Solid Joys

2 June : अब्राहामाचे वंशज कोण?


Listen Later

“तुझ्या द्वारें पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती 12:3)

जे तुम्हीं ख्रिस्तामध्यें आशा ठेवता आणि आज्ञाधारकपणें त्याला अनुसरता, ते तुम्हीं अब्राहामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनांचे वारस आहात.

उत्पत्ती 17:4, मध्यें देव अब्राहामाला म्हणाला, '“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील." पण उत्पत्तीच्या पुस्तकांतून हे स्पष्ट होते कीं अब्राहाम हा पृथ्वीवरील सर्व कुळांचा जनक झाला तो ते शारीरिकरित्या किंवा राजकींयरित्या नाहीं. म्हणूनच देवाच्या ह्या अभिवचनाचा अर्थ असा असण्याची शक्यता आहे कीं, अनेक राष्ट्रे, जरी ते देहानुसार अब्राहामाच्या रक्ताचे नसलें तरी ते कोणत्या तरी प्रकारे त्याचे पुत्र म्हणून आशीर्वादीत होतील.

उत्पत्ती 12:3 मध्यें देव जे अब्राहामाला बोलला, "तुझ्या द्वारें पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील” तेव्हां हांच त्याचा अर्थ होता यांत काहींच शंका नाहीं. सुरुवातीपासूनच देवाचा मानस होता कीं येशू ख्रिस्ताचा जन्म अब्राहामाच्या वंशात व्हावा आणि जे सर्व ख्रिस्तामध्यें विश्वास ठेवतात त्यांनी अब्राहामाला दिलेल्यां आशीर्वादांचे वारस व्हावे. गलती 3:29 मध्यें पौल म्हणतो, 'आणि तुम्हीं जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहां.'

4,000 हजार वर्षापूर्वी जेव्हां देव अब्राहामाला बोलला, '“पाहा, तुझ्याशी माझा करार हा : तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील" तेव्हां देवानें त्या द्वारें आपल्यांकरिता मार्ग मोकळा केला, आपण परराष्ट्रीय असलो तरी आपण अब्राहामाची संतान बनू शकतो आणि देवाच्या अभिवचनांचे वारस बनू शकू. आपल्यांला इतकेच करायचे आहे कीं आपल्यांला अब्राहामा सारखाच विश्वास ठेवायचा आहे- म्हणजें देवाच्या अभिवचनांवर भाव ठेवायचा आहे, तो इतका कीं, जर या आज्ञाधारकपणात आपल्यांला प्रिय असणार्‍या गोष्टी देखील बलिदान करण्याची तयारी ठेवावी लागेल जसे अब्राहामानें इसाकाला.

आपण अब्राहामाच्या अभिवचनांचे वारीस कोणतेही कर्म केल्यां द्वारें होऊ शकत नाहीं, तर देव स्वतः आपल्यां करिता कार्य करतो या गोष्टीची खात्री ठेवून आपण वारीस होऊ शकतो. "[ अब्राहाम ] परंतु देवाच्या अभिवचनाकडें पाहून तो अविश्वासामुळें डळमळला नाहीं, तर विश्वासानें सबळ होऊन त्यानें देवाचा गौरव केला; 'आणि देव आपण दिलेलें अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती.' ( रोम 4:20-21). यामुळेंच अब्राहाम देवाची आज्ञा पाळू शकला जरी आज्ञापालन व्यर्थ वाटत असलें तरी. देव अशक्य ते शक्य करूं शकतो यावर त्यानें भरवसा ठेवला - जसे कीं त्याच्या मुलाला मरणातून पुन्हा जीवंत करणें.

देवाच्या अभिवचनांमध्यें विश्वास ठेवणें - किंवा आज आपण म्हणू शकतो कीं, ख्रिस्तावर विश्वास ठेवणें, जो देवाच्या अभिवचनाची पूर्तता आहे - त्याच्यावर विश्वास ठेवणें हा अब्राहामाची संतान  होण्याचा मार्ग आहे; आज्ञापालन या गोष्टीचा पुरावा आहे कीं आपला विश्वास हा खरा आहे ( उत्पत्ती 22:12-19). म्हणून येशू योहान 8:39 मध्यें म्हणतो, “जर तुम्हीं अब्राहामाची मुलें आहात तर अब्राहामाची कृत्ये करा."

अब्राहामाची संतान ही सर्व राष्ट्रातील ती लोकं आहेत ज्यांनी त्यांची आशा येशू ख्रिस्तामध्यें ठेवली आहे, आणि त्यामुळें जशी अब्राहामानें मोरीया पर्वतावर आशा ठेवली, त्याप्रमाणें त्यांचा सर्वात मोलवान जगीक ठेवा देखील त्यांच्या आज्ञाधारकतेला रोखू शकत नाहीं.

जे तुम्हीं येशू ख्रिस्तामध्यें आशा ठेवता आणि विश्वासाचे आज्ञापालन करून त्याला अनुसरता, ते तुम्हीं अब्राहामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनाचे वारस आहात.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India