Solid Joys

15 March : ख्रिस्ताकारिता विध्वंसक


Listen Later

मग तो (येशू) पलीकडें गदरेकरांच्या देशात गेल्यांवर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले, तेव्हां पाहा, ते ओरडून म्हणाले, " हे देवाच्या पुत्रा, तू मध्यें का पडतोस ? नेमलेल्यां समयापूर्वी तू आम्हांला पीडण्यास येथे आला आहेस काय ?" मत्तय 8:29

दुरात्मे इथे एक रहस्य शिकत आहेत. त्यांना ठाऊक आहे कीं त्यांचा नाश होणार आहे. त्यांना ठाऊक आहे कीं देवाचा पुत्र हा विजयी होईल. पण त्यांना हे ठाऊक नव्हते कीं त्यांच्या अंतिम पराभवाच्या आधीच ख्रिस्त प्रकट होणार होता.

ख्रिस्त लढाई करिता त्याच्या सैन्य दलाचे पुढारीपण करण्यासाठीं शेवटच्या युद्धा पर्येंत थांबणार नाहीं. त्यानें सैतानाच्या प्रदेशामध्यें विध्वंसक शक्तीला दाखल केलें आहे. त्यानें जीवन वाचवण्यासाठीं त्याच्या “बचाव पथकाला” प्रशिक्षण दिले आहे. ख्रिस्ताने शेवटच्या विजयापूर्वी, विजयी होण्याकारिता अनेक रणनीती आखल्यां आहेत.

त्यामुळे आता युद्धनीती अशी आहे कीं – ज्याअर्थी आता सैतानाचा नाश ठरलेलाच आहे, व हे त्याला पण ठाऊकहि आहे, त्याअर्थी जेव्हां पण तो आपल्यांला त्याचा मागे जाण्यासाठीं मोहात टाकू पाहतो तेव्हां आपण त्याला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. आपण त्याचावर हसून म्हणायचे, "तुझे डोके ठिकाणावर आहे का, तू हरला आहेस आता तुला कोण साथ देणार?"

मंडळी ही “ ह्या युगाच्या दैवतापासून” मुक्त केलीं गेली आहे ( 2 करिंथ 4:4). आपण गनिमी काव्यातले सैनिक आणि योद्धे आहोंत. आपण आज्ञा मोडण्यार्‍या राज्याचा "अंतरिक्षातील अधिपतीच्या" विरुद्ध बंडखोरी करणारे असे सैनिक आहोंत (2 इफिस 2:2).

हे सुरक्षित नाहीं. पण हे थरारक आहे. खूप लोकांचा जीव यात गेला आहे. सैतानाचे दूत त्याच्या विरुद्ध कारवाया करणारांच्या सतत शोधात असतात. जे जीव जाईपर्यन्त लढा देतात ख्रिस्ताने त्यांना पुनरुत्थानाची खात्री दिली आहे. पण त्यानें शत्रूंच्या प्रदेशामध्यें शांती, जगाकडून स्विकृती किंवा समृद्धीची खात्री दिली नाहीं.

पुष्कळांनी आपल्यां सेनापतिच्या आज्ञा पाळत त्यांच्या जीवाचे बलिदान दिले आहे. आणि मी यापेक्षा चांगल्यां जीवनाचा विचार देखील करू शकत नाहीं - आणि मरणाचा देखील नाहीं!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India