Solid Joys

10 September : चिंतेशी सुयुद्ध कसे करावे


Listen Later

त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो. (1 पेत्र 5:7)

स्तोत्र 56:3 म्हणते, "मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकींन."

लक्ष द्या: हे वचन "मला कधीही भीती वाटणार नाहीं" असे म्हणत नाहीं. भीती हल्ला करते आणि मग एक संघर्ष सुरू होतो. त्यामुळें खऱ्या विश्वासणाऱ्यांना कोणतीही चिंता नसते असे बायबल गृहीत धरत नाहीं. तर, जेव्हा चिंता प्रहार करतांत तेव्हा त्यांशी कसे सुयुद्ध करावे ते बायबल आपल्याला सांगते.

जसे कीं 1 पेत्र 5:7 म्हणते, “त्याच्यावर तुम्हीं ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.” हे वचन असे म्हणत नाहीं कीं तुम्हांला कधीही चिंता वाटणार नाहीं. ते म्हणते, जेव्हा तुम्हांला चिंता वाटतील तेव्हा तुम्हीं त्यां सर्व देवावर टाका. तुम्हीं गाडी चालवत असतांना जर अचानक चिखल तुमच्या कारच्या समोरील काचेवर (विंडशील्डवर) उडून येतो आणि लगेच समोरचे दृश्य तात्पुरते अस्पष्ट होऊन जाते, आणि तुम्हीं चिंतेने हडबडू लागता, तेव्हा तुम्हीं त्वरित तुमचे वायपर चालू करता आणि कारचे विंडशील्ड वॉशर देखील सुरु करता, व चिखलाने माखलेली काच स्वच्छ करता.

म्हणून एखादी व्यक्ती जिला दररोज चिंतेच्या भावनांशी संघर्ष करावा लागतो तिला माझे उत्तर हेच आहे: चिंता ह्या सामान्य आहेत. कमीतकमी माझ्याबाबतींत तरी ते खरे आहे, विशेषकरून माझ्या किशोरवयीन काळापासूनच प्रश्न     आहे: आपण त्यांच्याशी कसे सुयुद्ध करतो?

या प्रश्नाचे उत्तर आहे : आपण अविश्वासाविरुद्ध लढा देत व भावी काळातील कृपेवर विश्वासाची धाव धावीत आपल्या चिंतेंशी सुयुद्ध करतो. आणि ज्या प्रकारे तुम्हीं हे "विश्वासासंबंधीचे सुयुद्ध" लढता (1 तीमथ्य 6:12; 2 तीमथ्य 4:7) ते म्हणजें भविष्यातील कृपेच्या देवाच्या अभिवचनांवर मनन करित व त्याच्या आत्म्याच्या सहाय्यासाठीं प्रार्थना करित.

विंडशील्ड वाइपर ही देवाची वचने आहेत जी अविश्वासाचा चिखल स्वच्छ करतांत आणि विंडशील्डवर आपण जे पाण्याचे फव्वारे मारतो ते पवित्र आत्म्याचे साहाय्य आहे. आपण पापापासून – त्यांत चिंतेचे देखील पाप आहे - मुक्तीचे सुयुद्ध "आत्म्याच्या द्वारे व सत्यावरच्या विश्वासात" लढतो (2 थेस्सलनीकाकर 2:13).

आत्म्याचे कार्य आणि सत्याचे वचन. ही दोन्ही मिळून मोठा विश्वास निर्माण करतांत. चिखल मऊ करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या कार्याशिवाय, वचनाचे वाइपर केवळ विंडशील्डवरील अविश्वासाच्या आंधळ्या गुच्छांवर खरवडतांत.

दोन्ही आवश्यक आहेत : आत्मा व वचन. आपण देवाची वचने वाचतो आणि त्याच्या आत्म्याच्या सहाय्यासाठीं प्रार्थना करतो. आणि जसजसे विंडशील्ड स्वच्छ होत जाते, जेणेंकरून देवानें आपल्यासाठीं जे कल्याणाची योजना आखली आहे ती आपण पाहू शकू (यिर्मया 29:11), तसतसा आपला विश्वास बळकट होत जातो आणि चिंता ह्या नाहींश्या होऊं लागतांत.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India