Solid Joys

17 December : शक्य असें सर्वात मोठे तारण


Listen Later

“परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत कीं त्यात इस्राएलाचे घराणें व यहूदाचे घराणें ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन” (यिर्मया 31:31)

देव नीतिमान आणि पवित्र आणि आमच्यासारख्या पापी लोकांपासून पूर्णपणें भिन्न असा आहे. नाताळाच्या ह्या हंगामात - आणि इतर सर्व प्रसंगी- आमची हीच मुख्य अडचण आहे. आम्हीं ह्या नीतिमान आणि पवित्र देवाबरोबर आमच्या नात्यांत कशी सुधारणा करणार?

तथापि, देव ममताळू आहे आणि त्यानें यिर्मया 31 मध्यें अभिवचन दिलें (ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 वर्षांपूर्वी) कीं एक दिवस असा येईल जेव्हां तो काहीतरी नवीन करील. तो छायेंच्या जागी ख्रिस्ताची वास्तविकता आणेंल. आणि तो सामर्थ्यानिशी आमच्या जीवनांत येईल आणि त्याची इच्छा आमच्या अंतःकरणावर लिहील यासाठीं कीं बाहेरून आम्हास भाग पाडले जाऊ नये, तर आम्हीं त्याच्यावर प्रीति करावयांस आणि त्याच्यावर विश्वास ठेवावयांस आणि त्याचे अनुसरण करावयांस आतून इच्छुक असावें,.

ते साध्य करण्यांत आलेलें असे सर्वात मोठे तारण ठरेल - जर देव आम्हास विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता उपभोगावयास देणार असेल आणि नंतर आम्हांला या वास्तविकतेची अशाप्रकारे याची जाणीव देण्यासाठीं आमच्यात कार्य करीत असेल कीं जिचा आम्हीं सर्वात मोठ्या स्वातंत्र्यानिशी आणि शक्य तेवढ्या मोठ्या आनंदात आस्वाद घेत असू. हे नाताळाचे एक असें बक्षिस आहे ज्याविषयी आम्हीं गीत गाऊन आनंद केलें पाहिजें.

खरे म्हणजें, नव्या करारात अगदी याविषयीच अभिवचन देण्यात आले होते. पण एक मोठे अडखळण होते. आमचे पाप. आमच्या अधर्मामुळें देवापासून आमचे विभक्त होणें.

पवित्र आणि नीतिमान देव आम्हा पातक्यांस इतक्या दयेने कसे वागवू शकतो कीं तो आम्हास सर्वात शक्य आनंदाचा आस्वाद घेण्यासाठीं विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता (म्हणजें त्याचा पुत्र) देतो?

उत्तर हे आहे कीं देवानें आमची पापे त्याच्या पुत्रावर टाकली, आणि त्यांस तेथे शिक्षा दिली, यासाठीं कीं त्याला ते त्याच्या मनातून काढता यावे, आणि आमच्याशी दयेने वागावे आणि त्याचवेळी स्वतः नीतिमान आणि पवित्र असावें. इब्री 9:28 म्हणते कीं ख्रिस्त “पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीं’ एकदाच अर्पण केला गेला.”

ख्रिस्त जेव्हां मेला तेव्हां त्यानें आमची पापे स्वदेही घेतली (1 पेत्र 2:24). त्यानें आमची शिक्षा स्वतःवर घेतली (रोम 8:3). त्यानें आमचा दोष पुसून टाकला (रोम 8:1). आणि त्याचा अर्थ आमची पापे नाहींशी झाली (प्रे. कृत्ये 10:43). ती दंडाज्ञेसाठीं आधार म्हणून यापुढे देवाच्या मनात नाहींत. त्या अर्थाने, तो त्यांस ”विसरून जातो“ (यिर्मया 31:34). ती ख्रिस्ताच्या मरणात गिळंकृत झालीं.

ज्याचा अर्थ हा आहे कीं देव आता त्याच्या न्यायास स्मरून, अवर्णनीयरित्या थोर अशा नव्या कराराच्या अभिवचनांची आमच्यावर उधळण करण्यास स्वतंत्र आहे. तो आम्हास आमच्या आनंदोपभोगासाठीं, विश्वातील सर्वात मोठी वास्तविकता, म्हणजें ख्रिस्त देतो. आणि तो स्वतःची इच्छा –त्याचे स्वतःचे अंतःकरण - आमच्या हृदयांवर लिहितो यासाठीं कीं आम्हास ख्रिस्तावर प्रीती करता यावी आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवता यावा आणि स्वातंत्र्य आणि आनंदाने आतून-बाहेरून ख्रिस्ताचे अनुसरण करता यावे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India