Solid Joys

27 August : येशू आपल्या सर्व शत्रूंना तुडवील


Listen Later

नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. (1 करिंथ 15:24)

ख्रिस्ताच्या राज्याची व्याप्ती किती आहे?

पुढील वचन, 1 करिंथ 15:25 सांगते, "कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केलें पाहिजे." येथें प्रयुक्त केलेंला शब्द “सर्व” त्याच्या राज्याची व्याप्ती सूचित करतो.

त्याचप्रमाणें वचन 24 मध्यें प्रयुक्त केलेंला शब्द “सर्व” देखील तेंच सूचित करतो : "नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल."

असा कोणताही रोग नाहीं, व्यसन नाहीं, महाकाय नाहीं, वाईट सवय नाहीं, दोष नाहीं, दुर्गुण नाहीं, दुर्बलता नाहीं, स्वभाव नाहीं, मन:स्थिती नाहीं, गर्व नाहीं, आत्म-दया नाहीं, कलह नाहीं, मत्सर नाहीं, विकृती नाहीं, लोभ नाहीं, आळशीपणा नाहीं कीं ज्यांवर ख्रिस्त आपल्या प्रतिष्ठेचा शत्रू म्हणून विजय मिळविणार नाहीं.

आणि या अभिवचनांत असलेले उत्तेजन असें कीं जेव्हा तुम्हीं तुमच्या विश्वासाच्या आणि तुमच्या पवित्रतेच्या शत्रूंशी युद्ध करण्यासाठीं सज्ज होता तेव्हा युद्ध लढणारे तुम्हीं एकटे नाहीं.

येशू ख्रिस्त हा वर्तमान समयी, या युगातच, त्याच्या सर्व शत्रूंना आपल्या पायाखाली ठेवत आहे. सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य यांवर विजय मिळविला जाईल.

म्हणून, लक्षात ठेवा कीं ख्रिस्ताच्या राज्याचा प्रसार हा तुमच्या जीवनात आणि या विश्वात असलेल्या त्याच्या गौरवाच्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या शत्रूपर्यंत पोहोचतो. सर्व शत्रूंचा पराभव केला जाईल.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India