Solid Joys

30 August : मंडळीची वाढ ही देवाच्या पद्धतीने होते


Listen Later

म्हणजें देहाद्वारे झालेंली मुले देवाची मुले आहेत असे नाहीं तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतांत. (रोम 9:8)

कल्पना करा कीं जुन्या करारातील अब्राहाम एक पाळक आहे. परमेश्वर म्हणतो, "मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझ्या सेवेची भरभराट करीन." पण मंडळी मात्र मुलबाळ नसलेली अशा वांझ अवस्थेतआहे.

अब्राहाम काय करतो? तो स्वर्गाच्या अलौकिक हस्तक्षेपाचा बेत हाणून पाडण्याचा प्रयत्न करू लागतो. तो म्हातारा होत आहे. त्याची पत्नी अजूनही वांझ आहे. म्हणून तो स्वर्गाच्या अलौकिक हस्तक्षेपावाचूनच देवाच्या अभिवचनानुसार असलेल्या पुत्राला जन्मास घालण्याचे ठरवतो. तो त्याच्या बायकोची दासी हागार हिच्याशी लैंगिक संबंध स्थापित करतो (उत्पत्ति 16:4). परंतु परिणामी “अभिवचनानुसार असलेल्या मुलाऐवजी" "देहाद्वारे झालेंले मुल" म्हणजें इश्माएल ह्याचा जन्म होतो.

देव अब्राहामाला आश्चर्याचा धक्का देत असे म्हणतो, “[तुझी पत्नी सारा] तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन” (उत्पत्ति 17:16). हे ऐकून अब्राहाम देवाचा धावा करून म्हणतो, "इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजें झालें!" (उत्पत्ति 17:18). त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक, मानवी प्रयत्नांद्वारे असलेले काम ह्याद्वारे देवाचे अभिवचन पूर्णत्वास यावें अशी त्याची इच्छा आहे. पण देव म्हणतो, “नाहीं, नाहीं, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल” (उत्पत्ति 17:19).

पण सारा 90 वर्षांची झाली आहे. तिचे आतापर्यंतचे आयुष्य वांझ अवस्थेंतच आहे, शिवाय ती आधीच रजोनिवृत्तीतून गेलेली आहे (उत्पत्ति 18:11). अब्राहाम 100 वर्षांचा झाला आहे. अभिवचनानुसार मुलासाठीं एकमात्र आशा जर असेल तर ती म्हणजें अद्भुत, अलौकिक हस्तक्षेपच.

"अभिवचनानुसार मूल" होण्याचा अर्थ असा आहे - त्याचा “जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून” होत नाहीं; तर देवापासून" होतो (योहान 1:13). या जगात देवाची मुलें तिच गणली जातांत जीं अलौकिकरित्या अभिवचनानुसार जन्मलेलीं आहेत. गलतीकरांस 4:28 मध्यें पौल म्हणतो, "बंधुजनहो, इसहाकाप्रमाणें तुम्हीं [ख्रिस्ती लोक], अभिवचनाची संतती आहात." तुमचा जन्म “देहस्वभावानुसार” नाहीं, तर "आत्म्यानुसार" झाला आहे (गलती 4:29).

परत एकदा कल्पना करा कीं अब्राहाम एक पाळक आहे. त्याला जसे वाटते कीं मंडळीची वाढ ही देवानें दिलेंल्या अभिवचनानुसार व्हावीं त्याप्रमाणें ती वाढत नाहींये. तो अलौकिक हस्तक्षेपाची वाट पाहत थकला आहे. म्हणून तो केवळ मानवी माध्यम असलेल्या “हागारे” कडें वळतो आणि पवित्र आत्म्याच्या अलौकिक कार्यावाचून आपण “लोकांना आकर्षित” करू शकतो असे ठरवतो.

तथापि, ही इसहाकीं मंडळी नसून इश्माएली मंडळी असेल- म्हणजें देहाद्वारे झालेंली मुले, देवाची मुले नाहीं. देव आम्हांला अशा घातक यशापासून वाचवो. सर्व प्रकारे कष्ट करा. परंतु निर्णायक, अलौकिक कार्यासाठीं नेहमी परमेश्वराकडें पहा. “लढाईच्या दिवसासाठीं घोडा सज्ज करतांत, पण यश देणें परमेश्वराकडें असते” (नीतिसूत्रे 21:31).

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India