Solid Joys

20 June : कृपा ही क्षमा आहे – आणि सामर्थ्य


Listen Later

तरी जो काहीं मी आहे तो देवाच्या कृपेनें आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाहीं; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेनें केलें. (1 करिंथ 15:10)

कृपा ही आम्हीं पाप केल्यांनंतर मिळणारी केवळ दया नव्हे. कृपा पाप न करण्यासाठीं सामर्थ्य देणारे देवाचे कृपादान आणि सामर्थ्य आहे. कृपा ही सामर्थ्य आहे, केवळ पापक्षमा नव्हे.

हे स्पष्ट आहे, उदाहरणार्थ, 1 करिंथ 15:10 मध्यें पौल कृपेचे वर्णन त्याच्या कार्याचे समर्थ बनविणारे सामर्थ्य म्हणून वर्णन करतो. त्याच्या पापांची ती केवळ क्षमा नाहीं; आज्ञाधारकपणांत पुढे वाढत जाण्याचे ते सामर्थ्य आहे. “परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केलें, ते मी केलें असें नाहीं, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेनें केलें.

म्हणून, देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठीं जी धडपड आपण करतो ती आम्हीं आपल्यां स्वतःच्या शक्तीनें केलेंला प्रयत्न नसतो, “देवानें दिलेंल्या शक्तीनें - ह्यासाठीं कीं, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारें व्हावा” (1 पेत्र 4:11). हे विश्वासाचे आज्ञापालन होय. आम्हीं जे केलें पाहिजे ते करण्यासाठीं आम्हांला सामर्थ्य पुरविणारी देवाची क्षणाक्षणाला प्रकट होणारी कृपापूर्ण शक्ती.

याची पुष्टी पौल 2 थेस्सल 1:11-12 मध्यें करतो आणि आमच्यां चांगुलपणाच्या सर्व कार्यांस तो “विश्वासाचे कार्य” म्हणतो, आणि तसे म्हणण्याद्वारें येशूला जे गौरव प्राप्त होते ते “आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेनें” आहे कारण हे त्याच्या “सामर्थ्यानें” घडते. खालील सर्व वाक्प्रचार ऐका :

ह्याकरता तर आम्हीं तुमच्यांसाठीं सर्वदा अशी प्रार्थना करतो कीं, आपल्यां देवानें तुम्हांला झालेंल्या ह्या पाचारणाला योग्य असें मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्यानें पूर्ण करावे; ह्यासाठीं कीं, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेनें आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्यां ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.

ज्या आज्ञाधारकपणामुळें देवाला आनंद होतो तो विश्वासाद्वारें देवाच्या कृपेच्या सामर्थ्यानें उत्पन्न होतो. ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक पातळीवर हीच शक्ती कार्य करते. विश्वासाद्वारें तारणारे देवाच्या कृपेचे सामर्थ्य (इफिस 2:8) देवाच्या कृपेचे तेच सामर्थ्य आहे जे विश्वासाद्वारें पवित्रहि करते.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India