Solid Joys

25 December : नाताळाच्या तीन भेटवस्तूं


Listen Later

मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला..... अहो माझ्या मुलांनो, तुम्हीं पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केलें, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. (1 योहान 3:7-8; 2:1-2)

माझ्यासोबत या लक्षवेधक परिस्थितीचा विचार करा. जर देवाचा पुत्र यासाठी प्रकट झाला कीं तुम्हीं पाप करून नये म्हणून तुमचे सहाय्य करावें  - सैतानाची कामे नष्ट करावयास आला - आणि तो मरावयास देखील आला यासाठीं कीं, जेव्हां तुम्हीं पाप करता, तेव्हां प्रायश्चित व्हावें, देवाचा क्रोध दूर करावा, तर मग तुमचे जीवन कसें असावे याविषयी हे काय सुचविते?

तीन गोष्टी. आणि त्यां आम्हीं कह्यात घेणें सुन्दर गोष्ट आहे. नाताळाच्या भेटवस्तू म्हणून मी त्यां तुम्हाला थोडक्यात देत आहे.

भेटवस्तूं  #1. जीवन जगण्याचा स्पष्ट हेतू

यानें हे सूचित होते कीं तुमच्याकडें जीवन जगण्याचा स्पष्ट हेतू आहे. नकारात्मकरित्या पाहता, हे फक्त असे आहे: पाप करू नका - ज्याने देवाचा अनादर होतो ते करू नका. “तुम्हीं पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो” (1 योहान 2:1).  “कारण सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला” (1 यूहन्ना 3:8). 

जर तुम्हीं विचारले, “तुम्हीं आम्हास ह्या भेटवस्तू नकारात्मकरित्या देण्याऐवजी, सकारात्मकरित्या देऊ शकता का.” उत्तर आहे: होय, त्याचा सारांश 1 योहान 3:23 मध्यें आहे. योहानाच्या संपूर्ण पत्र का लिहिण्यांत आलें याचा हा मोठा सारांश आहे. एकमेव “आज्ञेकडें” लक्ष द्या - “त्याची आज्ञा ही आहे कीं, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्यानें आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणें आपण एकमेकांवर प्रीती करावी.” या दोन गोष्टी परस्पर अगदी घनिष्ठपणें संबंधित आहेत कारण योहान त्यांस एक आज्ञा म्हणतो : येशूवर विश्वास ठेवा आणि इतरांवर प्रीति करा. हाच तुमचा हेतू आहे. हा ख्रिस्ती जीवनाचा सारांश आहे. येशूवर विश्वास ठेवणें, ज्याप्रकारे येशूनें प्रीति केली आणि त्याच्या शिष्यांनी आम्हास जशी प्रीति करावयास शिकविले तशी प्रीति करणें. येशूवर विश्वास ठेवा, लोकांवर प्रीति करा. ही पहिली भेटवस्तू आहे: जीवन जगण्याचा हेतू.

भेटवस्तूं #2. ही आशा कीं आमच्या अपराधांची क्षमा केली जाईल

या दुहेरी सत्याचा दुसरा अर्थ हा आहे कीं ख्रिस्त पाप करण्याचा आमच्या वृत्तीचा नाश करावयास व आमच्या पापांची क्षमा करावयास आला: आम्हीं आमच्या पापावर विजय मिळविण्यात प्रगती करतो जेव्हां आम्हास ही आशा असते कीं आमच्या चुकांची क्षमा प्राप्त होईल. पापाशी लढत असतांना जर तुम्हांला आशा नसेल कीं देव तुमच्या चुकांची क्षमा करील, तर तुम्हीं निराश होता.

तुमच्यापैकीं अनेक जण नवीन वर्षात काही बदल करण्याविषयी संकल्प करीत असतील, कारण तुम्हांला पापाची सवय लागली आहे आणि तुम्हीं त्यातून बाहेर पडू इच्छिता. तुम्हांला खाण्याच्या काही नवीन सवयी हव्या आहेत. मनोरंजनाच्या नवीन सवयी. देण्याच्या नवीन सवयी. तुमच्या जोडीदाराशी संबंध साधण्याच्या नवीन सवयी. कौटुंबिक भक्तीच्या नवीन सवयी. झोप आणि व्यायामाच्या नवीन सवयी. साक्ष देण्याच्या नवीन सवयी. धाडसाच्या नवीन सवयी. पण तुम्हीं आता संघर्ष करीत आहात, हा विचार करीत आहा कीं त्याचा काही उपयोग होईल का. बरे तर, येथे तुमचे दुसरे नाताळा बक्षीस आहे: ख्रिस्त केवळ सैतानाच्या कामांचा -  नाश करण्यासाठीं आला नाहीं - आमच्या लढ्यात अपयशाच्या अनुभवामुळें तो आमच्यासाठीं कैवारी किंवा वकील म्हणून आला आहे. 

म्हणून मी तुम्हास विनंती करतो, हे तथ्य कीं अपयश हा शेवट नाहीं, याने तुम्हास लढण्याची आशा प्राप्त व्हावी. पण सावध असां! जर तुम्हीं देवाच्या कृपेला पाप करण्याचा परवाना बनविता आणि म्हणतां, “जर मी अपयशी ठरत असेल, आणि त्यानें काहींच फरक पडत नाहीं, तर मग पापाशी लढण्याचा त्रास का घ्यावा? - जर तुम्हीं तसे म्हणत असाल, आणि तो तुमचा हेतू असेल, आणि त्यानुसार कार्य करीत असाल, तर कदाचित तुमचा नवा जन्म झालेंला नाहीं आणि तुम्हीं थरथरायला पाहिजे.

परंतु तुमच्यापैकीं बरेच जण असें नाहींत. तुमच्यामध्यें बरेच आहेत जे आपल्या जीवनातील पापमय सवयींशी लढू इच्छितात. आणि देव तुम्हास जे म्हणत आहे ते हे आहे : ख्रिस्त तुमची पापें झाकतो या गोष्टीने तुम्हास लढण्याची आशा दिली पाहिजे. “तुम्हीं पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केलें, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे.”

भेटवस्तूं #3. ख्रिस्त आमचे सहाय्य करील

शेवटी, या दुहेरी सत्याचा तिसरा अर्थ कीं ख्रिस्त आमच्या पाप करण्याच्या वृत्तीचा नाश करावयास आणि आमच्या पापांची क्षमा करावयास आला, हा आहे: ख्रिस्त खरोखर पापाशी आमच्या लढ्यात आमचे सहाय्य करील. तो खरोखर सहाय्य करील. तो तुमच्या पक्षास आहे. पाप करण्यांत खूप मज्जा आहे म्हणून तो पापाचा नाश करावयास आला नाहीं. तो पापाचा नाश करावयास आला कारण पाप प्राणघातक आहे. ते सैतानाचे फसवे कार्य आहे, आणि जर आम्हीं त्यास लढा दिला नाहीं तर ते आमचा नाश करील. तो आम्हास दु:ख देण्यासाठी नाहीं, तर आम्हास सहाय्य करावयास आला.

तर आता, तुमच्यासाठीं नाताळाची तीसरी भेटवस्तू ही आहे: पापावर विजय मिळविण्यासाठी ख्रिस्त तुमचे सहाय्य करील. 1 योहान 4:4 म्हणते, “जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.” येशू जिवंत आहे, येशू सर्वसमर्थ आहे, येशू विश्वासाद्वारे तुमच्याठायीं राहतो. नवीन वर्षात तो पापासोबत तुमच्या लढ्यात तुमची मदत करील. त्याच्यावर आपला भाव ठेवा.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India