Solid Joys

15 September : एकमेव अक्षय आनंद


Listen Later

"ह्याप्रमाणें तुम्हांला आता दुःख झालें आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाहीं." (योहान 16:22)

“तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाहीं” कारण तुमचा आनंद हा येशूच्या सहवासातून येतो, आणि येशूच्या पुनरुत्थानाचा अर्थ असा कीं तुम्हांला कधीही मरण येणार नाहीं; तुम्हांला त्याच्यापासून कधीही विभक्त केलें जाणार नाहीं. 

तर मग, तुमचा आनंद तुमच्यापासून कधीही काढून घेतला जाणार नाहीं असे जर आहे तर दोन गोष्टी खऱ्या असणें साहजिक आहे. एक म्हणजें तुमच्या आनंदाचा झरा सर्वकाळासाठीं अक्षय आहे, आणि दुसरे म्हणजें तुम्हीं देखील अक्षय आहांत. जर तुम्हीं किंवा तुमच्या आनंदाचा झरा जर नश्वर आहांत तर तुमचा आनंद तुमच्यापासून काढून घेतला जाईल.

आणि हो, किती लोक असे आहेत जे नुसता नश्वरतेंत समाधानी होऊन बसले आहेत! ते म्हणतांत, खा, प्या आणि आनंद करा, कारण उद्या तर आपण मरणारच आहोत, बस, हेच आयुष्य आहे (लूक 12:19). अन्न हे अक्षय नाहीं आणि मीही अक्षय नाहीं. तेव्हा आपल्याला शक्य होईल तितका आपण खाण्या-पिण्याचा पुरेपूर फायदा घेऊ या. काय ही शोकांतिका!

जर तुम्हीं अशा विचारसरणीच्या परीक्षेत पडत असाल, तर मग माझी तुम्हांला कळकळीची विनंती आहे कीं तुम्हीं शक्य तितक्या गांभीर्याने यावर विचार करा कीं जर तुमचा आनंद हा येशूच्या सहवासातून येत आहे तर, "तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाहीं" - या जीवनातही नाहीं, व येण्याऱ्या जीवनातही नाहीं.

मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्यें असलेल्या आनंदपासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाहीं (रोमकरांस 8:38-39).

येशूच्या सहवासांत असण्याचा जो आनंद आहे त्याची साखळी आतापासून अनंतकाळापर्यंत अखंड अशी आहे; ती तोडली जाऊ शकत नाहीं - त्याच्या मरणानेही नाहीं, वा आमच्या मरणानेही नाहीं.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India