Solid Joys

28 July : आम्हींधैर्य का सोडत नाहीं


Listen Later

म्हणून आम्हीं धैर्य सोडत नाहीं; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठीं अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्हीं दृश्य गोष्टींकडें नाहीं तर अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (2 करिंथ 4:16-18)

पौलाला जसा पूर्वी रस्ता दिसत होता तसा तो आता पाहू शकत नाहीं (कारण त्या काळी चष्मा नव्हता). जसे त्याला पूर्वी ऐकू येत असे तसे त्याला आता ऐकू येऊ शकत नाहीं (कारण त्या काळी श्रवणयंत्र नव्हते). मारहाणीपासून जसा तो पूर्वी बरा व्हायचा तसा तो आता लवकर बरा होऊ शकत नाहीं (कारण त्या काळी आजच्याप्रमाणें कोणतीही एंटीबायोटिक औषधे नव्हती). एका नगरातून दुसऱ्या नगरांकडें चालत जात असतांना त्याची शक्ती आता पूर्वीसारखी टिकत नाहीं. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सुरकुत्या स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्याची स्मरणशक्ती आता पूर्वीसारखी तीक्ष्ण राहिलेली नाहीं. आणि तो कबूलहि करतो कीं ह्या सर्व दुर्बळपणामुळें त्याच्या विश्वासाला आणि आनंदाला आणि धैर्याला मोठा धोका होता.

तरी तो धैर्य सोडत नाहीं. का?

तो धैर्य सोडत नाहीं कारण कीं त्याचा अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कसा?

त्याच्या अंतरात्म्याचे नवीनीकरण एका अशा गोष्टीमुळें होत असे जी पूर्णपणें अद्भुत अशी होती : अंतरात्म्याचे ते नवीनीकरण अशा गोष्टींकडें लक्ष लावल्यामुळें होत असे ज्यांना तो पाहू शकत नव्हता, म्हणजें ज्यां अदृश्य अशा होत्यां.

आम्हीं दृश्य गोष्टींकडें नाहीं तर अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. (2 करिंथ 4:18)

ह्याच कारणामुळें पौल धैर्य सोडत नव्हता : म्हणजें जे तो पाहू शकत नव्हता त्यांकडें तो लक्ष लावत होता. तर मग, त्यानें ज्या अदृश्य गोष्टींकडें लक्ष लावलें, तेव्हां त्याला काय दिसलें?

2 करिंथकर 5:7 मध्यें काहीं वचनांनंतर, तो म्हणतो, "आम्हीं विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणें चालत नाहीं." याचा अर्थ असा नाहीं कीं तिथे काय आहे याचा काहीं पुरावा नसताना देखील तो जणू अंधारात झेप घेत होता. याचा अर्थ असा आहे कीं आपण वर्तमान समयी ह्या जगात राहत असतांना ज्यां गोष्टीं वास्तविकरीत्या अति मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण आहेंत त्यांची समज आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडें आहे.

आपण या अदृश्य गोष्टींकडें सुवार्तेच्या भिंगातून “पाहतो.” आम्हीं आमच्या धैर्याचे नूतनीकरण करतो—म्हणजें ज्यांनी ख्रिस्ताला देहरूपी साक्षात पाहिले त्यांनी दिलेंल्यां साक्षीमध्यें आपण पाहत असलेल्या अदृश्य, वस्तुनिष्ठ सत्याकडें आपली दृष्टि लावून आम्हीं आपली अंतःकरणें बळकट करतो.

 “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठीं आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (2 करिंथ 4:6). "येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश." ज्या क्षणी सुवार्तेद्वारे आमच्या अंतःकरणात हा प्रकाश पडतो त्या क्षणी ते आमच्या दृष्टींस पडते. 

हा प्रसंग घडला त्या क्षणी आम्हीं ख्रिस्ती झालो – मग आम्हांला ते समजले असो वा नसो. आणि आपणही पौलाबरोबर आपल्या अंतःकरणाच्या डोळ्यांनी पाहणें गरजेचे आहे, जेणेंकरून आपणही धैर्य सोडून देऊं नये.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India