Solid Joys

15 December : नाताळाच्या हंगामावेळी जीवन आणि मरण


Listen Later

“चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणें व्हावी म्हणून आलो आहे.” (योहान 10:10)

मी आजची भक्ती सुरू करणारच होतो कीं तितक्याच मला मॅरियन न्यूस्ट्रम हिचे नुकतेच निधन झाल्याची बातमी मिळाली. मॅरियन आणि तिचा नवरा एल्मर हे त्या काळापासून आमच्या चर्चचे सदस्य होते ज्याकाळी आमच्या चर्चच्या बहुतेक सदस्यांचा जन्महि झाला नव्हता. त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या लग्नाला 64 वर्षे झाली होती.

जेंव्हा मी एल्मरशी बोललो आणि त्याला सांगितलें कीं त्यानें प्रभूमध्यें धीर धरावा आणि जीवनात पराजय पत्करू नये, तेव्हां तो म्हणाला, "तो माझा खरा मित्र आहे." मी प्रार्थना करतो कीं सर्व ख्रिस्ती लोकांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी हेंच म्हणावें, "ख्रिस्त माझा खरा मित्र आहे."

नाताळाचा आगमनोत्सव करतांना मी प्रत्येक वर्षी माझ्या आईचा स्वर्गवासदिन साजरा करतो. ती 56 वर्षांची असतांना इस्रायलमध्यें बस अपघातांत तिचा हात कापला गेला. तो 16 डिसेंबर 1974 चा दिवस होता. आणि आश्चर्य म्हणजें, त्या घटना आजही माझ्या मनांत ताज्या आहेत. जर मी धीर धरला नाहीं तर मला सहज रडू येईल — उदाहरणार्थ, माझ्या मुलांनी तिला कधीच जाणले नाहीं असा विचार करून. नाताळच्या दुसऱ्या दिवशी आम्हीं तिला पुरलें. किती मौल्यवान नाताळ होता तो!

तुमच्यापैकीं अनेंकांना या नाताळमध्यें आपलें आप्तजन या जगातून गेल्याची अधिक स्पष्टपणें अनुभूती होईल. त्या आठवणींचा प्रतिकार करू नका. त्यांना येऊ द्या. ते अनुभवा. जीवन आणि मरण या दोहोंमध्यें - आपल्यातील आपुलकीला अधिक तीव्रता देणें यापेक्षा मोठी प्रीति आहे काय? पण अरे, त्यां आठवणीं आपसातले कटूपण स्मरून निष्ठूर होऊ नकां. कटूपण स्मरून निष्ठूर होणें हे आत्मघाती आहे.

येशू नाताळाला या जगांत आला जेंणेंकरून आपल्याला सार्वकालिक जीवनप्राप्ती व्हावी. “मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणें व्हावी म्हणून आलो आहे” (योहान 10:10). एल्मर आणि मॅरियन यांनी त्यांची शेवटची वर्षे कुठे घालवायची यावर चर्चा केली होती. एल्मरनें सांगितलें, "मॅरियन आणि मी सहमत झालें होतो कीं आमचे शेवटचे गन्तव्यं प्रभूचे घर असेल."

तुम्हीं स्थायिक घरासाठीं अस्वस्थ आहां का? माझे कुटुंब सुट्टीसाठीं घरी येत आहे. ऐकून बरं वाटतं. मला हे ऐकून बरं वाटतं याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजें हे कीं ते सर्व आणि मी आपल्या अंतिम घरवापसीसाठीं निवडलेले आहों. त्यामुळें जेव्हां जेव्हां आम्हीं ही जगिक घरवापसी करतो, आम्हांला त्यां अंतीम घरवापसीचा आगाऊ आस्वाद प्राप्त होते, आणि तो आगाऊ आस्वाद किती मधुर आहे.

पण तो आस्वाद तुम्हीं तेव्हांच चाखू शकतां जर तुम्हीं त्यांचे स्थान तात्पुरत्या घरवापसींना देत नाहीं. म्हणून नाताळाच्या या हंगामातील सर्व गोड गोष्टींना त्यां अंतिम, उत्कृष्ट, सर्व-समाधानकारक अशा गोड गोष्टींचे स्थान घेऊं देऊं नका. आपल्या प्रत्येक आप्तजनाने या जगातून घेतलेल्या निरोपाची आठवण आणि नाताळाचा प्रत्येक आनंद तुमची अंतःकरणें स्वर्गात असलेल्या गोष्टींकडें आकर्षित करों.

नाताळ. नाताळ म्हणजें हेंच : त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणें व्हावी म्हणून आलो आहे, नाहीं का? मॅरियन न्यूस्ट्रम, रुथ पायपर, तुम्हीं आणि मी – आम्हां सर्वांना आता आणि सर्वकाळचे जीवन मिळावे.

सार्वकालिक झऱ्यातून पिऊन या नाताळाला तुमचे वर्तमान अधिक विपुल आणि सखोल बनवा. तो अत्यंत जवळ आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India