Solid Joys

20 July : प्रत्येक गरजेसाठीं कृपा


Listen Later

तू माझ्याकडें वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपलें सामर्थ्य दे. (स्तोत्र 86:16)

आपल्यावर भविष्यात कृपा व्हावीं अशी सर्व प्रार्थनावीर स्तोत्रकर्ता खंड न पडू देता विनवणी करत असत. देवानें आपली प्रत्येक गरज पूर्ण करावीं अशी ते वारंवार प्रार्थना करतांत. आपण आपल्या प्रत्येक आणीबाणीच्या परिस्थितीसाठीं भविष्यातील कृपेवर दररोज कसे अवलंबून राहावें याचा ते सर्व मिळून आम्हाल्यासाठीं एक सुंदर कित्ता घालून देत आहेत  .

  • त्यांना मदतीची गरज असते तेव्हा ते कृपेसाठीं धावा करतांत : “हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर!” (स्तोत्र 30:10).
  • ते अशक्त असतांत तेव्हां : “तू माझ्याकडें वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपलें सामर्थ्य दे” (स्तोत्र 86:16).
  • त्यांना रोग व आजार यांपासून बरे होण्याची गरज असते तेव्हां : “हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर” (स्तोत्र 6:2).
  • त्यांचे शत्रूं त्यांची पिळवणूक करतांत तेव्हां : “हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्‍या, माझा द्वेष करणार्‍यांपासून मला झालेंली पीडा पाहा” (स्तोत्र 9:13).
  • ते एकाकीं पडलेले असतांत तेव्हां : "माझ्याकडें वळून मला प्रसन्न हो; कारण मी निराश्रित व दीन आहे" (स्तोत्र 25:16).
  • ते शोक करीत असतांत तेव्हां : “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे; माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत" (स्तोत्र 31:9).
  • ते पापांत पडतांत तेव्हां: “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केलें आहे!” (स्तोत्र 41:4).
  • ते राष्ट्रांमध्यें देवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून व्याकूळ होतांत तेव्हां : “देवानें आमच्यावर दया करावी व आम्हांला आशीर्वाद द्यावा. . . ह्यासाठीं कीं, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेंले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे” (स्तोत्र 67:1-2).
  • खचितच, प्रार्थना हा विषय पवित्रजनांचा आत्मा आणि भविष्यातील कृपेचे अभिवचन यांच्यातील विश्वासाची मजबूत साखळी आहे, यांत शंका नाहीं. आपण सेवेला प्रार्थनेद्वारे टिकून ठेवावें असे जर देवानें प्रयोजन केलेंलें असेल, तर मग सेवा ही भविष्यातील कृपेवरील विश्वासाने टिकून राहावी असे प्रयोजन केलेंलें असणें स्वाभाविक आहे.

    ...more
    View all episodesView all episodes
    Download on the App Store

    Solid JoysBy Alethia4India