Solid Joys

13 April : तुमच्या अश्रूंना बोला


Listen Later

“जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठीं बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.” (स्तोत्र 126:5-6).

बी पेरण्याविषयी दुःखद काहींही नाहीं. त्यासाठीं कापणीपेक्षा जास्त श्रम लागत नाहीं. दिवस सुंदर असू शकतात. कापणीसाठीं मोठी आशा असू शकते.

तरीही स्तोत्र “अश्रूपूर्ण नेत्रांनी” पेरणी करण्याविषयी सांगते. ते म्हणते कीं कोणीतरी “पेरणीसाठीं बी घेऊन रडत बाहेर पडतो.” तर, ते का रडत आहेत?

मला वाटते कीं त्याचे कारण हे नाहीं कीं पेरणी करणे दुःखाचे आहे किंवा पेरणी कठीण आहे. मला असे वाटते कीं रडण्याचा संबंध पेरणीशी मुळीच नाहीं. पेरणी हे फक्त काम आहे जे आपल्याला तेव्हांही केलें पाहिजे जेव्हां आमच्यां जीवनात रडवणाऱ्या गोष्टी असतांत.

आमचे दुःख करणे समाप्त होईपर्यंत किंवा आमच्यां सर्व समस्यांचे निवारण केलें जाईपर्यंत पिके थांबणार नाहींत. जर आम्हांला पुढच्या हिवाळ्यात खायचे असेल, तर आम्हांला शेतात जावे लागेल आणि बी पेरावे लागेल, आम्हीं रडत असू वा नसू.

जर तुम्हीं असे करता, तर स्तोत्राचे अभिवचन हे आहे कीं तुम्हीं “हर्षाने कापणी कराल.” तुम्हीं “आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन” घरी याल. यासाठीं नाहीं कीं पेरणीच्या आसवांमुळे कापणीचा आनंद उत्पन्न होतो, तर निव्वळ पेरणीमुळे कापणी होते, आणि जरी तुमचे अश्रू तुम्हांला पेरणी सोडून देण्यास मोहात पाडत असले, तरीही तुम्हांला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

तर, धडा हा आहेः जेव्हां साधी, सरळ कामे करावयाची असतात, आणि तुमचे अंतःकरण दुःखाने भरलेले असेल, आणि तुमची आसवे सहज वाहत असतील, तेव्हां पुढे जा आणि अश्रूंसोबतच कामे करा. वास्तववादी बना. आपल्या अश्रूंना म्हणा, “अश्रूंनो, मला तुमची जाणीव आहे. तुम्हीं माझ्यात जीवनाचा त्याग करण्याची इच्छा उत्पन्न करता. पण शेतात पेरणी करावयाची आहे (भांडी धुवायची, गाडी दुरूस्त करावयाची, उपदेश लिहावयाचा आहे).”

मग, देवाच्या वचनाच्या आधारे म्हणा, “अश्रूंनो, मला माहित आहे कीं तुम्हीं सदाकाळ टिकणार नाहीं. मी माझे काम (अश्रू आणि सर्व) करतो फक्त ही वस्तुस्थिती शेवटी आशीर्वादाची कापणी आणील. म्हणून, पुढे जा आणि जरूरी असेल तर वाहत रहा. पण माझा विश्वास आहे - जरी मला ते अद्याप दिसत नसले किंवा ते पूर्णपणे जाणवत नसले - तरी माझा विश्वास आहे कीं माझ्या पेरणीचे साधे काम कापणीच्या पेढ्या घेऊन येईल. आणि माझे अश्रू आनंदात बदलतील.”

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India