Sign up to save your podcasts
Or

“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” (1 शमुवेल 2:25)
एली याजक जेव्हां त्याच्या मुलांना त्यांच्या पापांसाठीं हटकत असें तेव्हां ते त्याच्या आज्ञेचे पालन करीत नसत. आमच्या जीवनांसाठीं ह्या वचनाचे तीन अर्थ आहेत.
1) फार काळपर्यंत आणि अतिशय गंभीरपणे पाप करणे शक्य आहे कीं स्वतः परमेश्वरहि पश्चात्तापबुद्धी देणार नाहीं.
म्हणूनच पौलाने म्हटले कीं आपण प्रार्थना आणि शिक्षण देण्याचे सर्व कार्य पार पाडल्यानंतर, “कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठीं पश्चात्तापबुद्धी देईल,” - “त्यांस पश्चातापबुद्धी देईलच” असें नाहीं (2 तीमथ्य 2:25). जेव्हां आपण पापाचे जीवन जगत असतो तेव्हां पश्चातापासाठीं “फार उशीर” झालेंला असू शकतो. इब्री 12:17 मध्यें जसे एसावाबद्दल म्हटले आहे, “त्यानें जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चात्तापाची संधी त्याला मिळाली नाहीं.” त्याचा त्याग करण्यात आला, तो पश्चाताप करू शकला नाहीं.
याचा अर्थ हा नाहीं कीं जे लोक संपूर्ण आयुष्यभर पाप केल्यानंतर खरोखर पश्चात्ताप करतात त्यांचे तारण होऊ शकत नाहीं. ते नक्कीच तारण पावू शकतात आणि पावतील! देव अत्यंत दयाळू आहे. वधस्तंभावरील चोराची आठवण करा. येशू ने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” (लूक 23:43).
2) कधी कधी देव पाप करणाऱ्या व्यक्तीस योग्य ते करू देत नाहीं.
“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” त्यांच्या पित्याचा शब्द ऐकणे म्हणजें जे योग्य ते त्यांना करावयांस पाहिजे होते. पण ते तसें करेनात. का? “कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.”
त्यांनी त्यांच्या पित्याची आज्ञा पाळली नाहीं या मागे कारण हे होते कीं त्यांच्या बाबतींत देवाचे हेतू निराळे होते, आणि त्यानें त्यांना पाप आणि मृत्यूसाठीं सोडून दिलें होते. यावरून असें दिसून येते कीं असें समय आहेत जेव्हां देवाची पूर्वनियोजित योजना ही देवाच्या नियमशास्त्रांत प्रकट झालेंल्या इच्छेपेक्षा वेगळी असते.
3) कधीकधी देवाची प्रकट इच्छा पूर्ण व्हावी यासाठीं आपल्या प्रार्थना केल्या जात नाहींत कारण देवानें आपल्या पवित्र आणि बुद्धीसम्मत हेतूंसाठीं काहीतरी वेगळे ठरवलेले असते.
मला असें वाटते कीं त्याच्या मुलांचे परिवर्तन व्हावें म्हणून एलीने प्रार्थना केलीं. आणि नक्कीच, त्याला अशाच प्रकारे प्रार्थना करणे अगत्याचे होते. पण देवानें हे योजिले होते कीं तो हफनी आणि फिनहास यांनी आज्ञा पाळू नये, तर मारले जावे.
जेव्हां असें काहीतरी घडते (जे आपल्याला सामान्यतः ती वेळ येईपर्यंत ठाऊक नसते) कीं जेव्हां एकींकडे आपण परिवर्तनासाठीं परमेश्वराचा धावा करत असतो, तेव्हां परमेश्वराचे उत्तर असें नसते: “मी तुजवर प्रीति करीत नाहीं.” त्याऐवजी उत्तर असें असते : “या पापावर विजय न मिळविण्यामागे आणि पश्चात्ताप न करण्यामागे माझे बुद्धियुक्त आणि पवित्र हेतू आहेत. तुला हे सर्व हेतू आता दिसत नाहींत. मजवर विश्वास ठेव. मी काय करत आहे हे मला माहीत आहे. मी तुजवर प्रीति करतो.”
By Alethia4India“तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.” (1 शमुवेल 2:25)