Solid Joys

31 March : प्रेमाचे हात बांधणारे काय आहे?


Listen Later

ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीति, ह्यांविषयी ऐकून, आम्हीं तुमच्यासाठीं जेव्हां प्रार्थना करतो तेव्हां स्वर्गात तुमच्यासाठीं राखून ठेवलेल्यां आशेमुळे आम्हीं सर्वदा आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो. ह्या आशेविषयी तुम्हीं सुवार्तेच्या सत्य वचनात पूर्वी ऐकलें. (कलस्सै 1:3-5)

आज मंडळीची समस्या ही नाहीं कीं स्वर्गावर आवेशाने प्रेम करणारे अनेक लोक आहेत. समस्या ही नाहीं कीं विश्वासाचा दावा करणारे ख्रिस्ती लोक जगापासून माघार घेत आहेत, म्हणजे त्यांचे अर्धे दिवस पवित्र शास्त्र वाचनात घालवीत आहेत आणि दुसरा अर्धा भाग जगाच्या गरजांची उपेक्षा करीत देवामधील त्यांच्या सुखांबद्दल गीत गाण्यात घालवतात. असे होत नाहींये! देवाचे लोक देवावर इतकीं प्रीति करत नाहींत कीं ते त्यांचे अर्धे दिवस त्याच्या वचनांत घालवितील.

समस्या ही आहे कीं विश्वासाचा दावा करणारे ख्रिस्ती लोक दहा मिनिटे पवित्र शास्त्र वाचनात खर्ची घालतात आणि नंतर त्यांचे अर्धे दिवस पैसे कमविण्यात आणि उरलेले अर्धे दिवस ते त्यांनी ज्यावर खर्ची केलें त्यावर प्रीति करण्यात आणि ते दुरुस्त करण्यात प्रेमळ आणि दुरुस्त करण्यात खर्ची घालतात.

स्वर्गीय मानसिकता नाहीं जी या जगातील हरवलेल्यां आणि दुःखी लोकांप्रत प्रेमात अडखळण आणते . ही जगिक मानसिकता आहे जी प्रेमात अडखळण आणते, आठवड्याच्या शेवटी धार्मिक नित्यक्रमाच्या कपटवेशात लपलेली असली तरीही.

ती व्यक्ती कोठे आहे जिच्या हृदयात स्वर्गाच्या प्रतिज्ञात गौरवाप्रत इतके उत्कट प्रेम आहे कीं त्याला पृथ्वीवर निर्वासित आणि यात्रेकरू असल्यांसारखे वाटते? तो व्यक्ती कोठे आहे ज्यानें येणाऱ्या युगाच्या सौंदर्याचा इतका आस्वाद घेतला आहे कीं या जगाचे हिरे त्याला डॉलरच्या दुकानातील कंच्यांसारखे दिसतात, आणि जगाची करमणूक व्यर्थ वाटते आणि जगाची नैतिक कारणे अतिशय लहान आहेत कारण तेथून अनंतकाळाकडें पाहता येत नाहीं? ही व्यक्ती कुठे आहे?

निश्चितच, तो इंटरनेटच्या किंवा खाण्याच्या किंवा झोपेच्या किंवा पिण्याच्या किंवा मेजवानी करण्याच्या किंवा मासेमारी अथवा नौकानयन करण्याच्या किंवा फेरफटका मारण्याच्या बंधनात नाहीं. तो विदेशात राहणारा स्वतंत्र मनुष्य आहे. आणि त्याचा एक प्रश्न असा आहे: मी या पृथ्वीवर निर्वासित असताना सर्व अनंतकाळासाठीं देवाचा आनंद जास्तीत जास्त कसा मिळवू शकतो? आणि त्याचें उत्तर नेहमी सारखेच असते: प्रेमाचा परिश्रम करून. देवामधील माझ्या आनंदाचा विस्तार करून, जर शक्य असेल तर मी इतरांना त्यात समाविष्ट करू शकेन, मग त्यासाठीं काहींही किंमत का मोजावी लागेना.

फक्त एकच गोष्ट त्यास संतुष्ट करते ज्याची संपत्ती स्वर्गात आहे: स्वर्गाची कामे करणे. आणि स्वर्ग हे प्रेमाने परिपूर्ण जग आहे!

स्वर्गाच्या दोऱ्या प्रेमाचे हात बांधून त्यांस निष्प्रभ करीत नाहींत. पैश्याचे आणि अवकाशाचे आणि आरामाचे आणि प्रशंसेचे प्रेम आहे - प्रेमाच्या हातांना बांधणाऱ्या स्वार्थाचे दोरखंड आहेत. आणि या दोरखंडांस तोडणारे सामर्थ्य आहे ख्रिस्ती आशा. “ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीति, ह्यांविषयी ऐकून, आम्हीं तुमच्यासाठीं जेव्हां प्रार्थना करतो तेव्हां स्वर्गात तुमच्यासाठीं राखून ठेवलेल्यां आशेमुळे आम्हीं सर्वदा आपल्यां प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो” (कलस्सै 1:4-5).

मला असलेल्यां पूर्ण खात्रीने मी ते पुन्हा म्हणतो: या पृथ्वीवरील प्रेमास अडखळण आणणारी स्वर्गीय मानसिकता नाहीं. ती सांसारिक चित्तवृत्ती आहे. आणि म्हणूनच प्रीतिचा महान झरा ख्रिस्ती आशेचा सामर्थ्यवान स्वतंत्र करणारा आत्मविश्वास आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India