Solid Joys

20 March : येशू ह्या क्षणासाठींच मरण पावला


Listen Later

मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि मी जगतो असे नाहीं, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्यें जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्राच्या विश्वासाच्या योगाने आहे, त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले." (गलतीकरास पत्र 2:20)

आज सकाळी 4:59 वाजता जेव्हां अलार्म वाजला, माझ्या मनात क्षणार्धात एक विचार आला, मला मरणाची वास्तविकता आणि पूर्णतः पवित्र देवासमोर उभे राहण्याचा विचार आला, जिथे माझ्या जीवनाशिवाय प्रशंसनीय माझ्याकडें काहींच नाहीं.

या गोष्टीचे भय केवळ एका वास्तविकतेच्या प्रकाशाने नाहींसे झाले : येशू ख्रिस्त याच क्षणासाठीं मरण पावला.

मग तो विचार निघून गेला.

याचा तत्काळ अर्थ मी अश्याप्रकारे घेतला : एखाद्याचे तारण होते तेव्हां जे होते त्याचें हे सार आहे. अश्या प्रकारेच येशू हा खरा आहे याचा शोध लागतो. अश्याच प्रकारे एखादा व्यक्ति ख्रिस्ताची प्रीति त्याच्या अंतकरणांत जतन करून ठेवतो. अचानक, पाहिल्यांदाच त्यांना विचार येतो आणि दोष-भावनेसह देवाला भेटायचे निर्विवाद सत्य, ते त्यांच्या हृदयाच्या नेत्राने पाहू व समजू शकतात.

त्या दृष्टांताचा दणका अंत:करणाला छिन्नभिन्न करणारा आहे. यामुळे आपल्यांला जाणीव होते कीं आपली एकमेव आशा केवळ एक मध्यस्थच आहे. आपण जर स्वतःच्या बळावर एकटे उभे राहतो, तेहि स्वतःची वाखाणी किंवा कौतुक करण्यासारखे आपल्यांत काहींही नसतांना, आहे ते केवळ पापी जीवन, तर आपण पूर्णपणे हरवलेलो आहोंत. जर या देवाच्या सान्निध्यात अनंतकाळाची काहीं आशा असेल, तर आपल्यांला एका उद्धारकर्त्याची, आपले स्थानापन्न म्हणून उभा राहानार्याची, तारणकर्त्याची गरज लागेल.

ह्या भयानक अडचणीच्या वेळी, ख्रिस्ताच्या सुवार्तेवांचून कोणतीच गोष्ट प्रकाशमान वाटत नाहीं- "त्यानें माझ्यावर प्रीति केलीं व स्वत:ला माझ्याकरिता दिले" (गलती 2:20). एका क्षणार्धात तो तिथें प्रकट होण्यापूर्वी, मला न्यायाच्या वेळेचा सर्व गिळंकृत करणारा अंधकार आणि त्याची भयानकता दिसून आली- हा ईश्वरविज्ञानी निष्कर्ष नाहीं, एक तर्कशुद्ध निष्कर्ष नाहीं, किंवा एक विचार नाहीं, पण अंत:करणाच्या नजरेतून पाहिलेली एक झलक, एक भावना आणि खात्री आहे.

आपला देव हा भस्म करणारा अग्नि आहे. तो दुष्टता सहन करणार नाहीं. आपण पूर्णपणे हरवलेले आहों. माझे अपराध इतके मोठे, इतके खरे होते कीं क्षणार्धात मला जाणवले कीं यासाठीं मी कोणतीच सबब पण देऊ शकत नाहीं. सर्व काहीं अचानक, गुंतागुंतीचे आणि आशाहीन वाटू लागले.

अशा क्षणी, केवळ येशूच महत्वाचा आहे. हे ख्रिस्ता! हे ख्रिस्ता! ही उपकाराची लाट माझ्या हृदयात समावेल का? तू जो देवाचे दान, हीच माझी तातडीची आणि एकमेव गरज!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India