Sign up to save your podcasts
Or

मी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं. (गलती 2:22)
मी लहानपणी समुद्रकिनारी असताना एका मोठ्या लाटेमुळें पाय सटकून पडलो, तेव्हां मला वाटलें कीं मी क्षणातच समुद्रात ओढला जाणार आहे.
ती खूप भीतीदायक गोष्ट होती. मी माझा तोल सावरू लागलो आणि पाहू लागलो कीं उभे कसे राहता येईल. पण लाटेचा जोर इतका शक्तिशाली होता कीं मी पोहू देखील शकत नव्हतो, आणि मी माझें पाय जमिनीवर ठेवू शकत नव्हतो. शिवाय, मी चांगला पोहू पण शकत नव्हतो.
मी भीतीच्या त्या अवस्थेंत असतांना मला एकच विचार आला : कोणी माझी मदत करील का? पण पाण्याच्या आतून मी कुणाला हाक पण मारू शकत नव्हतो.
जेव्हां माझ्या वडिलांनी माझ्या हाताला मजबुतीनें पकडलें, तो माझ्या जीवनातला सर्वात मधुर क्षण होता. मी त्यांच्या ताकती पुढे स्वता:ला पूर्णपणें आत्म-समर्पण केलें. मला उचलून धरण्याची त्यांची जी इच्छा होती तिचा मी आनंद घेऊ लागलो. मी त्यांचा प्रतिकार केला नाहीं.
माझ्या मनात हा विचार आला नाहीं कीं मी असें दाखवावे कीं स्थिति इतकीं पण वाईट नव्हती, आणि माझ्या वडीलांच्या हाताला मी पण माझी ताकत लावावी. मला इतकेच वाटत होते कीं, होय! मला तुमची गरज आहे! मी तुमचा आभारी आहे ! मला तुमचे सामर्थ्य आवडलें! मला तुमचा पुढाकार आवडला! मला तुमची पकड आवडली! तुम्हीं महान आहां!
आत्म-समर्पणाच्या त्या प्रीतिमध्यें कोणी आढ्यता मिरवू शकत नाहीं. आत्म-समर्पणाच्या त्या प्रीतिला मी "विश्वास" असें मानतो. आणि पाण्यात बुडत असताना मला ज्या साहाय्याची गरज होती, म्हणजें माझें वडील, ते देवाच्या भावी कृपेची प्रचिती होते, व हेच साहाय्य मला हवे होते. हाच तो विश्वास आहे जो कृपेला उंचवितो.
ख्रिस्ती जीवन कसे जगायचे याचा जेव्हां आपण विचार करतो तेव्हां ह्या विचाराला प्रथम स्थान दिलें गेलें पाहिजे कीं : मी देवाच्या कृपेला व्यर्थ न ठरवता तिला कसे उंचावू शकतो? याचे उत्तर पौल गलती 2:20:21 मध्यें देतो. "मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेंला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असें नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझें जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगानें आहे; त्यानें माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिलें. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं."
त्याचे जीवन देवाची कृपा व्यर्थ करणारे का नव्हते? कारण तो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणारे जीवन जगत होता. विश्वास सर्व लक्ष कृपेकडें निर्देशित करतो, ना कीं ती व्यर्थ करतो.
By Alethia4Indiaमी देवाची कृपा व्यर्थ करत नाहीं. (गलती 2:22)