Solid Joys

13  June : येशूचा वध कोणी केला?


Listen Later

ज्यानें आपल्यां स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्यां सर्वांकरता समर्पण केलें, तो त्याच्याबरोबर आपल्यांला सर्वकाहीं कसे देणार नाहीं? (रोम 8:32).

माझा एलनोईस या ठिकाणी एक मित्र होता जो पाळक होता, तो खूप वर्षापूर्वी पवित्र आठवड्यात एका तुरुंगात कैद्यानां वचन सांगत होता. वचन सांगताना तो थांबला व त्यानें विचारलें कीं येशूचा वध कोणी केला हे त्यांना ठाऊक आहे का?

काहीं लोकं बोललें त्याला सैनिकांनें मारलें. काहीं म्हणालें यहुद्यांनी मारलें. तर काहीं म्हणालें पिलातानें. नंतर शांतता झाल्यावर, माझा मित्र सहजपणें म्हणाला, "त्याचा वध त्याच्या पित्यानें केला."

रोमकरांस पत्र 8:32 चा पहिला भाग हेच सांगत आहे : देवानें त्याच्या पुत्राला सुद्धा राखून ठेवलें नाहीं तर मरणाच्या स्वाधीन केलें." तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्यां स्वाधीन झाल्यावर तुम्हीं त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारलें." (प्रेषित 2:23). यशया 53 हे जास्त ठळकपणें सांगते, "तरी त्याला ताडन केलेलें, देवानें त्याच्यावर प्रहार केलेलें व त्याला पिडलेलें असें आम्हीं त्याला लेंखलें.... त्याला ठेचावे असें परमेश्वराच्या (त्याच्या पित्याच्या!) मर्जीस आलें. त्यानें त्याला पिडलें" ( यशया 53:4, 10).

किंवा जसे रोम 3:25 म्हणते, "त्याच्या रक्तानें विश्वासाच्या द्वारें प्रायश्‍चित्त होण्यास देवानें त्याला पुढे ठेवलें." ज्याप्रमाणें अब्राहामानें त्याचा पुत्र इसहाकाला मारायला चाकू उचलला, पण नंतर त्याच्या मुलाला सोडून दिलें कारण त्याला झुडपात एक कोकरा दिसला, अगदी त्याप्रमाणें देव जो पिता यानें त्याच्या स्वत:च्या पुत्राच्या - येशूच्या छातीवर चाकूनें वार केला, त्यानें त्याला राखून ठेवलें नाहीं कारण तो कोकरा होता, आमच्यां जागी मरणारा आमचा प्रतिनिधी होता.

देवानें आपल्यां स्वत:च्या पुत्राला देखील राखून ठेवलें नाहीं कारण तोच एक मार्ग होता ज्याद्वारें तो आपल्यांला वाचवू शकत होता आणि तरी देखील तो एक पवित्र आणि न्यायी देव म्हणून राहू शकणार होता. आपल्यां दुष्कर्माचा दोष, आपल्यां पापांची शिक्षा, आपल्यां पापांच्या शापामुळें आपल्यांला नरकाच्या नाशापासून सुटका मिळाली नसती. पण देवानें आपल्यां पुत्राला देखील राखून ठेवलें नाहीं; त्यानें त्याला आमच्यां अपराधांमुळें घायाळ केलें, आपल्यां दुष्कर्मामुळें ठेचलें आणि आपल्यां पापांमुळें क्रूसावर खिळलें.

रोम 8:32 - हे वचन माझ्यासाठीं पवित्र शास्त्रातील सर्वात मोलवान वचन आहे कारण ते देवाच्या भावी कृपेच्या सर्व-समावेशक अभिवचनांचा पाया आहे, कीं देवाच्या पुत्रानें माझी सर्व शिक्षा, माझा सर्व दोष, माझी सर्व दंडाज्ञा,  माझ्या सर्व चुका आणि माझी सर्व भ्रष्टता त्याच्या शरीरावर घेतली, जेणें करून मला त्या महान आणि पवित्र देवापुढे क्षमा पावलेंला, समेट झालेंला, नीतीमत्व प्राप्त झालेंला, स्वीकारलेंला असें उभें राहता यावे आणि त्याच्या उजव्या हाताशी असणार्‍या सर्वकाळाच्या आनंदाच्या अभिवचनाचा लाभार्थी होणें शक्य व्हावें. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India