Solid Joys

29 April : दिवस जवळ आला आहे


Listen Later

“रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे” (रोम 13:12)

दुःख भोगत असलेल्या ख्रिस्ती लोकांसाठीं ही आशा देणारी वचनें आहेंत. ज्या ख्रिस्ती लोकांना स्वतःच्या पापाचा तिटकारा वाटतो आणि पापापासून मुक्त होण्याची उत्कंठा बाळगत आहेत त्यांच्यासाठीं हे आशेचे अभिवचन आहे. जे इच्छा धरतात कीं अंतिम शत्रू, म्हणजें मृत्यूवर मात करून त्याला अग्नीच्या सरोवरात टाकले जावे त्या ख्रिस्ती लोकासाठीं हे आशेचे वचन आहे (प्रकटीकरण 20:14). वाह!

हें त्यां सर्वांसाठीं आशेचे अभिवचन कसे काय आहे?

“रात्र” अंधाराच्या या युगाचे आणि त्यातील सर्व पाप, दुःख आणि मरण यांचे प्रतीक आहे. आणि पौल याबद्दल काय म्हणतो? ”रात्र सरत आली आहे.” पापाचे आणि दुःखाचे आणि मृत्यूचे युग संपुष्टात येत आहे. नीतिमत्व आणि शांती आणि संपूर्ण आनंदाचा दिवस उदयास येत आहे.

तुम्हांला वाटेल कीं, “2,000 वर्षे दीर्घकालीक पहाटेसारखी वाटतात.” एका दृष्टिकोनातून हे तसेच आहे. आणि आम्हीं ओरडतो, हे परमेश्वरा, किती काळ हे असेच राहणार? परंतु पवित्र शास्त्राची विचारसरणी “किती काळ!” या विलापाच्या पलीकडें आहे. ती जगाच्या इतिहासाकडें वेगळ्या दृष्टीकोनाने पाहते.

मुख्य फरक हा आहे कीं “दिवस” – ख्रिस्ताचे नवीन युग - खरोखरच येशू ख्रिस्तामध्ये उदय पावले आहे. येशू हा या पतित युगाचा शेवट आहे. म्हणजें, या पतित युगाचा शेवट जसा त्यानें या जगात प्रवेश केला. येशू जेव्हां मेला आणि पुन्हा जिवंत झाला तेव्हां त्यानें पाप आणि वेदना आणि मृत्यू आणि सैतान यांचा पराभव केला. युगांची निर्णायक लढाई संपली आहे. राज्य आले आहे. सार्वकालिक जीवन आले आहे.

आणि जेव्हां दिवस उगवतो - जसे येशूच्या येण्याच्या वेळी होते - कोणीही दिवसाच्या येण्याबद्दल शंका करू नये. पहाटेने 2,000 वर्षे काढली तरीही नाहीं. 2 पेत्र 3:8 मध्ये पेत्राने म्हटल्याप्रमाणे, ”तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्हीं विसरू नका कीं, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत.“ पहाट झालीं आहे. दिवस उगवला आहे.. सूर्य उगवून पूर्ण दिवस होण्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाहीं.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India