Solid Joys

23 May : येशू तितका मूल्यवान आहे का?


Listen Later

“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाहीं तर त्याला माझा शिष्य होता येणार नाहीं. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाहीं त्याला माझा शिष्य होता येत नाहीं.” (लूक 14:26-27)

येशू निःसंकोचपणे आणि निर्भयपणे आम्हास स्पष्ट एक अशी गोष्ट सांगतो जी ऐकायला “सर्वात वाईट” जाणवते - खिस्ती होण्याची वेदनादायक किंमत: कुटुंबाचा द्वेष करणे (वचन 26), वधस्तंभ उचलणे (वचन 27), संपत्तीचा त्याग करणे (वचन 33). कृपेच्या करारात कुठलीही छोटी छाप नाहीं. त्यांत सर्वकाही मोठ्या अक्षरांत आणि साहसपूर्ण आहे. कृपा स्वस्त नाहीं! अतिशय महागडी! या, आणि माझे शिष्य व्हा.

पण सैतान त्याचे सर्वात वाईट ते लपवितो आणि केवळ आपले सर्वोत्तम ते दाखवितो. सैतानासोबतच्या व्यवहारात जे खरोखर महत्वाचे आहे ते मागच्या पृष्ठावर लहान अक्षरांनी छापलेले आहे.

पुढच्या पानावर मोठ्या, ठळक अक्षरांत शब्द आहेत, “तुम्हीं खरोखर मरणार नाहीं” (उत्पत्ति 3:4) आणि ”तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन” (मत्तय 4:9). पण मागच्या पानावर लहान छापील अक्षरात - इतके लहान कीं तुम्हीं ते केवळ पवित्र शास्त्राच्या भिंगाच्या मदतीने वाचू शकता - त्यात म्हटले आहे, “आणि क्षणिक सुखानंतर, तुम्हीं माझ्यासोबत सदाकाळ अधोलोकात दुःख सोसणार.”

जेथें सैतान आम्हाला केवळ त्याचे सर्वोत्तम दाखवितो, तेव्हां येशू आम्हाला त्याचे “सर्वात वाईट” तसेंच त्याचे सर्वोत्तम का दाखवू इच्छितो? मॅथ्यू हेनरी उत्तर देतात, “सैतान जे सर्वोत्तम ते दाखवतो, पण जे सर्वात वाईट ते लपवितो, कारण त्याचे सर्वोत्तम त्याचे सर्वात वाईट (प्रतिसंतुलित) करणार नाहीं; पण ख्रिस्ताचे सर्वोत्तम विपुलपणे करेल.”

ख्रिस्ताचे पाचारण केवळ दुःख सोसण्याचे आणि स्वतःचा नाकार करण्याचे पाचारण नाहीं; सर्वप्रथम ते पाचारण मेजवानीचे आहे. लूक 14:16-24 मधील दृष्टांताचा मुद्दा हाच आहे. येशू एक गौरवशाली पुनरुत्थानाचे अभिवचन देखील देतो जेथे या जीवनातील सर्व हानींची भरपाई केलीं जाईल (लूक 14:14). तो आम्हास हे देखील सांगतो कीं तो आम्हाला कष्ट सहन करण्यात मदत करील (लूक 22:32). तो आम्हास हे सुद्धा सांगतो कीं आमचा पिता आम्हाला पवित्र आत्मा देईल (लूक 11:13). तो असें अभिवचन देतो कीं आम्हीं जरी राज्यासाठीं मारले गेलो तरीही, “तुमच्यां डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाहीं” (लूक 21:18).

याचा अर्थ हा कीं जेव्हां आपण येशूचे अनुसरण करण्याची किंमत मोजण्यासाठीं बसतो - जेव्हां आपण “सर्वात वाईट” आणि “सर्वोत्तम” यांचे मोजमाप करतो - तेव्हां तो योग्य ठरतो. तो तितका मूल्यवान ठरतो (रोम 8:18; 2 करिंथ 4:17).

असें सैतानासोबत नाहीं. लबाडीची भाकर मनुष्याला गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India