Solid Joys

12 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 2


Listen Later

“चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकीं कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतांत? ती कष्ट करत नाहींत व सूत कातत नाहींत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:27-30)

मत्तय 6:25-34 मध्यें येशूनें योजिलेली अशी किमान सात अभिवचनें आहेंत, जी आम्हांला विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते लढण्यास आणि चिंतामुक्त होण्यास मोठे सहाय्य पुरवितांत. काल आपण अभिवचन क्र.1 आणि अभिवचन क्र.2 ही पहिली; आज आपण अभिववचन क्र.3 आणि अभिवचन क्र.4 ही पाहूं.

अभिवचन क्र.3: "चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकीं कोण समर्थ आहे?" (मत्तय 6:27)

हे स्वतःमध्यें एक विशिष्ठ प्रकारचे अभिवचन आहे — वास्तविकतेविषयी एक सामान्य ज्ञान देणारे अभिवचन जे तुम्हीं तुमच्या अनुभवातून शिकू शकता : चिंता करून तुमचा काहींही फायदा होणार नाहीं. हेंच ते अभिवचन आहे. हा मुख्य युक्तिवाद नाहीं, परंतु काहींवेळा आपल्याला स्वतःशी कठोरपणें वागावे लागते आणि हे मान्य करावें लागते, कीं “हे जिवा, तुझी ही कुरकुर पूर्णपणें निरुपयोगी आहे. ती तुला कसलीही खात्री देत नाहीं. तू केवळ तुझाच नाहीं तर इतर लोकांचाही दिवस वाया घालवत आहेंस. चिंता करणें सोड. ती सर्व देवावर टाक. आणि आपला नित्यक्रम सुरू ठेव."

ज्यामुळें आपलें कल्याण होईल असे काहींही चिंता साध्य करत नाहीं. ह्याविषयीचे ते अभिवचन आहे. यावर विश्वास ठेवा. त्याप्रमाणें वागा.

अभिवचन क्र 4: “रानातील फुले पाहा, ती कशी वाढतांत? ती कष्ट करत नाहींत व सूत कातत नाहींत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्हीं अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाहीं काय?” (मत्तय 6:28-30)

देवाच्या दृष्टित तुमचे मूल्य हे रानातील फुलांपेक्षा अधिक आहे, कारण तुम्हीं सर्वकाळ जिवंत राहाल, आणि अशा प्रकारे त्याची प्रिय मुले म्हणून सर्वकाळ त्याची उपासना करू शकाल.

तरीसुद्धा, देवाकडें व्यवस्थापणाची उर्जा आणि खबरदारीचा असा भरभरून वाहणारा पुरवठा आहे, जो तो फक्त मोजके दिवस टिकणाऱ्या फुलांवर ओततो. म्हणून, तो नक्कीच तीच ऊर्जा आणि व्यवस्थापणाचे तेच कौशल्य यांचा उपयोग आपल्या त्या लेकरांची काळजी घेण्यासाठीं करावयांस समर्थ आहे जे सर्वकाळ जिवंत राहतील. आता प्रश्न हा आहे : आपण या अभिवचनावर विश्वास ठेऊन स्वतःला चिंतामुक्त करणार आहों का?

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India