर्षी मला ख्रिस्ती पूर्णानंदाचा शोध लागला. तेव्हापासून, नोएल आणि मी, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहून, आम्हीं शक्य तितक्या आवेशाने, पूर्णपणें चिरस्थायी असलेल्या आनंदाचा एकमेकांमध्यें शोध करित आलेले आहों. जरी अपूर्णपणें, तर पुष्कळ प्रसंगी अर्ध्या मनाने का होईना, आम्हीं एकमेकांच्या आनंदातच स्वतःचा आनंद लुटला आहे.
आणि आम्हीं लग्नाच्या जवळजवळ 50 वर्षांनंतर एक मनानें अशी साक्ष देऊ शकतो : जे लग्न करण्याचा विचार करित आहेत त्यांना आमचा संदेश हा कीं तुमचा मनोरथ साध्य करण्याचा हाच मार्ग आहे. माझ्या आणि नोएलच्या बाबतींत, विवाह म्हणजें ख्रिस्ती पूर्णानंदाचा आवश्यक घटक आहे. जेव्हां एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराच्या आनंदात आपल्या आनंदाचा शोध घेतो आणि देवानें नेमून दिलेली आपली भूमिका पार पाडतो, तेव्हा ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नात्याचा दृष्टांत म्हणून विवाहाचे रहस्य त्याच्या महान गौरवासाठीं आणि आपल्या महान आनंदासाठीं प्रकट होते.
“म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.” हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे. (इफिस 5:31-32)
येथे इफिस 5:31 मध्यें पौल उत्पत्ति 2:24 चा संदर्भ घेत आहे, जे मोशे बोलला - आणि येशूनें म्हटलें कीं ही वचनें मोशेद्वारे देव बोलला (मत्तय 19:5) - “ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.” पौल म्हणतो कीं देवाचे हे वचन, जे देव मनुष्याचे पापात पडण्यापूर्वी बोलला, ख्रिस्त आणि मंडळीला संबोधून आहे आणि म्हणून यांत एक मोठे रहस्य दडलेलें आहे.
याचा अर्थ असा आहे कीं जेव्हां देवानें पुरुष आणि स्त्री यांना बनवलें आणि विवाहाद्वारे त्यांनी एकदेह व्हावें हे ठरविलें, तेव्हा त्यानें फासा टाकून किंवा एक रुपयाचे नाणें हवेत फेकून ते एकमेकांशी कसे संबंधित असावेंत असा नशिबी खेळ खेळला नाहीं. देवानें आपला पुत्र आणि मंडळी यांच्यातील नातेसंबंधाचा नमुना सादर करून अतिशय हेतुपुरस्सर विवाहाचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे, ज्याची योजना त्यानें जगाचा पाया घालण्यापूर्वी केलीं होती.
म्हणून, विवाह हे रहस्य मोठे आहे - आपण जे बाह्यरूपाने पाहतो त्यापेक्षा कितीतरी मोठा असा गूढ अर्थ त्यात सामावलेला आहे. देवानें पुरुष आणि स्त्री यांना बनवलें आणि विवाह संस्थेची स्थापना केलीं ती यासाठींच कीं ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्यातील सार्वकालिक करार-बद्ध नात्याचे प्रतिबिंब त्यांच्या वैवाहिक एकदेहाद्वारे दिसून यावें.
पौलानें या रहस्यातून काढलेला निष्कर्ष असा कीं वैवाहिक जीवनांत पती-पत्नींची एकमेकांप्रत असलेली कर्तव्यें ही अहेतुकपणाने किंवा स्वैराचाराने ठरवली जात नाहींत, तर ती ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांची एकमेकांप्रत असलेली अद्वितीय कर्तव्यें यांत मुळावलेली आहेत.
आपल्यांपैकीं जे विवाहित आहेत त्यांनी वारंवार यावर चिंतन करण्याची गरज आहे कीं आपण आपल्या वैवाहिक जीवनातून वैवाहिक संबंधात असलेल्या आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या आणि महान अशा अद्भुत दैवीय वास्तविकतेचे प्रतिबिंब दाखवावे असा विशेषाधिकार देव आपल्याला देतो ही गोष्ट किती रहस्यमय आणि आश्चर्यकारक आहे.
हेंच ते ख्रिस्त आणि मंडळी यांचे रहस्यमय नाते आहे जे आमच्यासाठीं प्रीतिच्या नमुन्याचा पाया आहे ज्याविषयी पौल बोलत आहे. प्रत्येक जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधला पाहिजे असे म्हणणें पुरेसे नाहीं. हे खरे आहे. पण ते पुरेसे नाहीं. हे सांगणें देखील तितकेच महत्त्वाचे आहे कीं पती-पत्नींनी आपल्या वैवाहिक जीवनातून जाणीवपूर्वक ख्रिस्त आणि मंडळी यांच्यासाठीं देवानें ठरविलेल्या नातेसंबंधाचे प्रतिबिंब प्रदर्शित केलें पाहिजे. म्हणजेंच, प्रत्येक जोडप्याने ख्रिस्त आणि मंडळीसाठीं देवानें तयार केलेंल्या शुद्ध आणि आनंदी आलेखाच्या विशिष्ट नमुन्यानुसार आपले वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण अविवाहित असा अगर विवाहित, वृद्ध असा अगर तरुण, मला आशा आहे कीं तुम्हीं हे गांभीर्याने घ्याल. करार-पाळणारा ख्रिस्त आणि त्याचा करार-पाळणारी मंडळी यांच्या रहस्याचे प्रकटीकरण त्यावर टिकलेले आहे.
ह्यास्तव तुम्हीं ह्या प्रकारे प्रार्थना करा :‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (मत्तय 6:9)
प्रभूनें शिकविलेल्यां प्रार्थनेत, येशूनें शिकवलें कीं प्रार्थना करताना प्रथम प्राधान्य म्हणजें आपल्या स्वर्गीय पित्याला त्याचे नाव पवित्र मानले जावो अशी प्रार्थना करणें : आम्हांमध्यें, मंडळीत, जगात आणि सर्वत्र.
लक्षात घ्या कीं ही एक याचिका आहे, विनंती आहे. ही घोषणा किंवा भव्य स्वागत नाहीं. ही स्तुतीची अभिव्यक्ती नाहीं, तर याचना आहे. वर्षानुवर्षे मी प्रभूच्या प्रार्थनेचे चुकीचे वाचन करत आलेला आहे कीं जणू तिची सुरुवात स्तुतीने होते : "देवाची स्तुती करा, परमेश्वराचे नाव पवित्र, आदरणीय, व पराक्रमी आहे!" पण ती स्तुती नाहीं. ती प्रार्थना आहे. ती देवाला विनवणी आहे कीं त्याचे स्वतःचे नाव पवित्र मानले जात आहे ह्याची त्यानें खात्री करून घ्यावीं.
हे अगदी मत्तय 9:38 मधील एका आणखी शास्त्रलेखाप्रमाणें आहे, जिथे येशू आपल्याला पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करावयास सांगतो. आपण जे कामकरी आहों त्यां आम्हीं पिकाच्या धन्याला, ज्याला कापणीचे ज्ञान आमच्यापेक्षा जास्त आहे, त्यानें आपल्या कापणीस आणखी कामकरी पाठवून द्यावेत अशी प्रार्थना आपण त्याला करावीं असा बोध आम्हांला करण्यांत यावा ही गोष्ट मला नेहमीच आश्चर्यचकित करून सोडते.
पण इथे प्रभूच्या प्रार्थनेत हीच गोष्ट नाहीं का—येशू आपल्याला सांगत आहे कीं देवाला, जो आपल्या नावाच्या प्रतिष्ठेसाठीं इतका इर्ष्यावान आहे, त्याचे नाव पवित्र मानले जावे याची त्यानें स्वतः खात्री करून घावीं अशी आपण प्रार्थना करावीं, ज्याचा अर्थ आहे प्रतिष्ठित मानलें जावें, आदरणीय मानलें जावें, अति मौल्यवान म्हणून गौरविले जावें?
कदाचित आपल्याला याचे आश्चर्य वाटेल, परंतु ते असेच आहे. आणि यातून आपण दोन गोष्टी शिकतो.
1. पहिली ही कीं प्रार्थना देवाला त्यां गोष्टी करण्यास प्रवृत्त करत नाहीं ज्यां त्याला करायच्या नसतांत, किंवा ज्या करण्यांस तो नाखूष आहे. त्याचे नाव पवित्र मानलें जावें हा त्याचा पावित्राच (अगदी मूळ उद्देश) आहे. देवानें ज्यां ज्यां गोष्टींना प्राधान्य दिलें आहे त्यांत ह्यापेक्षा सर्वप्रथम असें काहीही नाहीं. पण तरीही आपण तशी प्रार्थना करावीं.
2. दुसरी म्हणजें ही कीं प्रार्थना हा देवाचा तो मार्ग आहे ज्याद्वारे तो आपलें प्राधान्य त्याच्या प्रधान्याशी सुसंगत बनवितो. जेव्हा आमच्या प्रार्थना त्याच्या महान उद्देष्ट्याशी सुसंगत परिणाम म्हणून समोर येतांत तेव्हा आपल्या प्रार्थनेने उद्भवणारे परिणाम याद्वारे महान गोष्टी घडवून आणाव्यात ही देवाची इच्छा आहे.
आपले नांव पवित्र मानले जावें अशी जी देवाची ईर्ष्या आहे त्याशी तुमचे अंतःकरण सुसंगत करा म्हणजें तुमच्या प्रार्थना मोठ्या परिणामकारक ठरतील. तुमची पहिली आणि खात्रीदायक प्रार्थना देवाचे नांव पवित्र मानलें जावें यासाठींच असू द्या म्हणजें तुमच्या प्रार्थना त्याला त्याच्या नावासाठीं असलेल्या सामर्थ्यवान ईर्षेबरोबर सुसंगत होतील.
कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेंला नाहीं; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. (इफिस 5:29-30)
ती शेवटची अभिव्यक्ती चुकवू नका : "कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत." आणि पौलाने अगदी दोन वचनांपूर्वी जे म्हटलें ते विसरू नका, ते हे कीं ख्रिस्तानें स्वतःस आपल्यासाठीं समर्पण केलें, अशासाठीं कीं “गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी.” अशाप्रकारे पौल ही गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने मांडून हे स्पष्ट करतो कीं ख्रिस्तानें आपल्या लोकांना पवित्र करून, त्यांना सुशोभित करून व त्यांना आपला आनंद देऊन स्व:ताचा आनंद साध्य केला आहें.
ख्रिस्त आणि त्याची वधू यांच्यातील नाते इतके घनिष्ठ आहे ("एकदेह") कीं तो जे काहीं चांगले तिच्यासाठीं करतो ते जणू त्यानें स्वतःसाठीं केलेंले सत्कर्म ठरते. याचा अर्थ असा कीं, परमेश्वर आपल्या वधूचे पालनपोषण, भरण-पुरण, पवित्रीकरण आणि शुद्धीकरण करण्यास प्रवृत्त होतो ते यासाठीं कारण यातच त्याचा आनंद आहे असेच हा शास्त्रपाठ स्पष्टपणें अभिव्यक्त करत आहे.
आपण जर काहीं लोकांच्या व्याख्यांवर दृष्टि टाकली, तर त्यांच्यामते ही प्रीति असू शकत नाहीं. ते म्हणतांत, प्रीति ही स्वार्थ शोधापासून मुक्त असली पाहिजे - विशेषतः जशी प्रीति ख्रिस्तानें केलीं ती, विशेषत: कॅल्व्हरी वर प्रकट झालेंलीं प्रीति. प्रीतिची अशी व्याख्या जी पवित्र शास्त्राच्या या पाठाबरोबर सुसंगत होईल, मी कधीही पाहिली नाहीं.
तरीही ख्रिस्त आपल्या वधूसाठीं जे करतो, ती प्रीति आहे असे हा शास्त्रपाठ स्पष्टपणें उघड करतो : “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा. . . (इफिस 5:25). प्रीतिची व्याख्या नीतीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान यांच्या मदतीने करण्याऐवजी आपण ह्या शास्त्रपाठालाच प्रीतिची व्याख्या करूं दिलीं तर? या शास्त्रपाठानुसार, प्रीति म्हणजें आपल्या प्रेयसीच्या पवित्र आनंदातच ख्रिस्ताचा आनंदाचा शोध (म्हणजें ख्रिस्त त्याच्या वधूच्या शुद्धीकरणात आपला आनंद शोधतो).
तर मग, आत्मकेंद्रीत आनंद आपण प्रीतिपासून विभक्त करावा याचा कोणताही मार्ग नाहीं, कारण आत्मकेंद्रीत आनंद आणि स्वार्थ या दोन्हीं गोष्टीं वेगवेगळ्या आहें. स्वार्थ हा इतरांना तरवारीच्या धारेवर धरून स्वतःचा खाजगी आनंद शोधतो.
ख्रिस्ताच्या प्रीतिसारखी प्रीति ही इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधते - त्यांना तरवारीच्या धारेवर धरून नाहीं. ही अशी प्रीति आहे जी आपल्या प्रेयसीच्या जीवनात आणि पवित्रतेमध्यें तिचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आपल्या प्रियकरासाठीं दुःख सहन करेल आणि मरणही सोसेल.
ख्रिस्ताने आम्हांवर अशीच प्रीति केलीं आणि आपणही एकमेकांवर अशीच प्रीति करावीं यासाठीं त्यानें आपल्याला पाचारण केलें आहें.
पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी तुम्हींही आपापल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं आणि स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें, अशासाठीं कीं, तिला त्यानें वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजें तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. (इफिस 5:25-27)
वैवाहिक जीवनात इतकीं दुःखें येतांत ते ह्यामुळें नाहीं कीं पती-पत्नी आपापल्या सुखाच्या शोधांत असतांत, तर ती ह्यामुळें कीं ते आपलें सुख आपल्या जोडीदाराच्या सुखामध्यें शोधत नाहींत. पती-पत्नींना बायबलची आज्ञा ही आहे कीं तुम्हीं तुमच्या जोडीदाराच्या आनंदातच तुमचा स्वतःचा आनंद शोधावा.
इफिस 5:25-30 मध्यें वैवाहिक जीवनाविषयी जो शास्त्रपाठ आहे त्यापेक्षा बायबलमध्यें इतरत्र क्वचितच अशा पूर्णानंदाला संबोधित करणारा शास्त्रपाठ असेल. जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केलीं तशी पतींनीही आपापल्या पत्नीवर प्रीति करावी असे त्यांना येथें सांगण्यांत आलें आहें.
त्यानें मंडळीवर कशी प्रीति केलीं? वचन 25 म्हणते कीं त्यानें "स्वतःस तिच्यासाठीं समर्पण केलें." पण का? वचन 26 म्हणते, "अशासाठीं कीं, तिला त्यानें वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे.” पण त्याला असं का करावें लागलें? वचन 27 उत्तर देते, "गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी!"
आहाहा! येथें मूळ आहे! “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यानें लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला” (इब्री 12:2). कसला आनंद? मंडळी, जी त्याची वधू आहे, तिजबरोबर विवाहाचा आनंद. रक्ताने विकत घेतलेली गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी हा आनंद.
डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही असलेली पत्नी स्वतःला सादर करावी असा येशूचा हेतू नव्हतां. म्हणून, तो आपल्या विवाहितेला पवित्र करण्यासाठीं आणि शुद्ध करण्यासाठीं मरण पत्करण्यास तयार झाला जेणेंकरून तो गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करू शकेल. त्यानें आपल्या वधूच्या कल्याणासाठीं दुःख सोसून व स्वतःस तिच्यासाठीं समर्पण करून आपला मनोरथ पूर्ण केला.
मग पौल ख्रिस्ताने जे केलें ते 28-30 या वचनांमध्यें पतींवर लागू करतो: “त्याचप्रमाणें पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करतो तो स्वतःवरच प्रीति करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेंला नाहीं; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे] आहोत.”
येशूनें पती-पत्नींना - आणि इतर सर्वांना - "जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर" असे म्हटलें होते (मत्तय 22:39). वैवाहिक जीवन ही आज्ञा पाळण्याचे अद्भुत स्थान आहे. ही आज्ञा फक्त असे म्हणत नाहीं कीं “जेव्हां” तुम्हीं स्वतःवर प्रीति करतां. तर तुम्हीं स्वतःवर प्रीति करतच आहात. जेव्हा तुम्हीं त्या व्यक्तीवर प्रीति करता जिच्याशी देवानें तुम्हाला एक-देह बनवले आहे, तेव्हा तुम्हीं स्वतःवर प्रीति करता. म्हणजेंच, तुम्हीं तुमच्या जोडीदाराच्या सर्वात मोठ्या आनंदाच्या शोध घेऊनच तुमचा सर्वात मोठा आनंद प्राप्त करून घेतां.
चोरी करणार्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे. (इफिस 4:28)
भौतिक वस्तुं मिळवून समृद्धीत कसे जगायचे याचे तीन विकल्प आहेत : (1) तुम्हीं त्यां भौतिक वस्तुं मिळविण्यासाठीं चोरी करूं शकतां; (2) किंवा तुम्हीं त्यां मिळविण्यासाठीं आपल्या हातांनी काहीं कष्ट करूं शकतां; (3) किंवा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काहीं असावे म्हणून तुम्हीं उद्योग करूं शकतां.
ख्रिस्ती विश्वासाचा अंगीकार करणारे बरेंच लोक दुसऱ्या क्रमांकाचा विकल्प घेऊन आपापलें जीवन जगतांत. आम्हांला चोरी करण्यापेक्षा किंवा उसने पैसे मागत भिकाऱ्याचे जीवन जगण्यापेक्षा स्वतः कष्ट करायला आवडते आणि आपण चोरी केलीं नाहीं व कोणाकडून उसने पैसे घेतलें नाहीं आणि प्रामाणिकपणें दिवसाचा सदुपयोग केला असा विचार करून आपल्याला काहींतरी कर्तव्यतत्पर कृती केल्याची भावना जाणवते. असे वाटणें म्हणजें काही वाईट गोष्ट नाहीं. आपल्या हातांनी काहीं उद्योग करणें हे चोरी करण्यापेक्षा किंवा “उधार कीं ज़िन्दगी” जगण्यापेक्षा कधीही चांगलेच आहे. पण प्रेषित आपल्याला हे असे स्वतःपुरते जीवन जगण्याचे आव्हान करित नाहींये.
मानव संस्कृतीतील जवळजवळ सर्वच बळें आपल्याला वरील तीनपैकीं दोन स्तरावर जीवन जगण्याचे आव्हान करतांत : मिळकतीसाठीं आपल्या हातांनी काहीं उद्योग करा. परंतु बायबल आपल्याला सातत्यानें तिसऱ्या स्तरावर आणून सोडते : गरजवंतांना देण्यास आपल्याजवळ काही असावें म्हणून उद्योग करणें. “सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीं कीं, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठीं सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे” (2 करिंथ 9:8).
देव आपल्याला सर्व गोष्टींचा विपुल पुरवठा का करतो? यासाठीं कीं आपल्या उपजीविकेसाठीं आपल्याकडे पुरेसे असावें, आणि त्या नंतर उर्वरित सर्व प्रकारच्या चांगल्या कामांसाठीं आपण देण्यांस समर्थ व्हावें, जेणेंकरून आध्यात्मिक आणि शारीरिक दुःख दूर होतील – म्हणजें क्षणिक आणि सार्वकालिक दु:खे. आमच्यासाठीं पुरेसे; इतरांसाठीं विपुल.
मुद्दा हा नाहीं कीं एखादी व्यक्ती किती कमावते. मोठ-मोठे उद्योग आणि भरपूर पगार हे आपल्या काळातील सत्य आहे आणि हे वाईटच आहेत असे नाहीं. वाईट आहे ते हा विचार करून स्वतःची फसवणूक करणें कीं आपल्याला इतका मोठा पगार मिळावा कीं आपण एक आलिशान जीवनशैली जगूं शकूं.
आपण देवाची कृपा इतरांपर्यंत वाहवत न्यावीं म्हणून देवानें आपल्याला त्याच्या कृपेच्या नलिका बनवलें आहे. पण नलिका ह्या सोन्याने मढलेल्यां असाव्यांत असा विचार करणें दुर्दैवच. नाहीं, त्यां सोन्याने मढलेल्यां नसाव्यांत. साधे पीव्हीसी (पॉलीविनाइल क्लोराईड) पाईप पुरे आहेंत. पीव्हीसी पाईप टिकाऊपणा आणि अष्टपैलूपणामुळें इतरांना विपुल पुरवठा करूं शकतात. आणि आनंद देणारा विपुल आशीर्वाद हा आपण कसे देतो ह्यांत आहे (प्रेषित 20:35).
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्यें आनंद करा. (फिलिप्पै 3:1)
आपण देवामध्यें आनंद करतो तेव्हां त्याचा गौरव होतो हें शिक्षण मला कोणी कधीही दिलें नव्हतें – कीं देवामध्यें आनंद करणें नेमकीं हीच बाब आपण करत असलेल्या देवाच्या स्तुतीला आपला ढोंगीपणा नाहीं तर देवाचा सन्मान बनवते.
पण जोनाथन एडवर्ड्स यांनी ही गोष्ट स्पष्टपणें आणि ठामपणें सांगितलीं :
देव मनुष्यांमध्यें देखील स्वतःचे गौरव करून घेतो असें दोन मार्ग आहेत : (1) तो त्यांना दर्शन देऊन. . . त्यांची समज उघडतो तेव्हां; (2) जेव्हां तो त्यांच्या अंतःकरणात आपलें वचन प्रकट करून त्यांच्याशी बोलतो तेव्हां त्याला ओळखून त्यांना होणारा हर्ष आणि आनंद, आणि त्याचा लाभ याद्वारे देवाचा गौरव केवळ त्याच्या गौरवाचे झालेंलें प्रकटीकरण याद्वारेच होत नाहीं, तर त्याच्यामध्यें जो आनंद ते करतांत त्याद्वारे सुद्धा त्याचा गौरव होतो. . .
त्याचा गौरव पाहणारे जेव्हां आनंद करतांत : तेव्हां केवळ गौरव पाहण्यापेक्षा जे त्या गौरवांत आनंदही करतांत तेव्हां त्याचा अधिक गौरव होतो. . . . जो मनुष्य देवाच्या गौरवाविषयी आपलें केवळ विचार व्यक्त करतो तो देवाचा तितका गौरव करत नाहीं जितका तो मनुष्य जो त्या गौरवाचे कौतुक करतो आणि त्यात आनंद करतो, देवाचा गौरव करतो.
हा माझ्यासाठीं एक धक्कादायक शोध होता. जर मला विश्वातील सर्वांत मौल्यवान वास्तव म्हणून देवाचा गौरव करायचा असेल तर मला त्याच्यामध्यें आनंदाचा शोध घेणें अगत्याचे आहे. उपासना करतांना आनंद करणें हा निव्वळ पर्याय नाहीं, तर उपासनेचा अत्यावश्यक घटक आहे. खरंच, उपासनेचे सार हेच - देवाच्या गौरवामध्यें आनंद करणें.
असे लोक जे देवाची स्तुती तर करतांत, परंतु आनंद न करताच त्याची स्तुती करतांत त्यांच्यासाठीं आमच्याकडें एक नाव आहे. त्यांना आपण ढोंगी म्हणतो. येशू म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला कीं, ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडें येतांत व] ओठांनी माझा सन्मान करतांत, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे’” (मत्तय 15:7-8). ही वस्तुस्थिती – कीं देवाचा खरा सम्मान म्हणजें परिपूर्ण आनंद आणि हे कीं मनुष्याच्या जीवनाचा मुख्य हेतू देवाच्या गौरवासाठीं या आनंदाचा खोलवर शोध घेणें हाच आहे - हा कदाचित मी आजवर केलेंला बंधमुक्त करणारा असा प्रचंड शोध होता.