Solid Joys

30 July : विश्वास बळकट करणारे दुःख


Listen Later

माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्हीं आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे कीं, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो. (याकोब 1:2-3)

हे विचित्र वाटेल, पण आपण निरनिराळ्या दु:खांनी डळमळलें जातो यामागील मुख्य हेतू हा कीं त्याद्वारे आपला विश्वास अधिक खंबीर व्हावा.

विश्वास हा स्नायूंच्या ऊतीसारखा असतो : जर तुम्हीं त्यावर पुरेसा ताण दिला तर तो दुर्बळ होण्याऐवजी अधिक बळकट होतो. याकोबाला हेंच म्हणायचे आहे. तुमच्या विश्वासाला धमकाविण्यांत येते व त्याला नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते आणि तो तोडून टाकण्याच्या पराकाष्ठेपर्यंत ताणला जातो, तेव्हा परिणामी त्यांत खंबीरपणें टिकून राहणारे बळ उत्पन्न होते. याकोब ह्याला धीर म्हणतो.

देवाला विश्वासांत इतका संतोष वाटतो कीं त्यांस तो शुद्ध आणि मजबूत ठेवण्यासाठीं तोडून टाकण्याच्या पराकाष्ठेपर्यंत त्याची परीक्षा घेतो. उदाहरणार्थ, 2 करिंथ 1:8-9 नुसार त्यानें पौलाबरोबर असेच केलें.

बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेंल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाहीं; ते असे कीं, आम्हीं आमच्या शक्तीपलीकडें अतिशयच दडपले गेलो; इतके कीं आम्हीं जगतो कीं मरतो असे आम्हांला झालें. फार तर काय, आम्हीं मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्हीं स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झालें.

"म्हणून हे झालें" हे शब्द प्रकट करतांत कीं शक्तीपलीकडें असलेल्या या अतिशयच दुःखामागे देवाचा एक हेतू होता : तो हेतू हा कीं पौलाने स्वतःवर आणि त्याच्याकडें असलेल्या संसाधनांवर नव्हे तर देवावर भरवसा ठेवावा - विशेषतः मृतांना सजीव करणार्‍या देवाच्या वचनदत्त कृपेवर.

देव पूर्ण मनापासून ठेवलेल्या विश्वासाला इतके महत्त्व देतो कीं तो आवश्यक असल्यास आपल्यावर कृपा करून जगात असलेल्या त्या सर्व गोष्टीं आमच्यापासून दूर करू शकतो ज्यांवर आपण भरवसा ठेवण्याच्या परीक्षेंत पडू शकतो- अगदी जीवन देखील. यामागे त्याचा उद्देश्य हांच आहे कीं आपण आपल्या ह्या विश्वासात अधिक प्रगती करावी आणि त्यांत बळकट व्हावें कीं आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींत तो स्वतः सर्व काहीं असेल.

आपल्याविषयी त्याची इच्छा ही आहे कीं स्तोत्रकर्त्यासोबत आपणही असे म्हणावे, “स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाहीं. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे (स्तोत्र 73:25-26).

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India