Solid Joys

25 April : पौलाचे तारण तुमच्यासाठीं होते


Listen Later

कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्यानें विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केलें ते न समजून अविश्वासामुळे केलें, म्हणून माझ्यावर दया झालीं; आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीति ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झालीं. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झालीं“ (1 तीमथ्य 1:13-14,16).

पौलाचे परिवर्तन हे तुमच्यासाठीं होते. तुम्हीं ते ऐकले का? पुन्हा पहा: “जे युगानुयुगाच्या जीवनासाठीं त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झालीं.” ते आम्हीं आहोत – म्हणजें, तुम्हीं आणि मी.

मला आशा आहे कीं तुम्हीं हे अगदी वैय्यक्तिकरित्या घ्याल. देवानें जेव्हां पौलाला निवडले आणि ज्याप्रकारे त्यानें आपल्या सार्वभौम कृपेद्वारे त्याला तारले तेव्हां हे सर्व त्यानें तुम्हांला लक्षात ठेऊन केलें.

जर तुम्हीं सार्वकालिक जीवनासाठीं येशूवर विश्वास ठेवता - अथवा जर तुम्हीं सार्वकालिक जीवनासाठीं त्याच्यावर आजही विश्वास ठेऊ शकता - तर पौलाचे परिवर्तन तुमच्यासाठीं आहे. ज्याप्रकारे त्याचे परिवर्तन घडून आले त्याचा मुद्दा तुम्हांला ख्रिस्ताचे अविश्वसनीय धैर्य हूबेहूब प्रगट करावे हा आहे.

लक्षात ठेवा कीं परिवर्तनापूर्वी पौलाचे जीवन येशूसाठीं एक दीर्घकालीक परीक्षा होती. “माझा छळ का करतोस?” दमिश्काच्या मार्गावर येशूनें विचारले (प्रेषितांची कृत्ये 9:4). “तुझे अविश्वासाचे आणि बंडखोरीचे जीवन हा माझा छळ आहे!” आणि तरीही पौल आम्हांला गलतीकरांस 1:15 मध्ये सांगतो कीं देवानें त्याला त्याच्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून त्याचा प्रेषित होण्यासाठीं वेगळे केलें. हे अद्भुत आहे. याचा अर्थ हा कीं त्याच्या परिवर्तनाच्या क्षणापर्यंत त्याचे संपूर्ण जीवन देवाशी एक दीर्घकालीक गैरवर्तन होते, येशूचा एक दीर्घकालीक अव्हेर आणि उपहास होता - ज्याने त्याला जन्मास येण्यापूर्वी प्रेषित होण्यासाठीं निवडले होते.

म्हणून पौल म्हणतो कीं त्याचे परिवर्तन येशूच्या धैर्याचे दैदित्यमान प्रदर्शन आहे. आणि तेच तो आज आम्हास देतो.

येशूनें पौलाला तारिले, व जेव्हां आणि ज्याप्रकारे त्यानें ते केलें, ते सर्व आम्हांला उदाहरण ठरावे यासाठींच. आम्हास “आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून” (1 तीमथ्य 1:16). अन्यथा आमचे धैर्य खचेल. अन्यथा आम्हीं असा विचार करू कीं तो खरोखर आम्हास तारू शकला नसता. कदाचित आम्हीं विचार करू कीं तो रागावू शकतो. कदाचित आम्हीं विचार करू कीं आम्हीं दूर निघून गेलो आहोत. कदाचित आम्हीं विचार करू कीं आमच्यां अतिप्रिय जणांचे परिवर्तन होऊ शकत नाहीं - येशूच्या सार्वभौम, ओसंडून वाहणाऱ्या कृपेद्वारे - अचानक, अनपेक्षितपणे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India