Solid Joys

19 March : सहा मुद्दयात सुवार्तेचा  सारांश


Listen Later

"कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेहि पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले."  (1 पेत्र 3:18)

इथे सुवार्तेचा सारांश नमूद केला आहे, जो तुम्हांला सुवार्ता समजण्याकरिता, त्याचा आनंद घेण्याकरिता व इतरांना सांगण्याकरिता उपयुक्त ठरील!

  1. देवानें आपल्यांला त्याच्या गौरवाकरिता निर्माण केलें आहे.
  2. "माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या; ज्यांस माझे नाम ठेविले, ज्यांस माझ्या गौरवासाठीं उत्पन्न केलें, निर्माण केलें आणि घडिले त्या सर्वास घेऊन या." (यशया 43:6-7) देवानें आपल्यां सर्वांना त्याच्या प्रतिमेमध्यें बनवले आहे यासाठीं कीं आपण त्याचें चरित्र व नैतिक सौंदर्य प्रतिबिंबीत करावे.

    2. यासाठींच प्रत्येक मनुष्याने देवाच्या गौरवासाठीं जगावे

    "म्हणून तुम्हीं खाता, पिता किंवा जे काहीं करता ते सर्व देवाच्या गौरवासाठीं करा" (1 करिंथ 10:31). देवाच्या गौरवाकरिता जगण्याचा मार्ग म्हणजे त्याच्यावर प्रीति करणे (मत्तय 22:37), त्याच्यावर विश्वास ठेवणे ( रोमंकरास पत्र 4:20), त्याचें उपकार मानणे (स्तोत्र 50:23), त्याच्या आज्ञा पाळणे (मत्तय 5:16) आणि त्याला प्रथम स्थान देणे व आपले धन मानणे ( फिलिप्पैकरास पत्र 3:8; मत्तय 10:37). आपण जेव्हां हे करतो तेव्हां आपण देवाचे गौरव प्रतिबिंबीत करतो.

    3. तरीही, आपण सर्वांनी पाप केलें आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो.

    कारण सर्वांनी पाप केलें आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत (रोमकरांस 3:23). देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाहीं किंवा त्याचें आभार मानले नाहींत..... आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केलीं (रोमकरांस 3:23 1:21–23). आपण कुणीच देवावर जशी करायला पाहिजे तशी प्रीति केलीं नाहीं, विश्वास ठेवला नाहीं, उपकार मानले नाहींत, आज्ञा पाळल्यां नाहींत किंवा त्याला धन मानले नाहीं.

    4. त्यामुळेच आपण सर्वजण सार्वकालिक शिक्षेस पात्र आहों

    “कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्यां प्रभू येशू ख्रिस्तामध्यें सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकरांस 6:23). ज्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली नाहीं “त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल” (2 थेस्सल 1:9). “ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील” (मत्तय 25:46).

    5. तरी, त्याच्या महान दयेनुसार, देवानें त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, याला जगात पापी लोकांसाठीं सार्वकालिक जीवनाचा मार्ग देऊ करण्याकरिता पाठवले.

    “देवानें जगावर एवढी प्रीति केलीं कीं, त्यानें आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठीं कीं, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16). “आपल्यांबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्यानें आपल्यांला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले” (गलती 3:13). “कारण आपल्यांला देवाजवळ नेण्यासाठीं ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले” (1 पेत्र 3:18).

    6. म्हणून सार्वकालिक जीवन ही त्या सर्वांसाठीं एक दान आहे जे येशूवर प्रभू व तारणारा म्हणून विश्वास ठेवतात व त्याला त्यांच्या जीवनातले सर्वोच्च धन मानतात.

    “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” (प्रेषित16:31). “कीं, येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्यां मुखाने’ कबूल करशील आणि देवानें त्याला मेलेल्यांतून उठवलें असा ‘आपल्यां अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल” (रोमकरांस 10:9). कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारें तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाहीं, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्यांने हे झाले नाहीं. (इफिस 2:8–9). “मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरता दिले” (गलती 2:20). “इतकेच नाहीं, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाहीं हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठीं कीं, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा” (फिलिप्पै 3:8).

    ...more
    View all episodesView all episodes
    Download on the App Store

    Solid JoysBy Alethia4India