Solid Joys

1 July : तुमचे चांगले करण्यात देवाचा आनंद


Listen Later

हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. (लूक 12:32)

येशू बाजूला बसून लढा न देता आम्हांला अविश्वासांत सोडून देणार नाहीं. तो वचनरुपी शस्त्र हाती घेतो आणि जे विश्वास ठेवण्यास संघर्ष करतांत त्या सर्वांसाठीं ते तो आपल्या सामर्थ्याने बोलतो.

देव तशाप्रकारचा देव नाहीं जो खरोखर आमच्यासाठीं चांगला बनू इच्छितो ही भिती घालवून देणें हा त्याचा उद्देश्य आहे – म्हणजें ही भीती कीं तो खरोखर उदार आणि सहाय्यक आणि दयाळू आणि कोमल नाहीं, तर मुळांत आमच्यावर चिडलेला आहे - त्याची मनःस्थिती चांगली नाहीं आणि तो क्रोधाविष्ठ आहे.

कधी कधी, जरी आम्हीं आपल्या मनात हा विश्वास ठेवतो कीं देव आमच्यासाठीं चांगला आहे, तरीही आम्हांला आमच्या अंतःकरणात असे वाटू शकते कीं त्याचा चांगलुपणा बळजबरीने आहे किंवा चांगुलपणा दाखविण्यासाठीं त्याला भाग पाडण्यात आलें आहे, कदाचित एखाद्या न्यायाधिशाप्रमाणें ज्याला न्यायालयाच्या कार्यवाहीच्या कुठल्या तरी तांत्रिकतेविषयी सांगून एखादा चतुर वकींल युक्तीने कोपऱ्यांत नेतो, जेणेंकरून त्याला एखाद्या कैदाविरुद्ध असलेले आरोप खारीज करावे लागतांत ज्याला खरे पाहता त्यानें तुरुंगवास द्यावयास हवा होता.

पण परमेश्वराविषयी आम्हांला असे वाटता कामा नये म्हणून येशूला कळकळीने आमचे सहाय्य करायची आहे. तो लूक 12:32 मध्यें आपल्याला राज्य देण्यात त्याला जो पराकोटीचा आनंद होतो तो दाखविण्याद्वारे आपल्यासाठीं देवाच्या आत्म्याचे अवर्णनीय मूल्य आणि उत्कृष्टतेचे वर्णन करण्याचा तो प्रयत्न करत आहे.

“हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” ह्या अद्भुत वाक्यातील प्रत्येक लहान शब्दाचा हेतू ती भिती काढून घेण्यास आपली मदत करणें आहे ज्याविषयी येशूला माहीत आहे कीं आपण त्याविषयी संघर्ष करित आहोंत, म्हणजें ही भीती कीं देव त्याचे लाभ आपल्याला देण्याच्या बाबतींत जळफळो; कीं त्याला भाग पडते म्हणून तो चांगल्या गोष्टी करतो आणि हे त्याच्या स्वभावानुसार नाहीं; कीं आतल्या आत तो रागावलेला आहे आणि आपल्या रागाला वाट करून देणें त्याला आवडते.

लूक 12:32 हे वाक्य देवाच्या स्वभावाविषयी आहे. ते अशाप्रकारच्या अंतःकरणाचे वर्णन आहे जे देवाजवळ आहे. देवाला कोणती गोष्ट आनंदित करते, त्याला काय करणें आवडते आणि त्याला काय करण्यात आनंद वाटतो याविषयी हे वाक्य आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. “हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक 12:32)

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India