Solid Joys

28 May : धीराचे प्रतिफळ


Listen Later

“तुम्हीं माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानें ते चांगल्यासाठींच योजले होते.” (उत्पत्ति 50:20)

उत्पत्ती 37-50 मधील योसेफाची गोष्ट आम्हीं देवाच्या सार्वभौम, भविष्यातील कृपेवर विश्वास का ठेवला पाहिजे याविषयी एक मोठा धडा आहे.

योसेफाला त्याच्या भावांनी गुलाम म्हणून विकले, ज्यामुळें त्याच्या धीराची मोठी परीक्षा घेण्यांत आली असावी. पण त्याला मिसर देशात पोटीफरच्या घरात चांगली नोकरी दिली गेली. मग, जेव्हां तो आज्ञापालनाच्या अनियोजित स्थानी सरळपणाने वागत असतो, तेव्हां पोटीफरची पत्नी त्याच्या प्रामाणिकपणाविषयी खोटे बोलते आणि त्याला तुरुंगात टाकण्यात येते - त्याच्या धीराची दुसरी मोठी परीक्षा.

पण पुन्हा परिस्थिती सुधारते आणि बंदिशाळेचा अधिकारी त्याला जबाबदारी आणि आदर देतो. पण जेव्हां त्याला वाटते कीं त्याला ज्याच्या स्वप्नाचा त्यानें अर्थ सांगितला होता त्या फारोच्या प्यालेदारामुळें मुक्ती मिळणार आहे, तो प्यालेदार त्याला आणखी दोन वर्षे विसरून जातो. त्याच्या धीराची आणखी एक दुःखद परीक्षा.

शेवटी, या सर्व वळणांचा आणि विलंबांचा अर्थ स्पष्ट होतो. योसेफाला मिसर देशचा नेता म्हणून तयार केलें जाते, फारोनंतर त्याचे दुसरे स्थान आहे. ज्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते त्यांना तो उपासमारीपासून वाचवतो. बऱ्याच काळपासून दुरावलेल्या या भावांना योसेफ म्हणतो, “देवानें मला तुमच्यांपुढे ह्यासाठीं पाठवले कीं तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा...तुम्हीं माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवानें ते चांगल्यासाठींच योजले होते” (उत्पत्ति 45:7;50:20).

या प्रदीर्घ वर्षांच्या निर्वासन आणि गैरवर्तनाच्या काळात योसेफाच्या धीराची गुरुकिल्ली कोणती असावी? उत्तर आहे: देवाच्या सार्वभौम, भावी कृपेवर विश्वास - अनियोजित जागा आणि अनियोजित गतीस कल्पनीय सुखद अंतात बदलणाऱ्या देवाच्या सार्वभौम, भावी कृपेवर विश्वास. हीच आपल्या धीराची गुरुकिल्ली आहे. जेव्हां आपल्या जीवनांत सर्वात विचित्र आणि सर्वात दुःखद वळण येतांत, तेव्हां देव आपल्यासाठीं कार्य करत आहे असा विश्वास तुम्हीं ठेवता का?

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India