Solid Joys

28 September : आमचे कल्याण हेच त्याचे गौरव आहे


Listen Later

“तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजें तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणें तिचे फळ देईल.” (मत्तय 6:6)

ख्रिस्ती हेडोनिझम -म्हणजें सुख हेच अंतिम उद्दिष्ट- या सिद्धांतावर एक सामान्य आक्षेप हा घेतला जातो कीं हा सिद्धांत मनुष्याच्या हितांना देवाच्या गौरवापेक्षा अधिक महत्व देतो – म्हणजें हे शिक्षण माझ्या आनंदाला देवाच्या सन्मानाच्या वर स्थान देते. परंतु खरे पाहता, ख्रिस्ती हेडोनिझमचा हा अर्थ नाहीं हे मीं ठामपणें सांगतो.

ठामपणें सांगायचे तर, आम्हीं ख्रिस्ती हेडोनिस्ट म्हणून आमच्या सर्व शक्तीने आमचे हित आणि आमच्या आनंदाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो. आम्हीं तरुण जोनाथन एडवर्ड्स यांच्या पुढील संकल्पाचे समर्थन करतो : "संकल्प : मी माझ्यासाठीं दुसऱ्या जगात शक्य तितका आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीन -सर्व शक्तीने, सामर्थ्याने, श्रमाने आणि आवेशाने, किबहुंना आक्रमक वृत्तीनेहि, माझ्याकडून शक्य होईल तितके, किंवा माझ्या मनांत येईल तितके, मीं अनुसरू शकतो अशा कोणत्याही मार्गाने.”

परंतु आपल्याला बायबलमधून (आणि एडवर्ड्सकडून!) ही ज्ञानप्राप्ती झालीं आहे कीं देवाला आपल्यावर -आम्हा पापी लोकांवर, ज्यांना त्याची नितांत गरज आहे- त्याची कृपा ओतण्याद्वारे त्याच्या गौरवाच्या परिपूर्णतेचा महिमा वाढवणें आवडते.

म्हणून, आपल्या हितांचा आणि आपल्या आनंदाचा पाठलाग करणें, मग त्यासाठीं आपल्याला आपलें जीवन गमवावे लागलें तरी, हे देवाचा सम्मान आणि त्याचा आनंद यांपेक्षा आणि देवाचे जे गौरव यापेक्षा कधीही वर नाहीं, तर हा पाठलाग नेहमीच देवामध्यें असतो. बायबलमधील सर्वात मौल्यवान सत्यांपैकीं एक हे आहे कीं देवाच्या कृपेच्या विपुलतेचा महिमा करणें हे पापी लोकांचे त्याच्यामध्यें आणि केवळ त्याच्यामध्यें आपला आनंद शोधणें आहे!

जेव्हा आपण लहान बालकांसारखे स्वतःला लीन-दीन करतो आणि मी माझा समर्थ या वृत्तीचे कुपोषण करतो, तर आपल्या पित्याच्या मिठीत असलेल्या आनंदाकडें हर्षाने धाव घेतो, तेव्हा त्याच्या कृपेचा महिमा वाढतो आणि आपल्या जिवाची तळमळ तृप्त होते. आपलें कल्याण आणि त्याचे गौरव परस्पर विलीन झालें.

जेव्हा येशू मत्तय 6: 6 मध्यें असे अभिवचन देतो, "तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणें तिचे फळ देईल," तेव्हां हे ते फळ आहे ज्याच्या पाठीस आपण लागावें अशी देव आपल्याठायीं इच्छा बाळगतो. तो आपल्याला अशा आनंदाचे आमिष देत नाहीं जो तो आपल्याला देऊ करत नाहीं! पण हे फळ - हा आनंद –जेव्हां आम्हीं लोकांनी आपलें गौरव करावें या वृत्तीपासून दूर जातो आणि देवाचा शोध घेण्यासाठीं आपल्या खोलीत जातो तेव्हां काठोकाठ वाहणारा तो हा आनंद आहे.

यास्तव, ख्रिस्ती हेडोनिस्ट, म्हणजें सुख हेच अंतिम उद्दिष्ट या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे लोक, हे त्यांच्या आनंदाला देवाच्या गौरवावर उंच स्थान देत नाहींत. तर ते आपल्या आनंदाचा शोध प्रत्यक्ष देवामध्यें घेतांत, आणि ‘जेव्हा आपण देवामध्यें सर्वात जास्त तृप्त असतो, तेव्हा देव आपल्यामध्यें सर्वात जास्त गौरव पावतो’ हे महान सत्य शोधून काढतांत.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India