Solid Joys

26 July : द्रव्याचा लोभ धरणें म्हणजें काय


Listen Later

कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे. (1 तीमथ्य 6:10)

पौलाने हे लिहिले तेव्हा त्याला काय म्हणायचे होते? तुम्हीं पाप करता तेव्हा पैसा तुमच्या मनात असतो असा त्याचा अर्थ असू शकत नाहीं. आपण अशावेळी देखील पुष्कळ पापें करीत असतो जेव्हा आपल्या डोक्यांत पैशांचा तिळमात्रहि विचार नसतो.

मी त्याचा असा अर्थ सुचवितो : त्याला असे म्हणायचे होते कीं जगात असलेल्यां सर्व वाईट गोष्टी एका विशिष्ट प्रकारच्या अंत:करणांतून येतांत, म्हणजें अशा अंत:करणांतून ज्याला द्रव्याचा लोभ असतो.

मग द्रव्याचा लोभ म्हणजें काय? हिरव्या कागदाची किंवा तांब्याची नाणी किंवा चांदीची नाणी यांची पूजा करणें असा त्याचा अर्थ होत नाहीं. द्रव्याचा लोभ म्हणजें काय हे जाणून घेण्यासाठीं तुम्हांला हा प्रश्न करावा लागेल, द्रव्य किंवा पैसा म्हणजें नेमके काय? मी या प्रश्नाचे उत्तर असे देईन : द्रव्य किंवा पैसा हे फक्त मानव तरतुदींचे एक साधन आहे. द्रव्य म्हणजें देवाकडून मिळविण्याऐवजी तुम्हीं माणसांकडून — इतर मानवांकडून — जे काहीं मिळवू शकता तें.

देव पैशाच्या नव्हे तर कृपेच्या चलनात व्यवहार करतो: “हो तान्हेल्यांनो, तुम्हीं सर्व जलाशयाकडें या, जवळ पैसा नसलेले तुम्हीं या; सौदा करा, खा!” (यशया 55:1). पैसा हे मानवी संसाधनांचे चलन आहे. म्हणून, जें अंत:करण पैशावर प्रीति करते ते असे अंत:करण आहे जे मानवी संसाधने आपल्याला काय देऊ शकतांत यांवर आपली सर्व आशा अडकवून ठेवते, आपल्या सर्व सुखांचा शोध त्यांत घेते व त्यावर भरवसा ठेवते.

अशाप्रकारे, द्रव्याचा लोभ हे अक्षरशः पैशावर असा विश्वास– भरवसा (विश्वास, खात्री) ठेवण्यासारखेच आहे कीं तुमच्या सर्व गरजा पैशानेच पूर्ण होतील आणि त्यातंच तुमचे सर्व सुख व समाधान आहे.

द्रव्याचा लोभ (किंवा पैशावर प्रीति करणें) हा देवाच्या भावी कृपेवरील विश्वासाची जागा घेतो. हे भविष्यासाठीं मानवी संसाधनांवर विश्वास ठेवणें आहे – म्हणजें अशी गोष्ट जी तुम्हीं पैशाने मिळवू शकता किंवा जी तुम्हीं राखून ठेऊ शकता. म्हणून पैशावर प्रेम करणें किंवा पैशावर विश्वास ठेवणें, हे देवाच्या वचनांवर अविश्वासाची खोली आहे. येशूनें मत्तय 6:24 मध्यें म्हटलें, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाहीं......तुम्हीं देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाहीं.”

तुम्हीं एकाच वेळी देवावर आणि पैशावर भरवसा ठेवू शकत नाहीं. एकावर विश्वास म्हणजें दुसऱ्यावर अविश्वास. जे अंत:करण पैशावर प्रीति करते - जे आनंदासाठीं पैशावर अवलंबून राहते – ते अंत:करण आपल्या आत्म्याची तृप्ती म्हणून येशूमध्यें देव आपल्यासाठीं जो कांही आहे त्यावर अवलंबून राहत नाहीं.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India