Solid Joys

10 August : हे देवा, माझ्यावर कृपा कर


Listen Later

हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेंला अनुसरून माझे अपराध काढून टाक. (स्तोत्र 51:1)

तीनदा : "कृपा कर," " आपल्या वात्सल्याला अनुसरून," आणि " आपल्या विपुल करुणेंला अनुसरून."

निर्गम 34:6-7 मध्यें देवानें हे अभिवचन दिलें होते:

"परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर1 दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो."

दाविदाला ठाऊक होते कीं काहीं अपराधी असे आहेंत कीं त्यांना क्षमा केलीं जाणार नाहीं. त्याचप्रमाणें, त्याला हेही ठाऊक होते कीं काहीं अपराधी असे आहेंत कीं ज्यांच्या तारणासाठीं केलेंल्या काहीं गूढ कार्यामुळें त्यांचे अपराध गणिले जाणार नाहींत, तर त्यांना क्षमा केलीं जाईल. स्तोत्र 51 मध्यें तो देवाच्या कृपेच्या यांच रहस्याला दृढ धरून ठेवत आहे.

“हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेंला अनुसरून माझे अपराध काढून टाक.” दाविदाला या मुक्तीच्या रहस्याचे जितके गूढ ठाऊक होते, त्यापेक्षा अधिक आता आपल्याला या मुक्तीच्या रहस्याचे गूढ ठाऊक आहे. आम्हीं ख्रिस्ताला ओळखतो. तरी त्या करुणेंला मात्र आपण त्याच्याप्रमाणेंच दृढ धरून ठेवतो.

आपल्या असहाय स्थितींत एक निर्णायक गोष्ट जी तो करतो ती म्हणजें देवाची करुणा व प्रीति ह्यांकडें वळणें. आज याचा अर्थ आपल्या असहाय स्थितींत ख्रिस्ताकडें वळणें असा होतो, ज्याने त्याच्या स्वतःच्या रक्ताने आपल्याला आवश्यक असलेली सर्व करुणा प्राप्त करून घेतलीं.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India