Solid Joys

21 July : निरुत्साहाचा सामना करण्यासाठींआदर्श


Listen Later

माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे. (स्तोत्र 73:26)

जसा कीं मराठीत हा शास्त्रपाठ आहे, या वचनातील क्रियापद शब्दशः केवळ “खचली” असें आहे, "खचू शकते" असे नाहीं. परमेश्वराने पिडलेला आसाफ नावाचा हा स्तोत्रकर्ता म्हणतो, “माझा देह व माझे हृदय ही खचली आहेंत!” मी खिन्न झालों आहे! मी निराश झालों आहे! पण मग लगेचच तो त्याच्या निराशेविरुद्ध एक व्यापक अशा दृष्टिक्षेपांतून अति जोमानें ऐलान करतो : "तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे."

स्तोत्रकर्ता नैराश्याने वैतागून खचत नाहीं. तर तो पलटवार करून आपल्या अविश्वासाबरोबर लढा देतो.

थोडक्यात, तो असे म्हणत आहे, “मी स्वतःमध्यें खूप अशक्त आणि असहाय्य असा आहे आणि मी या गोष्टींशी स्पर्धा करू शकत नाहीं. माझा देह मरणासन्न झाला आहे आणि माझे हृदय जवळजवळ मृत झालें आहे. पण या औदासिनपणाचे कारण काहींही असो, मी नमणार नाहीं. मी स्वतःवर नव्हें, तर देवावर विश्वास ठेवीन. तोच माझें सामर्थ्य व माझा वाटा आहे.”

पवित्र शास्त्रांत औदासिनतेंत बुडलेल्या जीवांशी संघर्ष करणाऱ्या पवित्र जनांची बरीच उदाहरणें आहेत. स्तोत्र 19:7 म्हणते, "परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते." हे या गोष्टीची स्पष्ट कबुली देणें आहे कीं पवित्र जनांच्या जीवाला कधी-कधी पुनरुज्जीवनाची गरज असते. आणि जर असे पुनरुज्जीवन करणें आवश्यक असेल तर एका अर्थाने ते "मृत" असे होते. त्यांना असेच वाटायचे.

दाविद स्तोत्र 23:2-3 मध्यें तेच सांगतो, “तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो” “आपल्या [देवाच्या] मनासारखा मनुष्य” (1 शमुवेल 13:14) असलेला दाविद ह्याच्या जीवाला सुद्धा पुनरुज्जीवनाची गरज होती. त्याचा  जीव तहानेने जणू मृतप्राय झाला होता आणि खचून गेला होता, तरी देव त्याचा जीव संथ पाण्याजवळ घेऊन गेला व त्याला पुन्हा जीवन दिलें.

देवानें या सर्व साक्षी बायबलमध्यें देऊन ठेवल्यात, जेणेंकरून आपण ज्यां ज्यां वेळी नैराश्याने खचतो, आपण त्यांचा उपयोग अविश्वासाशी लढा देण्यांस करावा. आणि आपण अविश्वासाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेऊन लढतो: "देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे." आम्हीं त्या उपदेशाने स्वतःला उत्तेजन देतो. आणि आम्हीं तो सैतानाच्या तोंडावर मारतो, व त्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India