Solid Joys

1 December: मार्ग तयार करा


Listen Later

“तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडें वळवील. बापाची अंतःकरणें मुलांकडें’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडें वळवून प्रभूसाठीं सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”  (लूक 1:16-17)

बापतिस्मा करणाऱ्या योहानाने इस्राएलसाठीं जे केलें ते नाताळाचा आगमनोत्सव आमच्यासाठीं करू शकते. तुम्हीं नाताळासाठीं तयार नाहीं असे दिसता कामा नये. माझ्या म्हणण्याचा अर्थ आध्यात्मिक तयारी न केलेंलें. जर तुम्हीं तयार राहता तर नाताळाचा आनंद आणि परिणाम कितीतरी मोठा असेल!  

यासाठीं कीं तुम्हीं तयार असावें...

पहिले, तुम्हांला तारणाऱ्याची गरज आहे या सत्यावर विचार करा. नाताळ हा आनंदाचा विषय होण्यापूर्वी तो एक लेखी आरोपपत्र आहे, म्हणजें, “तुमच्यासाठीं आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे” (लूक 2:11). जर तुम्हांला तारणाऱ्याची गरज नसेल, तर तुम्हांला नाताळाचीहि गरज नाहीं. जोवर तुम्हांला तारणाऱ्याची नितांत गरज भासत नाहीं तोवर नाताळाचा मूळ उद्देश सार्थक होणार नाहीं. नाताळाच्या आगमनोत्सवासमयीची ही जी कांही संक्षिप्त चिंतने आहेंत ती तुमच्यात तारणाऱ्याच्या गरजेचा कडू-गोड अनुभव जागे करण्यासाठीं आहेत.

दुसरे, गांभीर्याने आपलें आत्म-परीक्षण करा. ख्रिस्ताचे प्रथम आगमन नाताळसाठीं अगदी तसेच आहे जसा चाळीस दिवसाचा उपवासाचा काळ ईस्टरसाठीं असतो. “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायीं दुष्टपणाकडें काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव” (स्तोत्र 139:23-24). प्रत्येक अंतःकरण त्याच्यासाठीं जागा तयार करो... घर स्वच्छ करण्याद्वारे.

तिसरे, तुमच्या घरात देव-केंद्रित अपेक्षा आणि उत्कंठा आणि उत्तेजन यांनी युक्त वातावरण तयार करा - विशेषतः लहान लेकरांसाठीं. जर तुम्हीं ख्रिस्ताविषयी उत्साहित असाल, तर ते सुद्धा असतील. जर तुम्हीं नाताळाचा उत्सव केवळ भौतिक गोष्टींनी उत्साहपूर्ण बनवित असाल, तर लेकरांच्या मनात देवासाठीं तहान कशी निर्माण होईल? तुमच्या कल्पना घेऊन लेकरांसाठीं राजाच्या आगमनाच्या चमत्काराचे प्रात्यक्षिक तयार करा.

चौथे, पवित्र शास्त्र-मननांत अधिक वेळ घालवा, आणि मोठमोठे शास्त्र-पाठ मुखपाठ करा! “परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडें-तुकडें करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय?” (यिर्मया 23:29)! या ख्रिस्तागमनाच्या हंगामांत अग्नीभोवती एकत्र व्हा. हा अग्नी उबदार आहे. तो कृपेच्या रंगानी चकाकत आहे. तो हजार दुखापतींसाठीं आरोग्य आहे. तो अंधाऱ्या  रात्रींसाठीं प्रकाश आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India