Solid Joys

30 December : सुसज्जीत आणि सशक्त


Listen Later

आतां ज्या शांतीच्या देवानें ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्तानें मेंढरांचा’ महान् ‘मेंढपाळ’ आपला प्रभु येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘वर आणिलें,’ तो देव आपल्या दृष्टीनें जें आवडतें तें आपणांमध्यें येशू ख्रिस्ताच्या द्वारें करो व तो आपल्या इच्छेप्रमाणें करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामांत सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. (इब्री 13:20-21)

ख्रिस्तानें सार्वकालिक कराराचे रक्त सांडले. या यशस्वी मुक्तीद्वारे, त्यानें मृतातून स्वतःच्या पुनरुत्थानाचा आशीर्वाद प्राप्त केला. हे इंग्रजीपेक्षा ग्रीकमध्यें अधिक स्पष्ट आहे: “देवानें... सार्वकालिक कराराच्या रक्ताने . . प्रभु येशूला मरणातून पुन्हा वर आणले.” हा येशू - कराराच्या रक्ताने उठविल्या गेला - आता तो आपला जिवंत प्रभु आणि मेंढपाळ आहे.

आणि या सर्व गोष्टींमुळें, देव दोन गोष्टी करतोः

1. तो आपल्याला सर्व चांगल्या गोष्टींनी सुसज्जीत करतो जेणेंकरून आपण त्याची इच्छा पूर्ण करावी, आणि

2. जे देवाच्या दृष्टीत आनंददायी आहे असे कार्य देव आपल्यामध्यें करतो.

ख्रिस्ताच्या रक्ताने सुरक्षित केलेंला “सार्वकालिक करार” हा नवीन करार आहे. आणि नवीन कराराचे वचन हे आहेः ‘‘मी आपलें धर्मशास्त्र त्याच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन’’ (यिर्मया 31:33). म्हणूनच, या कराराचे रक्त केवळ देवाच्या इच्छेप्रमाणें आपल्याला सुसज्ज करण्यासाठीं सुरक्षीत करीत नाहीं तर ते यशस्वीपणें सुसज्जीत करण्यासाठीं देवाला त्याचे कार्य करण्यास देखील आपल्यामध्यें सुरक्षीत करते.

देवाची इच्छा कृपेचे साधन म्हणून केवळ दगडावर किंवा कागदावर लिहिली जात नाहीं. ती आपल्यामध्यें कार्य करते आणि त्याचा परिणाम असा आहे कीः त्याची अनुभूती आपण अनुभवतो, त्याचा विचार करतो व देवाला अधिक आनंद होईल असे कार्य करतो.

जी साधने तो आम्हांला देतो त्याचा उपयोग करण्याची आज्ञा आपल्याला दिली आहेः ‘‘भीत व कांपत आपलें तारण साधून घ्या.” पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजें आपल्याला असे का सांगितले जातेः ‘‘कारण इच्छा करणें व कृति करणें हीं तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा तो देव आहे” (फिलिप्पै 2:12-13).

जर आपण देवाला आनंद देऊ शकलो तर - जर आपण त्याला आनंद मिळेल असे कार्य केलें तर - याचे कारण असे आहे कीं देवाच्या रक्ताने विकत घेतलेली कृपा केवळ सुसज्जतेपासून सर्वशक्तिमान परिवर्तनाकडें वळवली आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India