Solid Joys

3 July : सुवार्ता : देव आनंदी झाला आहे


Listen Later

धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता... (1 तीमथ्य 1:11)

1 तीमथ्यमधील हा एक सुंदर वाक्प्रचार आहे, जो पवित्र शास्त्राच्या काहीं शब्दांच्या अतिशय परिचित पृष्ठभागाखाली लपलेला आहे. पण तो शोधून काढल्यानंतर, तो असा वाटतो: “आनंदी देवाच्या गौरवाची सुवार्ता.” मूळांत, “धन्यवादित” या शब्दाचा अर्थ “प्रशंसा प्राप्त” असा नाहीं, तर “आनंदी” असा आहे.

देवाच्या गौरवाचा एक मोठा भाग त्याचा आनंद आहे.

देवाला असीम आनंद होऊं शकत नाहीं आणि तरीही तो पूर्णतः गौरवी असू शकतो ही गोष्ट प्रेषित पौलाला अकल्पनीय होती. अमर्यादपणें गौरवशाली असणें म्हणजें अमर्यादपणें आनंदी असणें. त्यानें “धन्यवादित देवाचा गौरव” या वाक्प्रचाराचा उपयोग केला कारण तो ज्यां प्रकारे आनंदी आहे तसा आनंदी असणें ही देवासाठीं गौरवशाली गोष्ट आहे.

देवाचे गौरव बहुतांशी या तथ्यात समाविष्ट आहे कीं तो आमच्या कल्पनेपलीकडें आनंदी आहे. जसे अठराव्या शतकातील महान सुवार्तिक, जोनाथन एडवर्ड्स यांनी म्हटले, “देवाच्या परिपूर्णतेचा भाग जो तो कळवितो तो आहे त्याचा आनंद. या आनंदात स्वतःमध्यें आनंद अनुभव करणें आणि आनंद साजरा करणें समाविष्ट आहे; जीवितांचा आनंद सुद्धा असाच असतो.”

आणि हा सुवार्तेचा मुख्य भाग आहे, पौल म्हणतो: “धन्यवादित देवाच्या गौरवाची जी सुवार्ता.” ही सुवार्ता किंवा आनंदाची बातमी आहे कीं देव गौरवीरित्या आनंदी आहे. कोणीही उदासवाण्या, दुःखी देवासोबत अनंतकाळ घालवू इच्छिणार नाहीं.

जर देव दुःखी असेल, तर सुवार्तेचे हे ध्येय - देवासोबत सदाकाळ राहणें - आनंदी ध्येय नाहीं, आणि याचा अर्थ असा आहे कीं ती सुवार्ता मुळीच असणार नाहीं. पण, वस्तुतः, येशू आम्हांला आनंदी देवासोबत अनंतकाळ घालवण्यास पाचारण करतो जेव्हा तो म्हणतो, “तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (मत्तय 25:23).

येशूनें योहान 15:11 मध्यें म्हटले, “माझा आनंद तुमच्यामध्यें असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.” येशू बोलला, आणि जगला, आणि मरण पावला यासाठीं कीं त्याचा आनंद - देवाचा आनंद - आमच्याठायीं असावा आणि आमचा आनंद परिपूर्ण व्हावा. म्हणून, सुवार्ता ही “धन्यवादित (आनंदी) देवाच्या गौरवाची सुवार्ता” आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India