Solid Joys

5 August : “याव्हे” ला परिभाषित करणाऱ्या 10 गोष्टी


Listen Later

आणखी देवानें मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडें पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल..” (निर्गम 3:15)

इंग्रजी बायबलमध्यें देवाचे हिब्रू मधील नाव जवळजवळ नेहमीच लॉर्ड (LORD) असे भाषांतरित केलें जाते. पण हिब्रूचा उच्चार "याव्हे" असा आहे आणि त्याचे मूळ "मी आहे" ही अभिव्यक्ती आहे.

म्हणून जेव्हां जेव्हां आपण यहोवा किंवा याव्हे हा शब्द ऐकतो किंवा इंग्रजी बायबलमध्यें जेव्हां जेव्हां आपण LORD हा शब्द पाहतो त्यां प्रत्येक वेळी आपण हे लक्षांत ठेवावें : हे एक विशेषनाम आहे (जसे कीं पेत्रस किंवा योहान) जो “मी आहे” या अभिव्यक्तीपासून बनलेला आहे आणि हे विशेषनाम (संज्ञा) प्रत्येक वेळी आपल्याला याची आठवण करून देते कीं देव हांच अंतीम व परम आहे.

"मी आहे" हे विशेषनाम (संज्ञा) देवाविषयी किमान 10 गोष्टींची अभिव्यक्ती करते :

1. त्याला कधीही प्रारंभ नव्हता. जवळजवळ सर्वच मुले आपल्या आई-वडिलांना हा प्रश्न विचारतांत, "देवाला कोणी बनवले?" आणि प्रत्येक सुजाण आई-वडील उत्तर देतांत, “देवाला कोणीहि बनवले नाहीं. देव फक्त आहे, तो सर्वदा होता, त्याचा कधीही आरंभ झाला नव्हता.”

2. देवाचा कधीही अंत होणार नाहीं. त्याला जर आरंभ नव्हताच तर त्याला अंत देखील नसणार, कारण तो आहे.

3. देव हे अद्वितीय वास्तव आहे. त्याच्याबरोबरीचा दुसरा असा वास्तव कोणी नाहीं. त्याच्या बाहेर कोणतेही वास्तव अस्तित्वात नाहीं जोपर्यंत तो स्वतः ते अस्तित्वांत आणू इच्छित नाहीं व त्याची निर्मिती करित नाहीं. सनातन काळापासून तोच आहे. अंतरीक्ष नव्हते, विश्व नव्हते, शून्यता नव्हती. फक्त देव.

4. देव पूर्णपणें स्वतंत्र आहे. त्याला अस्तित्वात आणण्यासाठीं किंवा त्याला पाठिंबा देण्यासाठीं किंवा त्याला सल्ला-मसलत देण्यासाठीं किंवा तो जो आहे असे त्याला बनवण्यासाठीं तो कशावरही अवलंबून नाहीं.

5. जे काहीं देव नाहीं ते सर्व पूर्णपणें देवावर अवलंबून आहे. संपूर्ण विश्व हे पूर्णपणें निर्माण केलेंलें असे दुय्यम दर्जाचे अस्तित्व आहे. ते देवानें अस्तित्वात आणलें व आपलें अस्तित्व कायम ठेवण्यासाठीं ते क्षणोक्षणी देवाच्या निर्णयावर अवलंबून राहते.

6. देवाबरोबर जर तुलना केलीं तर संपूर्ण विश्व हे काहींच नाहीं. ज्याप्रमाणें सावली ही वस्तूमुळें अस्तित्वात येते त्याप्रमाणें प्रत्येक संभाव्य व अवलंबून असलेलें वास्तव हे परम व स्वतंत्र वास्तवामुळें अस्तित्वांत येते. ज्याप्रमाणें प्रतिध्वनी ही गडगडाटामुळें आहे अगदी त्याप्रमाणें. जगात आणि आकाशगंगांमध्यें जे काहीं आहे व जें पाहून आपण आश्चर्यचकित होतो, ते सर्व देवाच्या तुलनेत काहींच नाहीं.

7. देव स्थिर आहे. तो काल, आज आणि सर्वकाळ सारखाच आहे. त्याचा विकास होत नाहीं. तो पुढे वाढत जाऊन वेगळं काहीं बनत नाहीं. तो जो आहे तो आहे.

8. देव सत्य आणि चांगुलपणा आणि सौंदर्य यांचा परिपूर्ण मानक व परिभाषक आहे. असे कोणतेही कायद्याचे पुस्तक नाहीं जें वाचून तो योग्य काय आहे हे जाणून घेतो. सत्याची स्थापना करण्यासाठीं त्याजकडें कोणतीही गुरुकिल्ली नाहीं. उत्तम काय होईल किंवा योग्य काय होईल हे ठरवण्यासाठीं त्याच्याकडें कोणतीही समिती नाहीं. काय बरोबर आहे, काय सत्य आहे, काय सुंदर आहे हे सर्व तो स्वतः ठरवतो, आणि तोच त्यां सर्वांचा परिभाषक आहे.

9. देवाच्या इच्छेस जे येते तेच तो करतो आणि ते नेहमीच बरोबर, नेहमीच सुंदर व नेहमी सत्यनुरूप असते. त्याच्या बाहेर असलेली सर्व वास्तविकता त्यानें तयार केलीं आणि घडवली, आणि परम व अंतीम सत्य म्हणून तोच त्यावर सार्वभौम आहे. म्हणून तो आपल्या सुइच्छेच्या संकल्पानुसार नसलेली कोणतीही गोष्ट अस्तित्वांत आणण्याच्या प्रत्येक बंधनांपासून पूर्णपणें मुक्त आहे.

10. देव हा विश्वातील सर्वात महत्वाचे आणि सर्वात मौल्यवान सत्य आणि व्यक्ती आहे. तो इतर सर्व वास्तविकतेच्या तुलनेंत आपल्या स्वारस्य आणि केंद्र आणि प्रशंसा आणि आनंद यांस अधिक पात्र आहे, संपूर्ण विश्वाच्या तुलनेंत देखील.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India