Solid Joys

15 November : अभिवचनें घेऊन लढा देणें


Listen Later

तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. (यशया 41:10)

जेव्हा मी सेवेच्या एखाद नवीन उपक्रम राबवित असतांना किंवा सार्वजनिक सभेसाठीं जाते वेळी जर मी घाबरलो, तेव्हा मी माझ्या सर्वात जास्त उपयोगात येणाऱ्या  अभिवचनांपैकी एक घेऊन अविश्वासाशी लढा देतो : यशया 41:10.

ज्या दिवशी मी तीन वर्षांसाठीं जर्मनीत शिकण्यासाठीं निघालो, तेव्हा माझ्या वडिलांनी फार लांबून न्यूयॉर्कवरून फोन केला आणि मला या वचनात असलेलें अभिवचन दिलें. पुढील तीन वर्षे, अतिशय तनावाच्या काळात टिकून राहण्यासाठीं मी ते शेकडो वेळा वाचले असावे.

जेव्हा माझ्या मनाचे यंत्र निष्क्रिय असते, तेव्हा गीअर्सचा आवाज हा यशया 41:10 चा आवाज असतो. हे वचन मला खूप प्रिय आहे.

अर्थातच, माझ्या विश्वासाच्या शस्त्रागारात हाच एक खंजीर नाहीं.

माझी सेवा निरुपयोगी आणि व्यर्थ आहे या विषयीं मी चिंताक्रांत होऊन जातो तेव्हां मी यशया 55:11 मध्ये असलेले अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो. “त्याप्रमाणें माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठीं मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाहीं.”

मी माझे कार्य करण्याच्या बाबतीत अशक्त आहे अशी मला चिंता वाटू लागते, तेव्हा मी ख्रिस्तानें दिलेलें हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, "माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते" (2 करिंथ 12:9).

मला भविष्याविषयी निर्णय घ्यायचे असतांत आणि मी त्यांविषयी चिंताग्रस्त असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन” (स्तोत्र 32:8).

जेव्हां मीं माझ्या विरोधकांना तोंड देण्याविषयीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो, “देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?” (रोमकरांस 8:31).

मी ज्यांच्यावर प्रीति करतो त्यांच्या कल्याणासाठीं मीं चिंताक्रांत असतो, तेव्हा मी हे अभिवचन घेऊन अविश्वासाशी लढतो की, मीं वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणें मला समजते, “तर तुमच्यां स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल!” (मत्तय 7:11).

यास्तव पवित्र शास्त्रातील प्रत्येक अभिवचन घेऊन अविश्वासाशी सर्वप्रकारे लढा द्या. पण एक केन्द्रिय हत्यार बाळगणें सहायक ठरते. आणि माझ्यासाठीं ते आहे यशया 41:1, “तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.”  अनमोल, बहुमूल्य अभिवचन!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India