Solid Joys

3 August : तुमच्या शरीराचा हेतू


Listen Later

कारण तुम्हीं मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. (1 करिंथ 6:20)

देवानें या भौतिक विश्वाची निर्मिती अविचाराने केलीं नाहीं. त्यामागे त्याचा उद्देश होता, तो म्हणजें, असे निरनिराळे निमित्त उदयांस आणणें जेणेंकरून त्याचा महिमा वाढावा आणि तो अधिक तेजस्वीपणें प्रकट केला जावा. "आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते" (स्तोत्र 19:1).

देवानें याच कारणासाठीं निर्माण केलेंल्या इतर सर्व भौतिक गोष्टींच्या त्याच श्रेणीत आपली शरीरे देखील सुसंगतपणें बसतांत. मानव प्राणी व मानव शरीर यांद्वारे स्वतःचा गौरव करून घेण्याच्या मूळ आपल्या उद्देशापासून तो माघार घेणार नाहीं.

देव आपल्या कुजलेल्या, पापाने डागाळलेल्या शरीराला पुनरुत्थान पावलेले शरीर बनविण्यासाठीं, जेणेंकरून त्या शरीराने गौरव आणि अमरत्व धारण करावे, तो त्याचे हात घाण करणारे कष्ट का घेतो? उत्तर : कारण त्याच्या पुत्राने मृत्यूची खंडणी दिली जेणेंकरून या भौतिक विश्वासाठीं त्याच्या पित्याचा उद्देश पूर्णतेस जावा, तो म्हणजें, त्यां भौतिक वस्तूंमध्यें ज्यांत आपली शरीरेही आहेत, अनंतकाळासाठीं त्याचा महिमा व्हावा.

यास्तव आपला शास्त्रलेख असे म्हणतो : “कारण तुम्हीं मोलाने विकत घेतलेले आहात [म्हणजें, त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे]. म्हणून तुम्हीं आपलें शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.” देव त्याच्या पुत्राने जें केलें त्याकडें दुर्लक्ष करणार नाहीं वा अनादर करणार नाहीं. आपली शरीरे मेलेल्यांतून उठवून देव त्याच्या पुत्राच्या कार्याचा गौरव करेल आणि आपण आपल्या शरीराचा उपयोग सर्वकाळ त्याचे गौरव करण्यासाठीं करू.

म्हणूनच आता तुम्हांला शरीर आहे. आणि म्हणूनच ते ख्रिस्ताच्या गौरवी शरीराचे स्वरूप धारण करण्यासाठीं पुन्हा उठविले जाईल.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India