Solid Joys

5 June : ऐहिक गरजांसाठीं देवावर अवलंबून राहणें


Listen Later

"तर तुम्हीं पहिल्यानें देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजें त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील." (मत्तय 6:33)

देवाच्या संपन्न भावी कृपे विषयीं असलेंल्या सर्वात सामर्थ्यशाली साक्षींपैकीं एक म्हणजें "विश्वासाचा नियम" ज्यांवर पुष्कळ मिशनऱ्यांच्या जीवनाची वाटचाल आधारलेंली होती, विशेषता: ओवर्सीज मिशनरी फेलोशिप (ओ एम एफ) या संस्थेच्या मिशनऱ्यांचे जीवन.

इतरांच्या कार्य-पद्धतीचा निषेध न करता, विश्वासाचा हा नियम त्यां लोकांचे जीवन-तत्व होते जे हडसन टेलर आणि जॉर्ज मुलर यांच्या पथ-चिन्हांवर चालून, लोकांकडें निधि न मागता थेट देवाकडें विनवणी करित असत कीं दान देण्याकरिता लोकांच्या मनात त्यानेंच कार्य करावें.

जेम्स एच, टेलर जे ओ एम एफ च्या संस्थापकांचे पणतू होते, स्पष्ट करतांत कीं भावी काळातील कृपेवर असलेंला हा विश्वास, जो गत काळात झालेंल्या कृपेत मूळांवलेंला असतो, तो कसा देवाचे गौरव करतो.

“आम्हीं ..... विश्वासापासून सुरुवात करतो. आम्हीं विश्वास ठेवतो कीं देव आहे. अनेक मार्गानी आम्हांला याची खात्री पटली आहे, पण आम्हीं सर्वांनी देवाच्या कृपेचा अनुभव घेतला आहे कीं आम्हीं येशू ख्रिस्ता द्वारें आणि आत्म्याच्या नवीन जन्माद्वारें त्याला ओळखू  शकतो. येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुनरुत्थानाचा इतिहासातील पुरावा हा त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भक्कम पाया आहे; जो बोलला कीं तो मरेल आणि पुन्हा जीवंत होईल आणि तो झाला, तो सर्वच बाबतीत विश्वासार्ह आहे. त्यामुळें, आम्हीं त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार आहोत, केवळ आमच्यां आत्म्याच्या सार्वकालिक तारणासाठींच नाहीं तर, आमच्यां रोजच्या भाकरीसाठीं आणि आर्थिक पुरवठयासाठीं सुद्धा.

ओ एम एफ नें आपल्यां मासिकांत देवाच्या अढ्भुत भावी पुरवठा करणार्‍या त्याच्या गौरवीपणा बद्दल आणि त्याच्या विश्वासूपणा बद्दल अशी साक्ष प्रकाशित केली : "आम्हांला हे दर्शवायचे आहे कीं देव जे सांगतो कीं तो जे करील, ते करण्याबाबत तो विश्वासू आहे. तो सामान्य गरजा जसे कीं विमानाचे टिकिट, अन्न, दवाखान्याचा खर्च आणि ख्रिस्ती गटाच्या नेंहमीच्या गरजांचा पुरवठा शंभर वर्षाहून अधिक काळ तो करत आला आहे."

ओ एम एफ त्यांच्या संदेशामधून आणि त्यांच्या पद्धतीमधून, देवाच्या विश्वासूपणाचा गौरव करण्यात समर्पित आहे. हडसन टेलर असें म्हणतात : "एक जीवंत देव आहे. आणि तो पवित्र शास्त्रात आपल्यांशी बोललेंला आहे. आणि तो ज्या गोष्टींचे अभिवचन देतो, त्या गोष्टी तो पूर्णहि करतो."

विश्वासावर चालणारे जीवन हे देवाच्या भरवश्याचा आरसा आहे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India