Solid Joys

18 September : एकमेव खरे स्वातंत्र्य


Listen Later

“जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल. . . त्यानें वाइटाकडें पाठ फिरवून बरे ते करावे.” (1 पेत्र 3:10-11)

खरे स्वातंत्र्य म्हणजें काय? तुम्हीं स्वतंत्र आहांत का?

जर तुम्हीं पूर्णपणें स्वतंत्र आहांत, तर येथे अशा चार गोष्टी आहेंत ज्यां तुमच्या बाबतींत सत्य असायला पाहिजेत.

  1. जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसेल, तर तुम्हीं ती करण्यास पूर्णपणें स्वतंत्र नाहीं. ओह, तुम्हांला जे करावेसे वाटत नाहीं ते करण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडें असू शकते, परंतु आपण याला खरे स्वातंत्र्य म्हणत नाहीं. आपल्याला ज्या प्रकारे जीवन जगायचे आहे हे ते नाहीं. आपण एका अशा बंधनांत आणि दबावात असतो जे आपल्याला नको आहे.
  2. आणि जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल, परंतु ती साध्य करण्याची शक्ती मात्र नसेल, तर तुम्हीं ती करण्यास पूर्णपणें स्वतंत्र नाहीं.
  3. आणि जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा आणि शक्ती ह्या दोन्ही असतील, परंतु ती करण्याची संधीच जर नसेल, तर तुम्हीं ती करण्यास पूर्णपणें स्वतंत्र नाहीं.
  4. आणि जर तुम्हांला एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल, आणि ती करण्याची शक्ती असेल, आणि ती करण्याची संधीही असेल, परंतु शेवटी ती तुमचा नाश करत असेल, तर जेव्हां तुम्हीं ती करता, तुम्हीं पूर्णपणें स्वतंत्र नाहीं —जे खरे स्वात्यंत्र आहे, त्यानुसार नक्कीच स्वतंत्र नाहीं.
  5. जर पूर्णपणें स्वतंत्र व्हावयाचे असेल, तर आपल्याजवळ ती इच्छा, ती शक्ती आणि ती संधी आवश्यक आहे ज्यां द्वारे साध्य केलेंल्यां गोष्टीं आपल्याला सर्वकाळचा आनंद देतील. म्हणजें पश्चात्ताप होणार नाहीं. आणि केवळ येशू, जो देवाचा पुत्र जो मरण पावला आणि आपल्यासाठीं पुन्हा उठला, तोच हे शक्य करू शकतो.

    जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्हीं खरेखुरे बंधमुक्त व्हाल (योहान 8:36).

    ...more
    View all episodesView all episodes
    Download on the App Store

    Solid JoysBy Alethia4India