Solid Joys

13 September : चिंता न करण्याची 7 कारणें, भाग 3


Listen Later

“ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतांत.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्हीं पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय 6:31-34)

आपण गेल्या दोन दिवसांत पाहिले आहे कीं मत्तय 6:25-34 मध्यें येशूनें योजिलेली अशी किमान सात अभिवचनें आहेंत, जी आम्हांला विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते लढण्यास आणि चिंतामुक्त होण्यास मोठे सहाय्य पुरवितांत. आज आपण अंतिम तीन अभिवचने पाहूं.

अभिवचन #5: “ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतांत.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय 6:31-32)

देवाला तुमच्या गरजां माहित नाहीं असे समजू नका. तो त्यां सर्व गरजां जाणून आहे. शिवाय तो “तुमचा स्वर्गीय पिता” आहे. तो तटस्थ किंवा बेपर्वा अशी भूमिका घेऊन दुरू उभा राहून पाहत नाहीं. तो काळजी करतो. त्यानें ठरविलेल्या योग्य वेळी तो तुमच्या गरजां भागविल.

अभिवचन # 6: "तर तुम्हीं पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील." (मत्तय 6:33)

जर तुम्हीं तुमच्या खाजगी भौतिक गरजांविषयी चिंता करित बसण्याऐवजी, या जगात त्याचा उद्देश्य सिद्धीस न्यावयांस त्याच्या नामास्तव स्वतःचे जीवन ओतून द्याल तर त्याचा उद्देश्य सिद्धीस न्यावयांस आणि त्याचे गौरव व्हावे म्हणून तुमच्याकडें सर्व काहीं आहे याची खात्री तो स्वतः करून घेईल. "ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील." म्हणजें काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे त्यां सर्व गरजां- आणि त्याचबरोबर इतर गरजां देखील – ज्यां तुम्हांला त्याची इच्छा पूर्ण करण्यांसाठीं आणि त्याचे गौरव करण्यासाठीं आवश्यक आहेत. याचा अर्थ असा असू शकतो कीं तुम्हीं त्याच्यासाठीं मरावे हा त्याचा उद्देश आहे, परंतु तो त्याच्या गौरवासाठीं तुम्हांला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवील.

हे अगदी रोमकरांस 8:32 मध्यें असलेल्या अभिवचनासारखे आहे, “[देव] त्याच्या [ख्रिस्ता] बरोबर आपल्याला सर्वकाहीं कसे देणार नाहीं?” मग पुढे असे लिहिले आहे, “ख्रिस्ताच्या प्रीतिपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?  कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे कीं, ‘तुझ्याकरता आम्हीं दिवसभर मारले जात आहोत, आम्हीं वधाच्या मेंढराप्रमाणें गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीति केलीं, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.'' (रोमकरांस 8:35-37). भूक किंवा नग्नता यां येऊ शकतांत. परंतु आपल्याला यां सर्व गोष्टींत महाविजयी होण्यासाठीं आवश्यक असलेल्यां सर्व वस्तु आपल्याकडें असतील.

अभिवचन # 7: "ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय 6:34)

तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडें कधीही होऊं नये याची देव खात्री करून घेतो (1 करिंथ 10:13). तो तुमच्याठायीं आपलें कार्य सिद्धीस नेईल, जेणेंकरून तुमचे "सामर्थ्य आयुष्यभर कायम" राहावे (अनुवाद 33:25).

प्रत्येक दिवसाचे दुःख हे त्या दिवसाला ठरविलेले आहे. परंतु त्याच्या करुणेंमुळें ते दुख तुमच्या शक्तीपलीकडें कधीही जात नाहीं. आमच्यावर दररोज करुणा केलीं जाईल जी रोज सकाळी नवी होते – आणि ती त्या दिवसाच्या दुखासाठीं पुरे आहे (विलाप 3:22-23). तो तुमच्याकडून असे कोणतेही चांगले काम करून घेणार नाहीं जे सिद्धीस नेण्यांस तो स्वतः तुम्हांला आवश्यक असलेली सर्व कृपा पुरवणार नाहीं (2 करिंथ 9:8).

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India