Solid Joys

12 August : माझा जीव देवासाठींतान्हेला झाला आहे


Listen Later

हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठीं लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठीं लुलपत आहे. माझा जीव देवासाठीं, जिवंत देवासाठीं तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? (स्तोत्र 42:1-2)

जी गोष्ट आपल्यासाठीं हा शास्त्रपाठ इतका प्रिय आणि इतका महत्त्वाचा बनवते ती ही कीं स्तोत्रकर्त्याचा जीव येथें मुख्यतः त्याच्या जीवावर उठून आलेंल्या संकटमय परिस्थितीतून मुक्त होण्यासाठीं तान्हेला झालेंला नाहीं. आपल्याला आपल्या शत्रूंपासून सुटका मिळावी किंवा त्यांचा नाश व्हावा यासाठीं त्याचा जीव प्रामुख्याने तान्हेला झालेंला नाहीं.

सुटकेसाठीं व्याकूळ होणें, आणि त्यासाठीं प्रार्थना करणें चुकींचे नाहीं. अनेक प्रसंगी शत्रूंच्या पराभवासाठीं प्रार्थना करणें योग्यच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा व्यक्ती जर कोणी असेल, ज्याच्यासाठीं आपला जीव तान्हेला व्हावयाला पाहिजे,  तर तो देव स्वतः आहे.

आपण स्तोत्रांवर मनन करतांना जेव्हां देवाविषयी विचार करतो आणि त्याला अनुभवतो, तेव्हा त्याचा मुख्य परिणाम पुढीलप्रमाणें होतो : आपण देवावर प्रीति करू लागतो, आणि देवाच्या दर्शनासाठीं व्याकूळ होऊन जातो, व देवासोबत राहण्याची उत्कंठा बाळगू लागतो, आणि देवाची प्रशंसा करण्यात आणि त्याच्यांत आनंद करण्यात समाधानी होऊं लागतो.

वचन 2 च्या शेवटचा संभाव्य अनुवाद असा आहे, "मी कधी येऊन साक्षात देवाचे मुख पाहीन?" या प्रश्नाचे अंतिम उत्तर योहान 14:9 आणि 2 करिंथ 4:4 मध्यें दिलेंलें आहे. तिथें येशूनें म्हटलें, “ज्याने मला पाहिले आहे त्यानें पित्याला पाहिले आहे.” तसेच पौल सुद्धा म्हणतो कीं आपण ख्रिस्तामध्यें रूपांतरित होऊं तेव्हा आपण “ख्रिस्त....त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश” ह्याला पाहूं.

आपण ख्रिस्ताचे मुख पाहतो तेव्हा आपण देवाचे मुख पाहतो. आणि पौल 2 करिंथ 4: 4 आणि 6 मध्यें म्हणतो त्याप्रमाणें जेव्हा आपण ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान याविषयीची सुवार्ता ऐकतो, तेव्हां आपण ख्रिस्ताच्या मुखावरील गौरव पाहतो. तो ह्या गोष्टीला “ख्रिस्ताच्या गौरवाची सुवार्ता, जो देवाची प्रतिमा आहे” असे म्हणतो. किंवा जसे तो पुढे वचन 6 मध्यें म्हणतो : "येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश."

देव करो, तुम्हींहि देवाचे मुख पाहण्यासाठीं भुकेलें आणि तान्हेले व्हावे व ती भूक व तहान अधिकाधिक वाढत जावी. आणि आजच देवाची प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या गौरवाच्या सुवार्तेद्वारे तो तुमची ही व्याकुळता (लुलपतपणा) तृप्त करो.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India