Solid Joys

21 April : आमुलाग्र प्रीतिची किल्ली


Listen Later

”माझ्यामुळे जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.“ (मत्तय 5:11,12)

मत्तय 5:44 मधून आपल्या शत्रूंवर प्रीति करण्याविषयी संदेश देत असतांना जे प्रश्न मी विचारले त्यापैकीं एक होता, तुमचे अपहरण करणाऱ्या आणि मग तुमचा खून करणाऱ्या लोकांवर तुम्हीं कशी प्रीति कराल?

हे आम्हीं कसे करू शकतो? अशाप्रकारची प्रीति करण्याची सामर्थ्य कोठून येते? वास्तविक जगात जेव्हां ते प्रगट होते तेव्हां हे किती आश्चर्यकारक असते याचा विचार करा! ख्रिस्ताचे सत्य आणि सामर्थ्य आणि वास्तविकता प्रीतिपेक्षा इतर कुठल्या गोष्टीद्वारे दाखविली जाऊ शकतांत का?

माझा विश्वास आहे कीं येशू आम्हांला ह्या आमुलाग्र, आत्म-बलिदानात्मक प्रीतिची किल्ली देतो, जिचे वर्णन याच अध्यायात पूर्वी, मत्तय 5:44 मध्ये करण्यात आले आहे.

मत्तय 5:11 मध्ये, तो पुन्हा एकदा छळ होण्याविषयी बोलत आहे, जसा तो बोलत होता जेव्हां त्यानें मत्तय 5:44 मध्ये म्हटलें, “तुम्हीं आपल्या वैर्‍यांवर प्रीति करा,  आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात, त्यांच्यासाठीं प्रार्थना करा.“ या वचनांविषयी उल्लेखनीय हे आहे कीं येशू म्हणतो कीं तुम्हीं केवळ शत्रूचे गैरवर्तन सहन करण्यास समर्थच होऊ नका, तर तुम्हीं त्यात आनंदहि करा. “माझ्यामुळे जेव्हां लोक तुमची निंदा व छळ करतील... तेव्हां तुम्हीं धन्य. आनंद करा व उल्लास करा.”

आनंद करनें आपल्या वैर्‍यांसाठीं प्रार्थना करण्यापेक्षा किंवा त्यांचे कल्याण करण्यापेक्षा आमच्यां आटोक्याबाहेरचे वाटते. जर मी ही मानवीदृष्ट्या अशक्य गोष्ट करू शकलो - म्हणजें, छळ होत असतांना आनंद करणे - तर माझा छळ करणाऱ्यांवर प्रीति करणे शक्य होईल. जर अन्याय आणि यातना आणि हानीच्या दहशतीत आनंदाचा चमत्कार घडू शकला, तर गुन्हेगारांप्रीत्यर्थ प्रीतिचा चमत्कारही घडू शकतो.

येशू या वचनांमध्ये आम्हांला आनंदाची गुरुकिल्ली देतो. तो म्हणतो, “आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे” आनंदाची गुरुकिल्ली आहे देवाच्या भावी कृपेवर विश्वास ठेवणे –म्हणजें, देव तुमच्यासाठीं जे होण्याचे अभिवचन देतो त्यात समाधानी असणे. तो म्हणतो, “आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” छळवनूक होत असतांना आपला आनंद म्हणजें दहशतीच्या या क्षणी परत येण्याचा आणि आम्हांला प्रीति करण्यासाठीं स्वतंत्र करण्याचा स्वर्गाचा आनंद. म्हणून, हा आनंद म्हणजें आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याचे मुक्त सामर्थ्य आहे जेव्हां ते आपला छळ मांडतात.

जर ते खरे असेल, तर प्रीति करण्याची आज्ञा म्हणजें स्वर्गातील गोष्टींवर आपले मन लावण्याची आज्ञा देखील आहे - देव आपल्यासाठीं जे बनण्याचे अभिवचन देतो - पृथ्वीवरील गोष्टींवर नाहीं (कलस्सै. 3:2).

आपल्या वैर्‍यांवर प्रेम करण्याची आज्ञा आमची आशा आणि आमच्यां जीवाचे सखोल समाधान आणि त्याचे सर्वात मोठे प्रतिफळ - त्याची भावी कृपा देवामध्ये शोधण्याची आज्ञा आहे. आमूलाग्र प्रेमाची किल्ली भावी कृपेत विश्वास आहे. आमच्यां वेदनेत आम्हास हे कळले पाहिजे कीं देवाची प्रीति “जीवनाहून उत्तम” आहे (स्तोत्र 63:3). आपल्या वैर्‍यांवर प्रीति केल्याने तुम्हांला स्वर्गात प्रतिफळ प्राप्त होत नाहीं. तर स्वर्गाचे प्रतिफळ जोपासल्याने वैर्‍यांवर प्रीति करण्याचे सामर्थ्य तुम्हास प्राप्त होते.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India