Sign up to save your podcasts
Or

“शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलीं; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केलीं आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32)
वास्तविक पाहता, जरी पेत्र तीन वेळा येशूचा नकार केल्यामुळें वाईटरित्या अयशस्वी झाला, तरी येशूनें त्याच्यासाठीं विनंती करून त्याला पूर्णपणें नाश होण्यापासून वाचवले. तो मोठ्या दुःखाने रडला; त्यानंतर त्याला पुन:स्थापित करण्यांत आलें जे पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्रानें दिलेंल्या उपदेशांत त्याचा आनंद व धैर्य यांमध्यें स्पष्ट दिसून आलें. आपला विश्वास ढळू नये म्हणून येशू आज देखील आपल्यासाठीं मध्यस्थी करत आहे. पौल हे रोमकरांस 8:34 मध्यें सांगतो.
येशूनें अभिवचन दिलें कीं तो आपल्या मेंढरांचे संरक्षण करील; त्यांचा कधीही नाश होणार नाहीं. “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतांत; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतांत; मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाहीं आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाहीं” (योहान 10:27-28).
याचे कारण हे कीं स्वतः देव आपल्या मेंढरांना विश्वासांत राखून ठेवतो. “ज्याने तुमच्या ठायीं चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे” (फिलिप्पै 1:6).
विश्वासाचे हे युद्ध लढत असतांना आपल्याला स्वबळावर सोडून दिलें जात नाहीं. "कारण इच्छा करणें व कृती करणें हे तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे" (फिलिप्पै 2:13).
आम्हांला देवाच्या वचनावर भरवसा आहे कीं, जर आपण त्याची संतती आहों, तर तो “देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्यें येशू ख्रिस्ताच्या द्वारे करील व तो आपल्या इच्छेप्रमाणें करण्यास आपल्याला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करील” (इब्री 13:21).
विश्वास आणि आनंद यांत आपलें टिकून राहणें हे अखेरीस आणि निर्णायकपणें देवाच्याच हातांत आहे. होय, आपण लढले पाहिजे, पण हा लढा आपल्याठायीं साध्य करून देणारा तो देव आहे. आणि तो नक्कीच ते करेल, कारण रोमकरांस 8:30 मध्यें सांगितल्याप्रमाणें, "ज्यांना त्यानें नीतिमान ठरवले त्यांचा त्यानें गौरवही केला." देवाच्या नीतिमान ठरविण्यांत आलेंल्यां लेकरांचे गौरव करणें तितकेच चांगले आहे.
ज्यांना त्यानें विश्वासात आणले आहे आणि नीतिमान ठरवले आहे त्यांपैकीं एकालाही तो गमावणार नाहीं.
By Alethia4India“शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केलीं; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठीं मी विनंती केलीं आहे; आणि तू वळलास म्हणजें तुझ्या भावांना स्थिर कर.” (लूक 22:31-32)