Solid Joys

5 March : तुमच्या आनंदाकरिता येशूकडें पहा


Listen Later

"आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात....जेवणावळतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थांनातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांना आवडते." ( मत्तय 23 : 5-7)

लोकांकडून स्वतःचे वाखाण करून घेण्याच्या लालसेला शमवण्यासाठीं केवळ स्वीकृतीचा लोभ असतो. जर आपल्यांला स्वावलंबी बनून आनंद मिळत असेल तर, इतरांनी आपल्यां स्वावलंबीपणाची प्रशंसा केल्यांशिवाय देखील आपल्यांला आनंद वाटणार नाहीं.

यासाठीं मत्तय 23:5 मध्यें येशू परुशी लोकांचे वर्णन करित असें म्हणतो, "आपली सर्व कामे लोकांनी पहावीत म्हणून ते ती करतात."

हा चेष्टेखोरपणा आहे. आपल्यांला असे वाटत नाहीं का कीं स्वावलंबीपणा हा गर्विष्ठ व्यक्तिला इतरांच्या मतांपासून मुक्त करायला पाहिजे? यालाच "स्वत: मध्यें संतुष्ट" म्हणतात. तसे पहायाला गेले तर या आत्मसंतुष्टीमध्यें किंवा स्वावलंबीपणामध्यें एक रिक्तता आहे.

स्वत्वाची निर्मिती स्वत: मध्यें संतुष्ट होण्यात किंवा स्वत: वर अवलंबून राहण्याकरिता केलीं गेली नव्हती. स्वत्व कधीच स्वयंपूर्ण होवू शकत नाहीं. आपण परमेश्वर नाहीं. आपण परमेश्वराच्या प्रतिमेमध्यें बनवले गेलोय. आणि जी गोष्ट आपल्यांला देवाची "प्रतिमा" बनवते ती गोष्ट म्हणजे आपण स्वतःमध्यें संतुष्ट राहणे ही नाहीं. आपण सावली व प्रतिध्वनि आहोंत. त्यामुळे जो आत्मा स्वत: मध्येंच संतुष्टी शोधण्याकरिता झटत असेल,  तर त्यात एक रिक्तपणा असणारच.

इतरांकडून प्रशंसा मिळविण्याची ही भूक गर्वाचे अपयश व देवाच्या सतत मिळत असलेल्यां कृपेच्या कार्यावरील अविश्वासाचे चिन्ह आहे. येशूनें  मनुष्याचा स्व-गौरवाच्या लोभाचा अनिष्ट परिणाम पाहिला. त्यानें योहान 5:44 मध्यें ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे, "जे तुम्हीं एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याचाकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाहीं, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?" याचे उत्तर आहे, तुम्हीं विश्वास ठेवू शकत नाहीं. जे इतरांकडून प्रशंसेची लालसा करीत असतांत त्यांना विश्वास ठेवणे शक्य नाहीं. का?

कारण विश्वास स्वत:कडून दृष्टी हटवून देवाकडें पाहतो. कारण विश्वास म्हणजे येशूमध्यें देव जे सर्व काहीं आहे त्यात संतुष्ट असणे. आणि जर तुम्हीं तुमची लालसा इतरांच्या प्रशंसेद्वारें शमवण्याचा हट्ट करीत असाल तर, तुम्हीं येशूपासून दूर जाणार. येशू असा नाहीं. तो त्याच्या पित्याच्या गौरवा करिता जगतो. आणि आपल्यांला पण तो हेच करण्यास सांगतो.

पण जर तुम्हीं तुमच्या स्वतःमध्यें संतुष्ट राहण्यापासून वळाल (पश्चाताप कराल), आणि येशूकडें, देव जे सर्व काहीं आहे त्या सर्वाचा आनंद घेण्याकरिता येशूकडें (विश्वासाने) याल, मग त्या लालसेच्या रिक्ततेची बदल पूर्णतेने होईल- यालाच येशू "सार्वकालिक जीवनासाठीं उपळत्या पाण्याचा झरा” असे संबोधतो.   ( योहान 4:14).

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Solid JoysBy Alethia4India