Solid Joys

24 August : निर्मिलेल्यां पदार्थांचा संदेश


Listen Later

स्वतःला शहाणें म्हणता म्हणता ते मूर्ख बनले; आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केलीं. (रोमकरांस 1:22-23)

जर एखाद्या मनुष्य त्याच्या वधूपेक्षा त्याच्या लग्नाच्या अंगठीवर जास्त प्रेम करत असेल तर हा एक मोठा मूर्खपणा ठरेल आणि मोठी शोकांतिका किंवा अति दुर्दैवी प्रसंग ठरेल. परंतु हा शास्त्रपाठ नेमके तेच घडल्याचे सांगत आहे.

मनुष्यजातिने देवाऐवजी निर्मिलेल्यां वस्तूंमध्यें दिसून येणारे त्याचे सर्वश्रेष्ठ सनातन सामर्थ्य व देवपण याच्या प्रतीबिम्बावर प्रीति केलीं आणि खरी प्रीति आणि सामर्थ्य आणि गौरव ह्याची जी अतुलनीय व मूळ प्रतिध्वनी आहे ती ऐकण्यापासून बहिरी झाली.

निर्मिलेल्यां पदार्थांचा संदेश असा आहे :

या संपूर्ण चित्तथरारक विश्वाच्या निर्मितीमागे एक असा महान परमेश्वर आहे जो वैभव आणि सामर्थ्य आणि औदार्य ह्यानें परिपूर्ण आहे; तुम्हीं त्याचे आहांत कारण त्यानें तुम्हांला बनवले आहे. बंडखोरीने भरलेले तुमचे जीवन कायम ठेवण्यासाठीं तो तुमच्याविषयी धीर धरतो. त्याच्याकडें फिरा आणि त्याजवर तुमची आशा ठेवा आणि त्यानें निर्मिलेल्यां पदार्थांवरून दिसून येणाऱ्या त्याच्या हस्तकलेवरच केवळ नव्हे तर प्रत्यक्षात त्याजमध्यें आपला आनंद शोधा.

स्तोत्र 19:1-2 सांगते त्याप्रमाणें, दिवस त्या संदेशाचा "संवाद" जे दिवसाचे आहेंत त्यां सर्वांसाठीं करतो, आणि दिवस तो संवाद आंधळे करणारा तेजस्वी सूर्य आणि निळे आकाश व  ढग आणि ज्ञात व अज्ञात असे असंख्य ग्रह आणि रंग आणि सर्व दृश्यमान गोष्टींची सुंदर रचना यांच्या द्वारे करतो. रात्र देखील त्याच संदेशाचे "ज्ञान" जें रात्रीचे आहेंत त्या सर्वांसाठीं ओतते, रात्र हे ज्ञान अथांग खोल शून्यता आणि उन्हाळ्यातील चंद्र आणि असंख्य तारे आणि विलक्षण ध्वनी आणि थंड वारा आणि उत्तरेकडील तारे यांद्वारे प्रकट करते.

दिवस व रात्र या एकाच गोष्टीचा संदेश देत आहेत : परमेश्वर वैभवशाली आहे! परमेश्वर वैभवशाली आहे!! परमेश्वर वैभवशाली आहे! निर्मिलेल्यां पदार्थांमध्यें आपलें परम समाधान शोधण्यापासून आपलें मन फिरवा आणि ह्या वैभवशाली परमेश्वरामध्यें हर्षानंद करा.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India