Solid Joys

10 November : तुमची भीती दूर करा


Listen Later

मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. (स्तोत्र 56:3)

आपल्यां सर्व चिंता ह्यांचे मूळ आमचा अविश्वास आहे या सत्याचे एक संभाव्य स्पष्टीकरण अशाप्रकारे असूं शकते: “मला जवळजवळ दररोज चिंतेच्या भावनांस तोंड द्यावे लागते; आणि म्हणून मला असें वाटते की परमेश्वराच्या कृपेवर माझा विश्वास पूर्णतः अपुरा आहे. म्हणून माझे खरोखर तारण झालें आहे याची मला खात्रीच पटत नाहीं.”

या भीतीला माझे हे उत्तर आहे : समजा तुम्हीं कारस्पर्धेत भाग घेतला आणि तुमचा शत्रू, ज्याला असें वाटते की तुम्हीं तुमची ही शर्यत पूर्ण करू नये, तुमच्यां कारच्या विंडशील्डवर चिखल फेकतो. आणि तात्पुरते तुमचे लक्ष तुमच्यां लक्ष्य रेषेवरून विचलित होऊन जाते आणि तुमची कार अचानक दुसऱ्या दिशेने जाऊ लागते, तेव्हां त्याचा अर्थ असा होत नाहीं की तुम्हीं तुमची शर्यत अर्ध्यावर सोडणार आहात.

आणि निश्चितच याचा अर्थ असाहि नाहीं की तुम्हीं चुकीच्या रेसट्रॅकवर आहात. नाहीं तर, तुमच्यां प्रतिस्पर्धीने -  तुमच्यां शत्रूने - तुम्हांला मुळीच अडथळा आणला नसता. याचा अर्थ असा आहे की तुम्हांला ताबडतोब तुमच्यां विंडशील्डचे वाइपर सुरू करायचे आहे.

जेव्हा तुमच्यां मनात चिंता आक्रमण करते आणि परमेश्वराचे गौरव आणि त्यानें आमच्यासाठीं जे वैभवी भविष्य योजून ठेविलें त्यापासून आपली दृष्टी अंधुक होऊ लागते, तेव्हां त्याचा अर्थ असा होत नाहीं की आपण विश्वासहीन आहोत, अथवा हा की आपण स्वर्गात जाणार नाहीं. याचा अर्थ हा आहे की आपल्या विश्वासावर आक्रमण केलें जात आहे.

पहिला प्रहार होताच, परमेश्वराच्या अभिवचनांवरील आमचा विश्वास डळमळू शकतो आणि विचलित होऊ शकतो. परंतु आपण रेसट्रॅकवर राहून अंतिम रेखा पार करणार किंवा नाहीं हे यावर अवलंबून आहे की, कृपेने, आपण प्रतिरोधाची प्रक्रिया सुरू केली आहे किंवा नाहीं - आपण चिंतेच्या अविश्वासाविरुद्ध प्रतिघात करित आहों किंवा नाहीं. आपण विंडशील्ड वाइपर सुरू करणार आहोत का?

स्तोत्र 56:3 म्हणते, “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.”

लक्ष द्या: हे वचन असं म्हणत नाहीं की “माझा भीतीशी कधीही संघर्ष होत नाहीं.” भीती आक्रमण करते, आणि एक सुयुद्ध सुरू होते. म्हणून खऱ्या विश्वासणाऱ्यांस कुठलीही चिंता नसते असें पवित्र शास्त्र गृहित धरत नाहीं. त्याऐवजी, पवित्र शास्त्र आम्हास सांगते की जेव्हां चिंता आम्हांवर आक्रमण करतांत तेव्हां आम्हांला कसें सुयुद्ध करायचे आहे. ते आम्हांला सांगते की विंडशील्ड वाइपर कसे सुरू करावे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India