Solid Joys

31 May : देवाची सेवा करण्याचा लाभ


Listen Later

“माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील” (2 इतिहास 12:8).

देवाची सेवा करणे इतर कोणाची सेवा करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

आपण हे समजून घ्यावें - आणि त्याचा आनंद घ्यावा- याविषयीं देव खूप आवेशी आहे. उदाहरणार्थ, तो आपल्याला आज्ञा देतो, “हर्षाने परमेश्वराची सेवा करा!” (स्तोत्र 100:2). ह्या हर्षामागे एक कारण आहे. ते प्रे. कृत्ये 17:25 मध्यें दिलेले आहे. “माणसांच्या हातून परमेश्वराची सेवा घडावी असेही नाहीं; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.”

आपण आनंदाने त्याची सेवा करतो कारण त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा भार आपल्यावर नाहीं. त्याला काही गरजा नाहींत. म्हणून, त्याची सेवा करणे म्हणजें त्याच्या गरजा पूर्ण करणे असा त्या सेवेचा अर्थ नाहीं. उलट आपण अशा सेवेत आनंद साजरा करतो ज्यात तो आपल्या गरजा पुरवितो. देवाची सेवा करण्याचा अर्थ आपल्याला जे करायचे आहे ते करण्यासाठीं देवाकडून कृपा प्राप्त करणे असा होय.

हे आम्हास समजावे याविषयीं देव किती ईर्ष्यावान किंवा आवेशी आहे आणि त्यांत त्याचे किती गौरव होते हे दाखवण्यासाठीं, 2 इतिहास 12 मध्यें एक गोष्ट आहे. शलमोनाचा मुलगा, रहबाम ज्याने दहा कुळांच्या बंडानंतर दक्षिणेकडील राज्यावर राज्य केलें, त्यानें परमेश्वराची सेवा न करण्याचा निर्णय घेतला आणि इतर देवतांची व इतर राज्यांची सेवा केलीं.

न्यायनिवाडा म्हणून, देवानें शिशकला 1200 रथ व 60,000 स्वार घेऊन रहबामाविरुद्ध पाठविले (2 इतिहास 12:2-3).

देवानें आपल्या दयेनुसार शमाया संदेष्ट्याला रहबामाकडे हा संदेश घेऊन पाठवले:  “परमेश्वर म्हणतो, ‘तुम्हीं मला सोडले म्हणून मीही तुम्हांला सोडून तुम्हांला शिशकाच्या हाती दिलें आहे” (2 इतिहास 12:5). त्या संदेशाचा हर्षयुक्त परिणाम असा झाला कीं रहबाम आणि त्याचे सरदार हे दीन झालें व पश्चात्ताप करून म्हणू लागले कीं, “परमेश्वर न्यायी आहे” (2 इतिहास 12:6).

ते दीन झालें आहेत असें परमेश्वराने पाहिले तेव्हां त्यानें म्हटले, “ते दीन झालें आहेत म्हणून मी त्यांचा नाश करणार नाहीं; मी लवकरच त्यांचा बचाव करीन; माझ्या क्रोधाचा वर्षाव शिशकाच्या हस्ते मी यरुशलेमेवर करणार नाहीं” (2 इतिहास 12:7).पण त्यांस ताडन म्हणून तो म्हणतो, “माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा ह्यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील” (2 इतिहास 12:8).

विषयाचा हेतू स्पष्ट आहे: शत्रूची सेवा करणे आणि देवाची सेवा करणे यात खूप फरक आहे. कसा? देवाची सेवा करणे म्हणजें प्राप्त करणे आणि आशीर्वाद आणि आनंद आणि लाभ आहे. शिशकाची सेवा करणे थकविणारे आणि रिक्त करणारे आणि कष्ट देणारे आहे. देव हा देणारा आहे. शीशक हा हिसकावून घेणारा आहे.

म्हणूनच मी हे मोठ्या आवेशाने सांगतो कीं रविवारची सकाळची उपासना आणि दैनंदिन आज्ञापालनाची उपासना हे मूलतः देवाला जाचक देणे नाहीं, परंतु देवाकडून आनंदाने प्राप्त करणे आहे. हीच खरी सेवा आहे ज्याची देव आम्हांकडून मागणी करतो. तुम्हीं जे काही करता त्यात, देणारा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India